• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

डास पुन्हा घरात येणारच नाहीत, 5 रुपयांच्या टोमॅटोचा करा हा सोपा उपाय, आता उन्हाळ्यात बिनधास्त खिडक्या उघड्या ठेवा

April 9, 2026 by admin Leave a Comment


ऋतु कोणताही असो, हिवाळा, पावसाळा किंवा उन्हाळा प्रत्येक ऋतुमध्ये डास हे असताच. घरांमध्ये या डासांची मोठी दहशत असते. अनेकदा घरात इतके डास होतात की, त्यामुळे शांत झोप देखील लागू शकत नाही. जर रात्री झोप पूर्ण नाही झाली तर आपली सकाळी चिडचिड होते. एवढंच नाही तर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये प्रचंड उकडत असताना देखील डास घरात घुसतील या भीतीने सर्व खिडक्या आणि दरवाजे बंद करून घरात बसण्याची वेळ येते. डासांवर नियंत्रण मिळवण्याचे अनेक उपाय आहेत. त्यामध्ये तुम्हाला मेडीकलमध्ये वेगवेगळ्या क्रीम मिळतील, या क्रीम जर तुम्ही आपल्या अंगाला लावल्या तर जोपर्यंत त्या क्रीमरचा किंवा औषधाचा प्रभाव आहे, तोपर्यंत डास तुम्हाला चावणार नाहीत, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा डास चावण्यास सुरुवात होते. बाजारात डासांसाठी वेगवेगळे लिक्विड देखील मिळतात. परंतु या सर्वांचा परिणाम हा तात्पुरताच असतो. परंतु आज आपण डासांना घरातून पळून लावण्यासाठी एक घरगुती परंतु प्रभावी उपायाबद्दल माहिती जाणून घेणार आहेत.

टोमॅटोचा उपाय

एक मध्यम आकाराचा टोमॅटो घ्यायचा, त्याच्या आतील सर्व गर काढून टाकायचा, आतील गर काढून टाकल्यानंतर टोमॅटोमध्ये चहा झाल्यानंतर जी चहापावडर उरते ती टाकायची. त्यावर थोडसं तेल टाकायचं, आणि त्यावर कापूर ठेवून तो पेटवायचा. जसा जसा याचा धूर होईल, तस तशी घरातील डासांची संख्या कमी होईल. त्यानंतर तुम्हाला तुमच्या घरात एकही डास दिसणार नाही. या मिश्रणाच्या विशिष्ट वासामुळे डास घरात येत नाहीत.

हे देखील करू शकता

जर तुमच्या घरात खूपच डास झाले असतील तर त्यासाठी आणखी एक सोपा उपाय आहे, तो म्हणजे ओला लिंबाचा पाला जर तुम्ही घरात जाळला तर त्याच्या धुरामुळे फक्त डासच नाही तर इतरही कीटक घरात असतील तर ते घरातून बाहेर पडतात, घर स्वच्छ होते. तुमची डासांपासून मुक्ती होते. डास घरात येऊ नये, किंवा डासांची उत्पत्ति होऊ नये, यासाठी तु्मच्या घराचा परिसर हा नेहमी स्वच्छ ठेवणं गरजेचं असंत. घरामध्ये कुठेही एक आठवड्यापेक्षा जास्त काळ पाणी साठवून ठेवू नका, यामुळे घरात डास होण्याची शक्यता असते.

 

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अक्षय तृतीयेला केवळ सोने- चांदीच नव्हे, तर ‘या’ वस्तू खरेदी करणेही शुभ
  • Pakistan: पाकिस्तानात पेटीएम-गुगल पे आणि फोन पे चालते का ? तेथे ऑनलाईन पेमेंट कसे होते ?
  • घरातील ‘या’ 5 गोष्टी कधीच रिकाम्या ठेवू नका, गरिबीच्या दिशेने सुरु होईल वाटचाल
  • युद्धविरामानंतर इराणचा सर्वात मोठा धक्का; भारत मोठ्या संकटात, मित्र असूनही शत्रूसारखा वागला
  • डोनाल्ड ट्रम्प थेट टोकाचा निर्णय घेणार… पण इराणविरुद्धचे युद्ध जिंकणार की हरणार? जगाची झोप उडवणारी भविष्यवाणी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in