• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात सहाव्यांदा सुपर ओव्हरची वेळ, आतापर्यंत कसं काय घडलं ते जाणून घ्या

February 11, 2026 by admin Leave a Comment


टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या पहिल्या दिवसापासून विक्रमांची रांग लागली आहे. आता पाचव्या दिवशी सुपर ओव्हरचा थरारही अनुभवता आला आहे. दक्षिण अफ्रिका आणि अफगाणिस्तान सामन्यात एक नाही तर दोन सुपर ओव्हर टाकाव्या लागल्या. या सामन्यात दक्षिण अफ्रिकेने बाजी मारली. (Photo: Afghanistan Cricket X)

दक्षिण अफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना 187 धावा केल्या आणि विजयासाठी 188 धावा दिल्या. अफगाणिस्तानचा संघ सर्व गडी गमवून 187 धावा करू शकला आणि सामना ड्रॉ झाला. पहिल्या सुपर ओव्हरमध्ये अफगाणिस्तानने 17 धावा केल्या आणि 18 धावांचं विजयी आव्हान दिलं. पण दक्षिण अफ्रिकेचा संघ 17 धावा करू शकला. त्यामुळे दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये सामना गेला. या सामन्यात दक्षिण अफ्रिकने 23 धावा केल्या आणि 24 धावांची विजयी आव्हान दिलं. अफगाणिस्तानने 19 धावा केल्या 4 धावांनी सामना गमावला. (Photo: Afghanistan Cricket X)

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात सहाव्यांदा सामना बरोबरीत सुटला आणि त्याचा निकाल सुपर ओव्हरमध्ये लागला. 2007 मध्ये भारत पाकिस्तान सामन्याचा बॉल आऊटमध्ये लागला होता. त्यानंतर 2012 मध्ये श्रीलंका विरूद्ध न्यूझीलंड आणि न्यूझीलंड विरुद्ध वेस्ट इंडिज सामना ड्रॉ झाला होता. 2024 टी20 वर्ल्डकप स्पर्धेत नामिबिया विरुद्ध ओमान आणि अमेरिका विरुद्ध पाकिस्तान सामना ड्रॉ झाला होता. आता सहाव्यांदा दक्षिण अफ्रिका आणि अफगाणिस्तान सामना ड्रॉ झाला आहे. (Photo: Afghanistan Cricket X)

दक्षिण अफ्रिका टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात दुसऱ्यांदा सुपर ओव्हर खेळली. या दोन्ही सामन्यात दक्षिण अफ्रिकेने विजय मिळवला आहे 2019 मध्ये केपटाऊनमध्ये झालेल्या सामन्यात दक्षिण अफ्रिकेने श्रीलंकेचा पराभव केला होता. तर 2026 मध्ये दक्षिण अफ्रिकेने अफगाणिस्तानला पराभवाची धूळ चारली आहे. (Photo: Afghanistan Cricket X)

अफगाणिस्तान टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात सुपर ओव्हरमध्ये सामना गमवण्यीच ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी 2020 मध्ये आयर्लंडविरुद्ध सुपर ओव्हरमध्ये सामना गमावला होता. 2024 मध्ये भारताविरुद्ध दोन सुपर ओव्हर खेळण्याची वेळ आली होती. यावेळी भारताने बाजी मारली होती. आता टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेत दक्षिण अफ्रिकेने दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये अफगाणिस्तानला पराभूत केलं. (Photo: Afghanistan Cricket X)



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • IPL 2026: वैभव सूर्यवंशी जाणीवपूर्वक करतोय दिग्गज गोलंदाजांना लक्ष्य! असं कारण तर नाही ना?
  • Photo : असीम मुनीरसोबत असणारी महिला कोण? संपूर्ण जगात का होतेय चर्चा?
  • मोठी बातमी! युद्धविरामाची चर्चा फिस्कटणार? अमेरिकेचा इराणला जबर धक्का, ज्याची भीती होती तेच घडलं
  • ‘या’ ट्रिक्सच्या मदतीने संत्र्याच्या सालीपासून घरच्या घरी बनवा व्हिटॅमिन सी युक्त अँटी-एजिंग सीरम
  • पाकिस्तानचा इराणसोबत डबल गेम तर नाही ना ? सौदीत अरबमधल्या कृतीने संशयाला बळ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in