• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत श्रीलंकेचं आव्हान संपुष्टात, सनथ जयसूर्याने लगेच मोठा निर्णय घेतला

March 1, 2026 by admin Leave a Comment

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील सुपर 8 फेरीत श्रीलंकेला एकही सामना जिंकता आला नाही. शेवटच्या सामन्यातही पाकिस्तानने इंग्लंडला 5 धावांनी पराभूत केलं. त्यामुळे या स्पर्धेतील श्रीलंकेचा शेवटही कटू झाला. श्रीलंकेचा मुख्य प्रशिक्षक सनथ जयसूर्या यानेही या निराशाजनक कामगिरीनंतर मोठा निर्णय घेण्याची तयारी केली आहे. मुख्य प्रशिक्षकपदावरून पायउतार होण्याच निर्णय घेतला आहे. टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येताच त्याने याबाबत जाहीररित्या सांगितलं आहे. जयसूर्याचा श्रीलंकन संघासोबतचा करार जून 2026 पर्यंत आहे. त्यामुळे अफगाणिस्तानविरुद्ध 13 ते 25 मार्च दरम्यान होणाऱ्या व्हाईट बॉल मालिकेसाठी हे पद भूषवणार की नाही हे स्पष्ट केलं नाही. पाकिस्तानविरुद्धचा सामना 5 धावांनी गमावल्यानंतर सनथ जयसूर्या याने आपलं मन मोकळं केलं.

सनय जयसूर्या म्हणाला की, ‘मला वाटलं की मी ते पद दुसऱ्या कोणाला तरी द्यायला हवं. म्हणूनच मी दोन महिन्यांपूर्वी इंग्लंड मालिकेदरम्यान सांगितले होते की माझा मनात इथे राहण्याचा कोणताही विचार नाही. तो निर्णय घेतल्यानंतर मला वाटलं की विश्वचषक स्पर्धेनंतर मी येथून चांगल्या पद्धतीने जाऊ शकेन. मी जितका विचार केला होता तितके मी करू शकलो नाही. मला त्याबद्दल वाईट वाटते.’

“मी हे सांगितल्यानंतर माझी श्रीलंका क्रिकेटशी चर्चा झालेली नाही. त्यांना माहित नाही की मी असं काही सांगणार आहे. परंतु मी त्यांच्याशी निश्चितपणे चर्चा करणार आहे. मी त्यांना सांगितले आहे की जर त्यांना बदली व्यक्ती मिळू शकला तर नक्कीच पायउतार होईन.” जयसूर्या म्हणाला. सनथ जयसूर्याने जुलै 2024 मध्ये श्रीलंकेचं प्रशिक्षकपद हाती घेतलं हों. यानंतर घरच्या मैदानावर भारताविरुद्ध वनडे मालिका जिंकली. तसेच श्रीलंकेला इंग्लंडमध्ये या कारकिर्दीत कसोटी विजय मिळला.

‘मी माझ्या दीड वर्षात या संघाला पुढे नेले आहे. आम्ही चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्रही झालो नव्हतो, पण मी संघाला एकदिवसीय सामन्यात चौथ्या क्रमांकावर नेले. मी कसोटी संघाला सहाव्या क्रमांकावर आणले. मी टी20 संघाला सहाव्या क्रमांकावर आणले. या सर्वांसाठी, मी संघाला एकूण 50 टक्के विजय दराने नेले. मी ते एकट्याने केले नाही; माझ्या सपोर्ट स्टाफने मला त्यासाठी खूप पाठिंबा दिला. मी सुरुवात केल्याच्या पहिल्या दिवसापासूनच मी त्यांना मदत करण्यास सांगितले. म्हणून, मला वाटते की मी जे केले त्याबद्दल मी आनंदी असू शकतो.’, असंही सनथ जयसूर्या पुढे म्हणाला.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • GK : फक्त 30 मिनिटे झोपणारा प्राणी, उभं राहून मारतो डुलकी
  • हंसिका मोटवानीने वहिनीलाच म्हटलं ‘सी-ग्रेड अभिनेत्री’; मानहानीचा खटला दाखल, नेमकं काय घडलं?
  • अक्षय तृतीयेला मीठ खरेदी करणे का शुभ आहे? जाणून घ्या शास्त्रीय कारण…..
  • ‘मनबाधा’ चिरंतराची एक अथक जखम… प्रसिद्ध कवी प्रवीण दवणे यांनी डिंगणकर यांच्या पुस्तकाचे मांडले विविध पैलू
  • तुम्हाला चावलेला साप विषारी की बिनविषारी? एका झटक्यात ओळखा, जंगलामध्ये आदिवासी वापरतात ही सोपी ट्रीक

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in