
भारताचे पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाले आहेत. यात विविध क्षेत्रात कार्यकरणाऱ्या ४५ नायकांचा सन्मान करण्यात आला आहे. उद्या प्रजासत्ताक दिनी या महनीय व्यक्तींना राष्ट्रपतींच्या हस्ते हे पुरस्कार देऊ त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. या महनीय व्यक्तीत मुंबईच्या डॉ. अर्मिडा फर्नांडीस यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला असून त्यांना उद्या सन्मानीत करण्यात येणार आहे. डॉ. अर्मिडा फर्नांडीस यांना औषध क्षेत्रातील बहुमोल कार्याबद्दल हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
डॉ. अर्मिडा फर्नांडिस ( Dr. Armida Fernandez) या मुंबईतील एक प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ ( Paediatrician ) आणि नवजात शिशु तज्ज्ञ ( Neonatologist ) आहेत. डॉ. अर्मिडा फर्नांडिस यांनी आशियातील पहिली ‘ह्यूमन मिल्क बँक’ स्थापन करण्यात पुढाकार घेतला होता. त्यांच्या कार्यामुळे शिशु मृत्यूदर कमी करण्यासाठी मदत झाली आहे, त्यांचे हे कार्य पाहून त्यांना साल २०२६ चा प्रतिष्ठित पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.
डॉ. आर्मिडा फर्नांडीस यांना वैद्यकीय क्षेत्राबद्दल पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांनी आशियातील पहिली ह्युमन मिल्क बँक स्थापन केली होती. त्यांनी जवळपास २००० नर्सेसना याबद्दल प्रशिक्षण दिले होते. १९८९ मध्ये सायन येथील लोकमान्य टिळक (Lokmanya Tilak Municipal General Hospital) रुग्णालयात त्यांनी आशियातील पहिली मानवी दुग्ध बँक सुरू केली. ज्यामुळे हजारो नवजात शिशुंचे प्राण वाचण्यास मदत झाली होती.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
Leave a Reply