• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी आणखी एक खेळाडू दुखापतग्रस्त, खांद्याच्या दुखापतीमुळे आऊट

February 2, 2026 by admin Leave a Comment

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेसाठी मोजून दोन ते तीन दिवस शिल्लक राहिले आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्वच संघांनी कंबर कसली असून जोरदार सराव सुरू आहे. पण या स्पर्धेपूर्वी श्रीलंकेला धक्का बसला आहे. कारण श्रीलंकेचा उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज एशान मलिंग दुखापतग्रस्त झाला आहे. त्यामुळे त्याला टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेला मुकावं लागलं आहे. श्रीलंकन मिडिया रिपोर्टनुसार, इंग्लंडविरूद्धच्या टी20 मालिकेत एशान मलिंगा दुखापतग्रस्त झाला. त्यामुळे टी20 वर्ल्डकप स्पर्धेत खेळणं कठीण झालं आहे. त्याच्या खांद्याला गंभीर दुखापत आहे. त्यातून सावरण्यासाठी त्याला सहा आठवड्यांचा कालावधी लागू शकतो. पण तिथपर्यंत टी20 वर्ल्डकप स्पर्धा संपून जाईल. त्यामुळे संघातून बाद झाला असून श्रीलंकेचं टेन्शन वाढलं आहे. कारण एशान मलिंगाची विकेट टेकर गोलंदाज म्हणून ख्याती आहे. पण आता स्पर्धेत खेळणार नाही हे स्पष्ट झाल्याने श्रीलंकन क्रीडाप्रेमींचा हिरमोड झाला आहे.

24 वर्षीय एशान मलिंगाने श्रीलंकेसाठी 7 वनडे आणि 8 टी20 सामने खेळले आहेत. टी20 क्रिकेटमध्ये त्याने 8 विकेट घेतल्या आहे. तर आयपीएल स्पर्धेतही मागच्या पर्वात छाप सोडली होती. सनरायझर्स हैदराबादसाठी खेळताना 7 सामन्यात 13 विकेट घेतल्या होत्या. एशानचा 31 धावा देत 3 विकेट ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. आयपीएल स्पर्धेतील या कामगिरीनंतर एशानच्या गोलंदाजीचं कौतुक होऊ लागलं. त्याचा फायदा श्रीलंकेलाही झाला आणि होणार होता. पण दुर्दैवाने टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी एशानला दुखापत झाली.

एशान मलिंगा दुखापतग्रस्त होऊन स्पर्धेला मुकल्यानंतर त्याची जागा कोण घेणार? असा प्रश्न आहे. त्याची जागा घेण्यासाठी दोन वेगवान गोलंदाज स्पर्धेत आहे. श्रीलंकन मीडियानुसार, दिलशान मधुशंका आणि प्रमोद मधुसूदन यापैकी एका टी20 वर्ल्डकप खेळण्याची संधी मिळू शकते. श्रीलंकेने 1 फेब्रुवारीला टी20 संघाची घोषणा केली असून धुरा दासुन शनाकाच्या खांद्यावर दिली आहे.

टी20 वर्ल्डकपसाठी श्रीलंकन संघ : दासुन शनाका, पथुम निसंका, कामिल मिशारा, कुसल मेंडिस, चरिथ असालंका, कुसल परेरा, कामिंडु मेंडिस, जनिथ लियानागे, पवन रत्नायके, वानेंदु हसारंगा, दुनिथ वेलालगे, महीश तीक्षणा, दुष्मंता चमीरा, मथीशा पथिराना.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • इलेक्ट्रिक किटली मध्ये फक्त चहा आणि कॉफीच नाही तर ‘हे’ पदार्थ देखील काही मिनिटांमध्ये होतात तयार
  • Sanjay Raut : शिंदेंच्या पक्षाचीच डेडबॉडी झालीय, फडणवीसांकडून ऑपरेशन सुरू – ‘ऑपरेशन टायगर’वरून राऊतांचा घणाघात
  • डोनाल्ड ट्रम्प यांच्या कुटुंबात मोठा कलह, थेट पत्नीनेच ट्रम्प यांच्याविरोधात धक्कादायक…
  • लग्नासाठी मुसलमान झाली… वयाच्या 23 व्या वर्षी घेतला मोठा निर्णय… आज कसं आयुष्य जगतेय प्रसिद्ध अभिनेत्री?
  • उत्तम बॅटरी पॉवर आणि दमदार फिचर्स, जाणून घ्या वनप्लस नॉर्ड 6 ची किंमत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in