• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येताच कर्णधारपद गेलं, या खेळाडूकडे सोपवली धुरा

March 6, 2026 by admin Leave a Comment

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या जेतेपदाचा मानकरी कोण असेल? हे 8 मार्चच्या रात्री कळेल. पण या जेतेपदाच्या सामन्यापूर्वी उर्वरित संघांमध्ये बऱ्याच उलथापालथी सुरू झाल्या आहेत. काही संघांनी या स्पर्धेत हवी तशी कामगिरी केली नाही. त्याचा परिणाम आता दिसू लागला आहे. क्रिकेट बोर्ड आता संघांमध्ये बदल करण्यास सरसावले. टी20 वर्ल्डकप स्पर्धेनंतर होणाऱ्या मालिकांसाठी संघ जाहीर केले आहेत. त्या संघात महत्त्वाचे बदल दिसत आहे. पाकिस्तानने बांग्लादेश दौऱ्यासाठी संघ जाहीर केला. या संघातून बाबर आझमला वगळण्यात आलं आहे. तसेच दिग्गज खेळाडूंना संघाबाहेर काढलं आहे. असाच काहीसा बदल आता अफगाणिस्तान संघात दिसून येत आहे. अफगाणिस्तानचा संघ टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या पहिल्याच फेरीतून बाद झाला. त्यानंतर कर्णधार राशिद खानचं कर्णधारपद गेलं आहे. त्याच्या जागी सलामीवीर इब्राहिम झाद्रान याच्याकडे कर्णधारपद सोपवलं आहे.

अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने 5 मार्चला श्रीलंकेविरुद्ध होणार्‍या वनडे आणि टी20 मालिकेसाठी संघाची घोषणा केली आहे. या संघाची घोषणा करताना कर्णधार बदलल्याचंही जाहीर केलं आहे. “एसीबीच्या दीर्घकालीन धोरणात्मक दृष्टिकोनानुसार आणि आमच्या संघ व्यवस्थापनात अलिकडच्या काळात झालेल्या बदलांनंतर हा निर्णय घेतला आहे. नवीन मुख्य प्रशिक्षकाची नियुक्ती झाली आहे, आम्ही टी20 संघात नेतृत्व बदलण्याचा विचारपूर्वक निर्णय घेतला आहे,” असे एसीबीचे मुख्य निवडकर्ता अहमद शाह सुलीमंखिल यांनी सांगितलं.

🚨 SQUAD ANNOUNCEMENT ALERT! 🚨

Here are our squads for the upcoming White Ball Series against Sri Lanka. 👍

Read More: https://t.co/2y6o5AfgF5 pic.twitter.com/QKcz0FGoVp

— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) March 5, 2026

अफगाणिस्तानचा टी20 संघ : इब्राहिम झदरन (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), नूर रहमान, सेदीकुल्लाह अटल, दरविश रसूली, शाहीदुल्ला कमाल, अजमातुल्ला उमरझाई, मोहम्मद नबी, शराफुद्दीन अश्रफ, रशीद खान, नूर अहमद, मुजीब उर रहमान, झिया उर रहमान शरीफी, फरीद अहमद मलिक आणि अब्दुल्लाह अहमद मलिक.

राखीव: नांग्याल खरोती, बिलाल सामी आणि इजाज अहमदझाई.

अफगाणिस्तानचा वनडे संघ : हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), रहमत शाह (उपकर्णधार), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इकराम अलीखिल (विकेटकीपर), इब्राहिम झदरन, सेदीकुल्ला अटल, दरविश रसूल, अजमतुल्ला ओमरझाई, मोहम्मद नबी, रशीद खान, नांग्याल खरोती, एएम गझनफर, झिया उरीद मलिक, फयरे अहमद शरीफलमी, फईल अहमद साईदलमी, इब्राहिम झदरान.

राखीव: कैस अहमद, मोहम्मद सलीम साफी आणि बशीर अहमद.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • RR vs RCB : वैभवची विस्फोटक खेळी, राजस्थानचा विजयी चौकार, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा
  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?
  • IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज, नंबर 1 कोण?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in