• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेआधीच भारताचा सुपर 8 फेरीचा मार्ग सोपा! पाकिस्तानचं गणित बिघडलं

February 1, 2026 by admin Leave a Comment


टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचं यजमानपद भारत आणि श्रीलंकेकडे आहे. त्यामुळे पाकिस्तानला पोटदुखी झाली आहे. काही नाही काही कारणं पुढे करत पाकिस्तान कुरापती करत आहे. आता बांगलादेशवर अत्याचार झाल्याचं कारण पुढे करत भारताविरूद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकल्याचं सांगण्यात येत आहे. खरं तर मल्टीनेशन स्पर्धेतच भारत पाकिस्तान सामने होतात. तसेच दोन्ही देश एकमेकांच्या देशात खेळत नाहीत. त्यामुळे या सामन्यांसाठी तटस्थ ठिकाण निवडलं जातं. त्यामुळेच पाकिस्तानच्या सर्व सामन्यांचं आयोजन श्रीलंकेत केलं आहे. असं असताना पाकिस्तानने नाटकं सुरू केली आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सरकार निर्णय घेईल असा पवित्रा घेतला. त्यानंतर सरकारने भारताविरुद्ध खेळू नका असा निर्णय दिल्याचं बोललं जात आहे. म्हणजेच पाकिस्तान भारत वगळून इतर सर्वच देशांसोबत सामने खेळेल. त्यामुळे भारताचा फायदा झालाच आहे. सुंठीवाचून खोकला गेला असंच म्हणावं लागेल.

भारत पाकिस्तानविरुद्ध आशिया कप स्पर्धेत खेळला. त्यावेळी भारताने हँडशेक केलंच नाही. उलट पाकिस्तानला त्यांची जागा दाखवून दिली होती. तसेच पीसीबी अध्यक्ष आणि एशियन क्रिकेट असोसिएशनचे प्रमुखपदी असलेल्या पाकिस्तानी मोहसिन नक्वीच्या हातून ट्रॉफी घेण्यास नकार दिला. त्यामुळे पाकिस्तानची जगभर नाचक्की झाली. इतकंच काय तर मोहसिन नक्वींनी ट्रॉफी चोरून नेली. अद्याप ती भारतीय संघाला मिळाली नाही. खरं तर ती ट्रॉफी मिळाली नाही तरी जेतेपदाचा मान काही जात नाही. उलट पाकिस्तान ट्रॉफी चोर आहे असा ठपका लागला. आता पाकिस्तानने उचलेल्या पावलामुळे भारताला फायदा झाला आहे. भारताची सुपर 8 फेरीतील वाट सोपी झाली आहे.

पाकिस्तानने खरंच भारताविरूद्धचा सामना खेळणार नाही यावर ठाम राहिले तर टीम इंडियाचा फायदा आहे. भारताच्या खात्यात फुकटचे 2 गुण येतील. तसेच पाकिस्तानची पुढची वाट बिकट होईल. भारत असलेल्या अ गटात अमेरिका, नामिबिया, नेदरलँड आणि अमेरिका हे संघ आहे. त्यामुळे यापैकी तीन सामने जिंकले भारत सुपर 8 फेरीत जागा पक्की करेल. पण पाकिस्तानला चार पैकी तीन सामने काहीही करून जिंकावेच लागतील. अन्यथा पाकिस्तानचं सुपर 8 फेरीचं गणित चुकलंच समजा. मागच्या वर्ल्डकप 2024 स्पर्धेत असंच झालं होतं. अमेरिकेने पराभवाची धूळ चारली होती. सुपर 8 फेरीत जागा मिळाली नव्हती. पाकिस्तान चार पैकी 2 सामन्यात विजयी झाला होता. तर अमेरिकेने दोन सामने जिंकत आणि एक सामना ड्रॉ झाल्याने बाजी मारली होती.

पाकिस्तान सुपर 8 फेरीत पोहोचला तर…

पाकिस्तान सुपर 8 फेरीत पोहोचला तर भारत पाकिस्तान लढत काही होणार नाही. कारण दोन्ही संघ एका गटात येणार नाहीत. त्यामुळे सामना होण्याचा प्रश्न येणार नाही. पण उपांत्य फेरीत किंवा अंतिम फेरीत आमनेसामने येऊ शकतात. जर पाकिस्तानने हाच पवित्रा तेथेही कायम ठेवला तर भारताला फायदा होणार आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • IND vs PAK : पाकिस्तानविरूद्धचा सामना संपण्यापूर्वीच टीम इंडिया उपांत्य फेरीत, झालं असं की…
  • एपस्टीन फाईल्समुळे जगात खळबळ, पहिला राजीनामा पडला, ब्रिटीश राजकुमारावरही संकट
  • याला म्हणतात गाणं, 68 वर्षानंतरही प्रेक्षकांच्या ओठावर, ठरलं होतं सुपरहिट, तुम्ही ऐकाल तर…
  • हिरा चाटल्यामुळे खरंच मृत्यू होतो का? काय आहे नेमकं सत्य? तुम्हालाही ऐकून बसेल धक्का
  • वेगवेगळ्या मद्यांसोबत आईस्क्रीमचे हे 5 प्रकार ट्राय करतात लोक, काय आहे हा विचित्र ट्रेंड ?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in