• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

डासांना पळवण्यासाठी तुम्ही ‘कम्फर्ट अगरबत्ती’ लावता? त्यातल्या केमिकलबद्दल मोठा खुलासा

February 5, 2026 by admin Leave a Comment


अनेकांच्या घरात डासवर उपायकारक असणारी अगरबत्ती ‘कम्फर्ट’ असते. संध्याकाळ झाली की, डास पळवण्यासाठी अगरबत्ती लावली जाते. पण या अगरबत्तीनर मोठा कारवाई करण्यात आली आहे. भारतात घरगुती कीटकनाशकांच्या सुरक्षित वापराला प्रोत्साहन देणारी एक ना-नफा संस्था, होम इन्सेक्ट कंट्रोल असोसिएशन (HICA) ने बेकायदेशीर डास प्रतिबंधक अगरबत्ती ‘कम्फर्ट’ विरुद्ध सरकारी अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईचे स्वागत केले आहे. ‘कम्फर्ट’ अगरबत्तीची विक्री पूर्ण उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि दिल्ली राज्यांमध्ये केली जाते. ‘कम्फर्ट’ अगरबत्तीचं उत्पादन ‘धूप छांव कंपनी’ करते. खुल्या बाजारातून गोळा केलेल्या नमुन्यांवरून हे उत्पादन ग्राहकांना खुलेआम विकले जात असल्याचे पुष्टी झाली आहे.

महाराष्ट्र कृषी विभागाने केलेल्या प्रयोगशाळेतील चाचणीत, कम्फर्टमध्ये डायमफ्लुथ्रिन असल्याचे आढळून आले, हे एक बेकायदेशीर रसायन आहे ज्यासाठी कंपनीकडे वापरण्याची परवानगी नव्हती. मुंबईत छापा टाकताना अधिकाऱ्यांना ‘कम्फर्ट’ अगरबत्तींचे अनेक बॉक्स सापडले ज्यामध्ये डायमफ्लुथ्रिन होते. कंपनीकडे यासाठी कोणताच परवाना नव्हता एवढंच नाही तर, CIBRC कडून कोणती परवानगी देखील मिळालेली नव्हती. अशाप्रकारे, कीटकनाशक कायदा, 1968 आणि कीटकनाशक नियम, 1971 अंतर्गत ‘कम्फर्ट’ अगरबत्तींचे उत्पादन आणि विक्री दोन्ही बेकायदेशीर आहेत.

अनेक बेकायदेशीर अगरबत्ती हर्बल असल्याचा खोटा दावा करून विकल्या जात आहेत, तर त्यामध्ये बेकायदेशीर आणि सरकार-मान्यताप्राप्त रसायने असतात, ज्यात कम्फर्ट, स्लीपवेल आणि रिलॅक्स सारख्या नावांनी विकल्या जाणाऱ्या उत्पादनांचा समावेश आहे. यामुळे संपूर्ण भारतात बेकायदेशीर कीटकनाशके असलेल्या बेकायदेशीर डास प्रतिबंधक अगरबत्तींविरुद्ध कारवाई वाढली आहे.

होम इंसेक्ट कंट्रोल एसोसिएशन (CIBRC) चे सचिव, जयंत देशपांडे यांनी यावर वक्तव्य केलं आहे. ‘अम्ही कम्फर्टसारख्या अवैध डास पळवणाऱ्या अगरबत्ती विरोधात निर्णयाक आणि वेळेत योग्य ती कारवाई केल्यांमुळे सरकारचं कौतुक करत आहोत… अगरबत्ती प्रतिबंधक स्वरूपात डायमफ्लुथ्रिन सारख्या बेकायदेशीर आणि अवैध रसायनांचा गैरवापर अत्यंत चिंताजनक आहे, जो उत्तर प्रदेशातील लोकांसाठी धोका निर्माण करत आहे. अशी उत्पादने मंजुरीशिवाय जाणूनबुजून विकली जातात आणि ग्राहकांना दिशाभूल केली जाते. ज्यांच्यावर ही कारवाई केली जात आहे.’

सरकारच्या या निर्णयानंतर स्पष्ट संदेश पोहोचत आहे की, बेकायदेशीर उत्पादक आणि वितरकांना खपवून घेतले जाणार नाही. आम्ही सर्व राज्यामध्ये कारवाई अशा कारवाई करण्यासाठी प्रयत्न करत आहोत आणि ग्राहकांना फक्त वैध CIBRC नोंदणी क्रमांक असलेली डास प्रतिबंधक उत्पादने खरेदी करण्याचा सल्ला देत आहे.’



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • T20 World Cup : काही फरक पडत नाही, कोणी हारलं काय आणि जिंकलं काय? अंपायर कमावतात बक्कळ पैसा; आकडा ऐकून…
  • ना जया, ना रेखा, अमिताभ बच्चन यांची क्रश होती ही अभिनेत्री, सर्वांसमोर तिची चप्पल उचलली आणि….
  • सनस्क्रीन लावल्याने शरीरातील व्हिटॅमिन D खरंच कमी होतं? धक्कादायक सत्य समोर
  • घरातूनच काम मिळत नाही, बाहेरच्यांकडून काय अपेक्षा? केदार शिंदेंच्या भावाचा मोठा खुलासा
  • अजित पवार एकटे नाही तर हा मोठा नेताही अपघाताच्या दिवशी जाणार होता बारामतीला, शेवटच्या क्षणी…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in