• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

टी20 वर्ल्डकप 2026 जिंकवणारे हे खेळाडू संघाबाहेर होण्याची शक्यता, बुमराहचं खेळणंही कठीण

March 11, 2026 by admin Leave a Comment

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारताने जबरदस्त कामगिरी केली आणि जेतेपदावर नाव कोरलं. संपूर्ण स्पर्धेत भारताने सुपर 8 फेरीत फक्त एकच सामना गमावला. या व्यतिरिक्त संपूर्ण स्पर्धेत भारताचा वरचष्मा दिसला. एकंदरीत टीम इंडियाची कामगिरी जबरदस्त राहिली. आता हा संघ पुढच्या पर्वात खेळणार का? असा प्रश्न पडला आहे. कारण दोन वर्षांनी पुन्हा एकदा टी20 वर्ल्डकप स्पर्धा होणार आहे. त्यामुळे नवा संघ तयार केला जाणार का? कारण टी20 वर्ल्डकप 2028 स्पर्धेपूर्वी लॉस एंजेलिस ऑलिम्पिक स्पर्धेत टीम इंडिया उतरणार आहे. त्यामुळे बीसीसीआय काय निर्णय घेते याकडे लक्ष लागून आहे. त्यामुळे टी20 वर्ल्डकप विजयानंतरही काही खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, वनडे वर्ल्डकप 2027 पर्यंत गौतम गंभीरकडे प्रशिक्षकपदाची धुरा असणार आहे. चला जाणून कोणत्या खेळाडूंवर गडांतर येऊ शकते ते..

रिंकु सिंहला टी20 संघातून डच्चू मिळण्याची शक्यता आहे. कारण टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या 5 सामन्यात 8 च्या सरासरीने फक्त 29 धावा केल्या. रिंकु सिंह फिनिशरची भूमिका बजावण्यात अपयशी ठरला. त्यामुळे टीम इंडियाला शेवटच्या टप्प्यात संपूर्ण बॅटिंग ऑर्डर बदलावी लागली. संजू सॅमसनला फॉर्म गवसल्याने टीम इंडियाच्या जीवात जीव आला. पण दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात झालेला पराभव काही पचनी पडला नाही. या सामन्यात रिंकु सिंहकडून फार अपेक्षा होत्या. पण त्याच्याकडून अपेक्षाभंग झाला.

मोहम्मद सिराजच्या जागेवरही प्रश्नचिन्ह आहे. हर्षित राणा दुखापतग्रस्त झाल्याने त्याला संघात संधी मिळाली. सिराजने अमेरिकेविरुद्ध एकमेव सामना खेळला आणि दोन विकेट घेतल्या. त्यानंतर संपूर्ण स्पर्धा बेंचवर बसून पाहिली. हर्षित राणा फिट होताच मोहम्मद सिराजचा पत्का संघातून कापला जाण्याची शक्यता आहे.

जसप्रीत बुमराहचं काय?

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेनंतर टीम इंडियाचं पुढचं लक्ष्य 2027 वनडे वर्ल्डकप असणार आहे. पीटीआयच्या रिपोर्टनुसार, आयपीएलच्या शेवटी नॅशनल सिलेक्शन कमिटी आणि व्हीव्हीएस लक्ष्मणच्या नेतृत्वातील सेंटर ऑफ एक्सीलेंस, गौतम गंभीर आणि कर्णधार शुबमन गिल हे वनडे वर्ल्डकपसाठी ब्लू प्रिंट तयार करतील. यात महत्त्वाचं म्हणजे बुमराहचं वर्कलोड मॅनेजमेंट असणार आहे. पुढच्या वर्षीच्या वर्ल्डकप स्पर्धेपर्यंत भारत 30 ते 35 वनडे सामने खेळणार आहे. या सामन्यात बुमराहला खेळण्यासाठी खास रणनिती आखली आहे. बुमराहने 2023 वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर एकही वनडे सामना खेळलेला नाही. त्यामुळे त्याला आता टी20 क्रिकेटमध्ये आराम दिला जाण्याची शक्यता आहे.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • हुंडईचा मोठा धमाका! ग्रँड i10 निओसचे नवीन मॉडेल लाँच, किंमत किती?
  • स्कोडाची ऑफर, कार खरेदीवर तब्बल 3.5 लाखांची भरघोस सूट
  • अमरनाथ यात्रेला जात असाल तर तुमच्या बॅग पॅकिंगमध्ये या वस्तू नक्की ठेवा, वाचा यादी
  • इस्त्रायल हादरलं, युद्धविरामानंतर पहिल्यांदाच सर्वात मोठा हल्ला, थेट…, युद्ध पुन्हा पेटणार? जगभरात मोठी खळबळ
  • नव्या Flying Flea C6 इलेक्ट्रिक बाईकसाठी किती EMI बसेल? ‘हे’ गणित जाणून घ्या

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in