• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

टी20 वर्ल्डकप जेतेपद मिळवणाऱ्या संघाला मिळणार इतके कोटी! उपविजेता संघही होणार मालामाल

March 1, 2026 by admin Leave a Comment

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत उपांत्य फेरीचे तीन संघ ठरले आहे. गट 2 मधून इंग्लंड आणि न्यूझीलंड हे संघ उपांत्य फेरीत गेले आहेत. तर गट एक मधून दक्षिण अफ्रिकेने उपांत्य फेरीत जागा मिळवली आहे. तर चौथा संघ भारत-वेस्ट इंडिज या सामन्यातून ठरेल. टी20 वर्ल्डकप स्पर्धेचा अंतिम सामना 8 मार्चला होणार आहे. या स्पर्धेत एकूण 20 संघांनी भाग घेतला होता. त्यापैकी 12 संघांचा साखळी फेरीत प्रवास संपला. त्यानंतर सुपर 8 फेरीतून चार संघ बाहेर पडले. आता उपांत्य फेरीत चार संघ पोहोचतील आणि त्यापैकी 2 संघांना बाहेर पडावं लागणार हे निश्चित आहे. तर अंतिम फेरीत एका संघाला पराभवाचं तोंड पाहून उपविजेत्या पदावर समाधान मानावं लागेल. पण असं असताना या स्पर्धेत भाग घेणाऱ्या संघांना किती बक्षिसी रक्कम मिळत असावी? असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. जेतेपद मिळवणाऱ्या संघाला किती रक्कम मिळणार? वगैरे प्रश्न पडत आहे. असाच प्रश्न तुम्हाला पडला असेल. त त्याचं उत्तर तुम्हाला पुढे मिळेल.

आयसीसीकडून एकूण 120 कोटींचं बक्षिसी रक्कम

आयसीसी जेतेपद मिळवणाऱ्या संघाला स्मृतीचिन्ह म्हणून ट्रॉफी देते. पण बक्षिसाची रक्कम किती देत असेल? मिडिया रिपोर्टनुसार, टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेसाठी एकूण 13.5 मिलियन डॉलर रक्कम निश्चित करण्यात आहे. भारतीय रूपयात ही रक्कम जवळपास 120.37 कोटी रुपये आहे. त्यामुळे यापैकी विजेत्या संघाला मोठी रक्कम मिळणार यात काही शंका नाही. या स्पर्धेचं जेतपद मिळवणाऱ्या संघाला जवळपास 27.48 कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे. 2024 मध्ये जेतेपद मिळवणाऱ्या संघाला 20 कोटी मिळाले होते. पण आता ही रक्कम 7.48 कोटींनी वाढली आहे. तर उपविजेत्या संघाचीही चांदी होणार आहे. कारण त्यांनाही 14.65 कोटी रुपये बक्षीस म्हणून मिळणार आहेत.

उपांत्य फेरीत पराभूत होणाऱ्या संघाला 7.24 कोटी रुपये. पाचव्या ते 12 व्या स्थानावर असलेल्या संघाना 3.48 कोटी रुपये मिळतील. तर 13 व्या पासून 20 व्या स्थानावर असलेल्या संघांना 2.29 कोटी रुपये मिळतील. तसेच या स्पर्धेत प्रत्येक विजयासाठी एक रक्कम ठरवलेली आहे.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अक्षय तृतीयेच्‍या दिवशी ‘या’ वस्तूंचे करा गुप्तपणे दान, आर्थिक अडथळे होतील दूर
  • Vaibhav Sooryavanshi : बुमराह-बोल्ट विरुद्ध पास, वयाची अटही पूर्ण, वैभव सूर्यवंशी टीम इंडियासाठी खेळणार, कोच मनीष झा यांना विश्वास
  • अग्निवीर लेखी परीक्षेसाठी इंडियन आर्मीने जारी केले सँपल पेपर, असे डाऊन लोड करा
  • महिलांनी मासिक पाळीत तीर्थयात्रा करावी का? प्रेमानंद महाराजांनी दिलं मोठं उत्तर
  • GK : डीप फ्रीजरचे तापमान किती असते? आकडा वाचून झोप उडेल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in