• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

डायबिटीजमध्ये दूध आणि दही खाणे योग्य आहे का ? शुगर लेव्हल वाढू शकते? ,आयुर्वेद काय म्हणते ?

February 8, 2026 by admin Leave a Comment


आजच्या काळात डायबिटीजचा आजार कॉमन झाला आहे. अनेकांना चाळीशीनंतर शुगरचा त्रास सुरु होत आहे. डायबिटीज टाईप- 2 चे रुग्ण तर वाढतच आहेत. शिवाय टाईप-1 च्या रुग्णाचे प्रमाणही वाढत असून ते चिंताजनक आहे. डायबिटीजमध्ये योग्य आहार घेणे गरजेचे असते. त्यामुळे दूध आणि दही यासारखे पोषक पदार्थ डायबिटीज असलेल्यांनी खावेत की नाही खावेत या संदर्भात अनेकदा गैरसमज पसरत आहेत. यावर आयुर्वेदाचा सल्ला काय हे पाहणेही महत्वाचे आहे.

डायबिटीजमध्ये दूध आणि दही चालते का ?

डायबिटीजमध्ये दूध आणि दही खाऊ शकता. मात्र त्याचे प्रमाण कमी असावे. तसेच योग्य प्रकारे ते खाणे देखील गरजेचे असते. दूध आणि दही दोन्हींचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. त्यामुळे ब्लड शुगर वेगाने वाढत नाही. मात्र, दूध आणि दही योग्यवेळी योग्य प्रमाणात आणि कशात मिक्स करुन खावे हे देखील महत्वाचे असते.

फायदे काय ?

दूध आणि दही दोन्ही डायबिटीजच्या रुग्णांसाठी लाभदायक आहेत. कारण हे रक्तातील साखरचे प्रमाण नियंत्रित करण्यास मदत करते. यात कॅल्शियम आणि प्रोटीनचे प्रमाण जास्त असते. जे हाडांना मजबूत बनवण्यासाठी मदत करते. पोटातील चांगल्या बॅक्टेरियांना सपोर्ट करते आणि भूक नियंत्रणास मदतगार ठरते.

सेवनाची योग्य पद्धत काय ?

एक कप दूधात आणि दहीत ग्लायसेमिक इंडेक्स ३० ते ४० दरम्यान असतो. जो मधूमेहाच्या रुग्णांसाठी धोकादायक नाही. डायबिटीज रुग्णांनी एका दिवसात ५०० ग्रॅम दूध प्यावे. परंतू फुल फॅट असलेले दूध पिऊ नये. लो फॅट दूध प्यावे. मात्र,दुधात कोणताही पदार्थ गोड पदार्थ मिक्स करु नये. जर थोडे गोड खाण्याची इच्छा असेल तर दूधासोबत नॅचरली पिकलेल्या खजूराचा समावेश करु शकता. दूधाचे सेवन सकाळी आणि रात्री करु शकता. तर दह्याचे सेवन मात्र रात्री करु नये असे आयुर्वेदात म्हटले आहे. दह्यात देखील कोणताही गोड पदार्थ टाकू नये. चवीसाठी भाजलेले जिरे आणि काळे मीट टाकू शकता. एकावेळी वाटीभर दही खाणे पुरेसे आहे.

( डिस्क्लेमर – ही माहिती सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. योग्य माहितीसाठी आपल्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घ्यावा )



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • जर पाकिस्तानमध्ये हिंदू मुलीसोबत बळजबरीने लग्न केलं तर काय शिक्षा होते? ऐकून धक्का बसेल
  • दारु पिणं… छोटे कपडे घालणं… पुरुषांप्रमाणे…, महिलांबद्दल भाग्यश्रीचं खोचक वक्तव्य, Video व्हायरल
  • Baba Venga Prediction : या 4 राशींचा गोल्डन टाईम सुरू, पुढच्या 6 महिन्यात होणार चमत्कारीक बदल, बाबा वेंगांनी आधीच सांगितलंय
  • डायबिटीजमध्ये दूध आणि दही खाणे योग्य आहे का ? शुगर लेव्हल वाढू शकते? ,आयुर्वेद काय म्हणते ?
  • ENG vs NEP : आम्ही इथे…, इंग्लंडला ठसवल्यांनतर नेपाळच्या कॅप्टनची रोखठोक प्रतिक्रिया, रोहित काय म्हणाला?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in