• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

डेविड मिलरच्या चुकीबाबत शुबमन गिल काय म्हणाला? ड्रेसिंग रूममध्ये काय घडलं Video

April 9, 2026 by admin Leave a Comment

IPL 2026, DC vs GT: आयपीएल 2026 स्पर्धेत सर्वात रोमांचक असा सामना गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात पार पडला. या सामन्यातील शेवटच्या षटकात 13 धावांची गरज होती. पण डेविड मिलरने एक मोठी चूक केली आणि अवघ्या एका धावेने पराभव झाला. या चुकीचा परिणाम दिल्ली कॅपिटल्सच्या ड्रेसिंग रूमममध्ये दिसला. ड्रेसिंग रूमध्ये डेविड मिलर वेगळा बसला होता. कारण 211 धावांचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सच्या हातात सामना होता. पण डेविड मिलरची एक चूक भोवली आणि संघाला पराभवाचं तोंड पाहावं लागलं. डेविड मिलरने केलेल्या चुकीमुळे गुजरात टायटन्सला स्पर्धेत पहिला विजय मिळवता आला. या विजयानंतर नेमकं काय झालं आणि चुकलं याबाबत गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिल याने भाष्य केलं आहे.

डेविड मिलरचं काय चुकलं?

दिल्ली कॅपिटल्सला शेवटच्या षटकात विजयासाठी 6 चेंडूत 13 धावांची गरज होती. डेविड मिलर आणि विपराज निगम ही जोडी मैदानात होती.. प्रसिद्ध कृष्णा गोलंदाजी करत होता. पहिल्याच चेंडूवर विपराज निगम स्ट्राईकला होता आणि त्याने चौकार मारला. दुसऱ्या चेंडूवर त्याची विकेट गेली. तिसऱ्या चेंडूवर कुलदीप यादव आला आणि त्याने एक धाव घेत डेविड मिलरला स्ट्राईक दिली. डेविड मिलरने तिथपर्यंत 17 चेंडूत 35 धावा केल्या होत्या. त्याने स्ट्राईक मिळताच षटकार मारला आणि संघाला विजयाच्या वेशीवर आणलं. 2 चेंडूत 3 धावा अशी स्थिती आली. पण पाचव्या चेंडूवर त्याने फटका मारला पण धाव घेतली नाही. शेवटच्या चेंडूवर 3 धावांची गरज होती आणि दोन धावा काढल्या तरी सामना सुपर ओव्हरमध्ये गेला असता. पण शेवटच्या चेंडूवर दोन धावा घेताना कुलदीप यादव रनआऊट झाला. गुजरात टायटन्सने हा सामना जिंकला.

काय म्हणाला शुबमन गिल?

डेविड मिलरने पाचव्या चेंडूवर धाव घेणं टाळल्यानंतर गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिल म्हणाला की, मिलरने धाव घेतली नाही आणि स्ट्राईक स्वत:कडे ठेवली. त्यामुळे आम्हाला वाटलं की आम्ही जिंकू शकतो. मिलरला आम्ही स्लो चेंडू टाकण्याचा निर्णय घेतला. कारण त्यावर सीमापार मारणं शक्य नसतं. अखेर तसंच झालं आणि दिल्ली कॅपिटल्सला शेवटच्या चेंडूवर फक्त 1 धाव घेता आली. हा सामना गुजरात टायटन्सने अवघ्या एका धावेने जिंकला.

Heartbroken David Miller in the dressing room. 🥹💔pic.twitter.com/sOg6J7YRwU

— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 9, 2026

..आणि डेविड मिलर उदास झाला

दिल्ली कॅपिटल्सने सामना गमावल्यानंतर डेविड मिलरला पश्चाताप झाला. त्याने काय चूक केली हे त्याच्या लक्षात आलं. एका चुकीमुळे संघाचं 2 गुणांचं नुकसान झाला. दिल्ली कॅपिटल्सच्या ड्रेसिंग रूममध्ये एका कोपऱ्यात बसला होता. त्याला तशा स्थितीत पाहून प्रशिक्षक हेमांग बदानीने त्याला जाऊन मिठी मारली.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशी Team India मध्ये? केव्हा लॉटरी लागणार, कोणत्या संघाविरुद्ध खेळणार? काय मोठी अपडेट?
  • Jay Pawar | बारामती पोटनिवडणूक: काँग्रेसच्या माघारीनंतरही 23 उमेदवार रिंगणात, काय म्हणाले जय पवार?
  • आर्या आंबेकरचं मालिकाविश्वात पदार्पण; ‘या’ लोकप्रिय मालिकेत साकारली भूमिका
  • मोठं संकट! पॅसिफिक महासागरात मैला चक्रीवादळाचा कहर… भारतालाही फटका बसणार? IMD ने दिली महत्त्वाची अपडेट
  • सकाळी रिकाम्या पोटी होणाऱ्या ‘या’ चुकांमुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in