
हॉलिवूडमधील सुपरहिट ठरलेल्या चित्रपटांच्या यादीमधील एक चित्रपट म्हमजे ‘टायटानिक.’ या चित्रपटातील जॅकच्या लव्हस्टोरीने जगभरातील चाहत्यांच्या मनावर राज्य केले होते. या चित्रपटात अभिनेता लिओनार्डो डिकॅप्रियोने जॅकची भूमिका साकरली होती. आता जॅकचे भारताशीही एक खास कनेक्शन असल्याचे समोर आले आहे. लिओनार्डो डिकॅप्रियोने स्वत: एका मुलाखतीमध्ये कुटुंबाबद्दल बोलताना याविषयी सांगितले आहे. त्यांच्या या खुलाशाने केवळ त्यांच्या चाहत्यांनाच नव्हे तर सह-अभिनेता ब्रॅड पिटलाही आश्चर्याचा धक्का बसला.
टाइम मॅगझिनला दिलेल्या नव्या मुलाखतीत लिओनार्डो डिकॅप्रियोने आपल्या कुटुंबाबद्दल पहिल्यांदाच उघडपणे बोलला आहे. त्याने खुलासा केला की त्याची सावत्र आई शिख आहे. अभिनेत्याने सांगितले की, ‘माझी सावत्र आई शिख आहे. माझे वडील हिप्पी काउंटर कल्चरमधून आले आहेत. ते सॅन फ्रान्सिस्को आणि लॉस एंजेलिसमध्ये लहानाचे मोठे झाले आहेत. ते ७० च्या दशकातील लॉस एंजेलिसमधील अंडरग्राउंड आर्ट मूव्हमेंटशी जोडलेल्या अनेक लोकांसोबत वेळ घालवायचे.’
सावत्र आई पेगी डिकॅप्रियो दस्तार घालतात
त्याची सावत्र आई, पेगी डिकॅप्रियो अमृतधारी शिख आहेत. पेगी डिकॅप्रियो पगडी घालतात आणि अनेकदा पारंपरिक भारतीय कपड्यांमध्ये दिसतात. सूत्रांच्या माहितीनुसार, त्यांनी अनेक वर्षांपूर्वी हा संप्रदाय स्वीकारला होता पण पगडी घालणे त्यांनी काही वर्षांपूर्वीच सुरू केले. पेगीने १९९५ मध्ये जॉर्ज डिकॅप्रियोशी लग्न केले आणि त्यांचा एक मुलगा आहे, जो लिओनार्डोचा सावत्र भाऊ अॅडम फरार आहे.
पेगी, जॉर्जची दुसरी पत्नी आहेत. जॉर्जने लिओनार्डोची आई, इर्मेलिन इंडेनबिर्केनला घटस्फोट दिला होता जेव्हा अभिनेता फक्त एक वर्षाचा होता. लिओनार्डोशी संबंधित हे सत्य जाणून चाहत्यांनीही खूप प्रतिक्रिया दिल्या आहेत आणि म्हणाले, ‘यामुळे माझे त्यांच्याबद्दलचे प्रेम आणखी वाढली!’ दुसऱ्या एका चाहत्याने म्हटले, ‘लिओनार्डो डिकॅप्रियोची सावत्र आई शिख असणे हा एक अतिशय इंटरेस्टिंग फॅक्ट आहे जो मला खूप आवडला.’
ब्रॅड पिटला विश्वासच बसला नाही
दरम्यान, लिओनार्डोने सांगितले की त्यांच्या वडिलांनी एकदा सावत्र आईसोबत ‘वन्स अपॉन अ टाइम इन हॉलीवूड’ च्या सेटवर येऊन भेट दिली होती. त्यांच्या सह-अभिनेत्या ब्रॅड पिटला विश्वासच बसला नाही की ते त्यांचे आई-वडील आहेत. लिओने सांगितले, ‘मला आठवते जेव्हा मी ब्रॅडला सांगितले- ते माझे बाबा आणि माझी सावत्र आई आहेत आणि ते म्हणाले- हो, बरोबर! मी म्हणालो नाही, हे खरेच ते आहेत! ते म्हणाले- हो! बरोबर, मी म्हणालो मला माहिती आहे की या सिनेमात ते उत्कृष्ट अभिनेते दिसत आहेत, पण हे खरेच ते आहेत, ते रोज असे कपडे घालतात. हा एक अप्रतिम क्षण होता.’
Leave a Reply