• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

टीव्ही 9 नेटवर्कच्या व्यासपीठावर दिग्गज खेळाडूंची मांदियाळी, 23-24 मार्चला कार्यक्रमाचं आयोजन

March 21, 2026 by admin Leave a Comment

Satta Sammelan 2026: टीव्ही 9 नेटवर्कचा ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे समिट 2026’ कार्यक्रमाचं आयोजन दिल्लीत करण्यात आलं आहे. 23 मार्चला WITT Summit होणार आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी हजेरी लावणार आहेत. त्यानंतर 24 मार्चला सत्ता संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. यात राजकीय, कला, व्यवसाय आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे क्रीडाक्षेत्रातील दिग्गजही हजेरी लावणार आहे. टीव्ही 9 च्या सत्ता संमेलनात यावेळी भारतीय क्रिकेटमधील दिग्गज खेळाडूंची उपस्थिती असणार आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींमध्ये आतापासूनच उत्साहाचं वातावरण आहे. दिग्गज खेळाडू या कार्यक्रमात काय बोलतात? याकडे लक्ष असणार आहे. टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल उपस्थिती लावणार आहे. टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा जिंकवण्यात त्याचंही योगदान होतं. अक्षर पटेलने टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत सात सामने खेळले आणि 18.63 च्या सरासरीने 11 विकेट काढल्या. त्यामुळे काय किस्से सांगतो याबाबत आतापासूनच उत्सुकता आहे.

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग देखील टीव्ही 9 नेटवर्कच्या सत्ता संमेलन कार्यक्रमात हजेरी लावणार आहे. टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत त्याने चागंली कामगिरी केली होती. विशेष म्हणजे पावर प्ले आणि डेथ ओव्हरमध्ये फलंदाजांना रोखण्याचं काम केलं. त्याने टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या 8 डावात 9 विकेट काढल्या. दुसरीकडे, टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली देखील या कार्यक्रमात उपस्थिती लावणार आहे. सौरव गांगुलीच्या नेतृत्वातच टीम इंडियाने आक्रमकपणे खेळण्यास सुरूवात केली. आज त्याचा लाभ होताना दिसत आहे. याबाबत माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग, राहुल द्रविड, मोहम्मद कैफ यांनी सांगितलं आहे. टीव्ही 9 नेटवर्क सत्ता संमेलनात भाग घेत सौरव गांगुलीकडून आणखी काही पैलूंवर माहिती मिळू शकते.

दीप्ती शर्माही लावणार हजेरी

वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेत अष्टपैलू कामगिरी करणारी दीप्ती शर्माही या कार्यक्रमात भाग घेणार आहे. भारताला पहिला महिला वनडे वर्ल्डकप जिंकून देण्यात तिचा मोलाचा हातभार राहिला. फलंदाजी आणि गोलंदाजीत तिने ही कामगिरी करून दाखवली. तर भारतीय महिला क्रिकेट संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक अविष्कार साल्वीही या कार्यक्रमात भाग घेणार आहेत.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Sanjay Raut : शिंदेंच्या पक्षाचीच डेडबॉडी झालीय, फडणवीसांकडून ऑपरेशन सुरू – ‘ऑपरेशन टायगर’वरून राऊतांचा घणाघात
  • डोनाल्ड ट्रम्प यांच्या कुटुंबात मोठा कलह, थेट पत्नीनेच ट्रम्प यांच्याविरोधात धक्कादायक…
  • लग्नासाठी मुसलमान झाली… वयाच्या 23 व्या वर्षी घेतला मोठा निर्णय… आज कसं आयुष्य जगतेय प्रसिद्ध अभिनेत्री?
  • उत्तम बॅटरी पॉवर आणि दमदार फिचर्स, जाणून घ्या वनप्लस नॉर्ड 6 ची किंमत
  • शिवाली परब, वनिता खरात, नम्रता संभेराव.. हास्यजत्रेचे कलाकार गौरव मोरेच्या नवीन घरी का आले नाही?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in