• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

‘टायटॅनिक’ जर बॉलिवूडमध्ये बनला असता तर कोण असते कलाकार? AI ने दाखवलं, Video पाहून…

February 8, 2026 by admin Leave a Comment


AI च्या युगात क्रिएटिव्हिटीला अक्षरशः नवे पंख मिळाले असून सोशल मीडियावर दररोज नवनवीन आणि कल्पनाशक्तीला चालना देणारे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. अशाच एका अनोख्या AI-जनरेटेड व्हिडीओने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. या व्हिडीओमध्ये हॉलीवूडमधील आयकॉनिक रोमँटिक चित्रपट ‘टायटॅनिक’ जर बॉलिवूडमध्ये बनला असता तर रोज आणि जॅकच्या भूमिका कोणी साकारल्या असत्या याची कल्पना दाखवण्यात आली आहे.

या AI रिइमॅजिनिंगमध्ये केट विंसलेटच्या रोजच्या भूमिकेत ऐश्वर्या राय तर लिओनार्डो डिकॅप्रियोच्या जॅकच्या भूमिकेत हिंदी सिनेसृष्टीतील पहिले सुपरस्टार राजेश खन्ना यांना दाखवण्यात आलं आहे. हे दृश्य पाहून चाहत्यांना जणू एखाद्या वेगळ्याच विश्वात नेल्यासारखं वाटत आहे.

AI कलाकार सौविकची भन्नाट कल्पना

हा व्हिडीओ सौविक नावाच्या AI आर्टिस्ट आणि शॉर्ट फिल्ममेकरने तयार केला आहे. तो सोशल मीडियावर ‘Mr. Hellrocker’ या नावाने ओळखला जातो. त्याने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये ‘टायटॅनिक’मधील अनेक अविस्मरणीय सीन ऐश्वर्या राय आणि राजेश खन्ना यांच्या चेहऱ्यांसह सादर केली आहेत.

रोज प्रथमच सूट घालून जॅकला भेटण्यासाठी हॉलवेमधून येते तो सीन असो किंवा टायटॅनिकच्या डेकवर उभं राहून हात पसरवण्याचं अजरामर सीन. हे सगळे सीन ऐश्वर्या आणि राजेश खन्ना यांच्या रूपात पाहताना चाहत्यांना प्रचंड रोमांचक अनुभव मिळतो आहे.

या AI-जनरेटेड व्हिडीओमध्ये तरुण, देखणा राजेश खन्ना जॅक डॉसनच्या भूमिकेत खूपच शोभून दिसत आहेत. तर ऐश्वर्या रायला रोजच्या प्रसिद्ध ‘हार्ट ऑफ द ओशन’ नेकलेससह दाखवण्यात आलं आहे. रोजची मासूमियत, सौंदर्य आणि भावुकता ऐश्वर्याच्या चेहऱ्यावर अगदी नैसर्गिकपणे उमटताना दिसते आहे.

या व्हिडीओसोबत सौविकने कॅप्शन दिलं आहे, ‘जर टायटॅनिक बॉलिवूडमध्ये बनला असता तर? एक अनपेक्षित कोलॅबोरेशन ऐश्वर्या राय रोजच्या भूमिकेत आणि राजेश खन्ना जॅकच्या भूमिकेत’.

 

View this post on Instagram

 

A post shared by Souvik Rooj (@mr.hellrocker)

सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

हा व्हिडीओ पाहून चाहते थक्क झाले आहेत. अनेकांनी कमेंट्समधून आपली भावना व्यक्त केली आहे. एका चाहत्याने लिहिलं, राजेश खन्ना सर जॅकच्या भूमिकेत एकदम परफेक्ट वाटतात. तर दुसऱ्याने म्हटलं, ऐश्वर्या तर रोजपेक्षाही जास्त रोज वाटते. आणखी एका कमेंटमध्ये लिहिलं होतं, वा! हे कोणतं पॅरलल युनिव्हर्स आहे, जिथे राजेश खन्ना आणि ऐश्वर्या राय एकत्र दिसतात?.





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Vaibhav Suryavanshi : 15 चौकार-15 षटकार, वैभव सूर्यवंशीची 175 धावांची ऐतिहासिक खेळी, फायनलमध्ये 5 वर्ल्ड रेकॉर्ड्स
  • Vastu Shastra : स्वयंपाक घरात चुकूनही ठेवू नका या चार गोष्टी, घरात कधीच टिकणार नाही पैसा
  • 1 तास 58 मिनिटांचा हॉरर चित्रपट, बजेटपेक्षा तीन पट अधिक कमाई, आता OOT वर करतोय ट्रेंड, IMDb रेटिंग 8.6
  • plane crash : मोठी बातमी! आणखी एका विमानाचा भीषण अपघात, बेळगावला निघालेलं विमान शेतात कोसळलं
  • फेब्रुवारी महिन्यात रोगप्रतीकारक शक्ती वाढवण्यासाठी काय करावे?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in