• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

झाड दिसायला खूपच सुंदर, पण हमखास सापांना आमंत्रण, घरात ही वनस्पती लावूच नका

February 28, 2026 by admin Leave a Comment


अनेकांना बाग कामाची आवड असते, शहरी भागांमध्ये लोक आपल्या गच्चीवर किंवा जर घरासमोर मोकळी जागा असेल तिथे विविध सुंदर फुलांची झाडं लावतात. तर गावामध्ये अनेक जण आपल्या घराच्या पाठीमागे असलेल्या जागेत विविध फळा फुलांची झाडं लावतात. अनेकांना बागेमध्ये वेळ घालवायला आवडतो, अनेक जण बागेतील एखाद्या वृक्षाखाली  दुपारच्या वेळी आराम देखील करतात. उन्हाळ्यात तर घरात प्रचंड उष्णता असते, त्यामुळे झाडाच्या थंडगार सावलीला जाऊन बसणाऱ्यांची संख्या वाढते. मात्र त्याचसोबत एक धोका देखील उन्हाळ्यात वाढतो, तो म्हणजे उन्हाळ्यात जमीन तापते, त्यामुळे बिळात प्रचंड उष्णता निर्माण होते. जमीन तापल्यानं साप बिळातून बाहेर पडतात, आणि लपण्यासाठी किंवा आराम करण्यासाठी एखादी थंडगार जागा शोधतात.

तुम्हाला हे माहिती आहे का की अनेकदा साप झाडाखाली आढळून येतात, अशावेळी जर आपलं लक्ष तिकडे नसेल तर सर्पदंशाची घटना देखील घडू शकते. उन्हाळ्यामध्ये अशा पद्धतीच्या सर्पदंशाच्या घटनांमध्ये वाढ होते, त्यामुळे कधीही झाडाच्या सावलीमध्ये बसताना त्या ठिकाणी आजूबाजूचा परिसर नीट पाहून मगच बसावे. काही झाडं ही अशी असतात जी सापांना आकर्षित करतात. आकर्षित करतात म्हणजे शब्दशाहा आकर्षित करत नाहीत, तर त्या झाडांची रचना, त्या झाडांच्या फुलांचा रंग, वास, तसेच त्या झाडांमध्ये लपण्यासाठी सापांना एक नौसर्गिक आधिवास उपलब्ध होत असल्यानं साप अशा झाडांकडे आकर्षित होतात. आपण अशाच एका झाडाची आज माहिती जाणून घेणार आहोत.

आपल्यातील अनेकजण हे झाड लावतात, त्याला कन्हेराचं झाडं असं म्हणतात. या झाडांना सुंदर लाल फुलं येतात. मात्र या झाडाची रचना अशी असते की या झाडाखाली कायम थंडावा असतो, त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये साप या झाडाच्या आश्रयाला येतात. तसेच या झाडामध्ये लपण्यासाठी देखील सापांना जागा उपलब्ध होते, त्यामुळे साप या झाडांकडे आकर्षित होतात. त्यामुळे हे झाड शक्यतो घरात लावू नये. घरापासून दूर जिथे मोकळी जागा असेल अशा ठिकाणी हे झाड लावावे.  जर तुम्हाला साप दिसलाच तर त्याला मारू नका, तर त्याची माहिती सर्पमित्रांना द्या, ते सापांना पकडून त्यांच्या नौसर्गिक अधिवासात सोडतील.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • IPL 2026 : CSKची पराभवाची हॅटट्रिक, रडकुंडीला आलेल्या कॅप्टन गायकवाडने कोणावर फोडलं पराभवाचं खापर ?
  • टेक्नोचा ‘हा’ 32MP सेल्फी कॅमेरा असलेला स्मार्टफोन फ्लिपकार्टवर इतक्या स्वस्त किमतीत उपलब्ध
  • Dhurandhar 2 Worldwide Collection: अरेच्चा, हे काय घडलं? अचानक बदललं ‘धुरंधर 2’चं गणित; 21 व्या दिवशी किती कमावले?
  • Gold Price Today : सोने स्वस्त उच्चांकापेक्षा, जाणून घ्या आजचे सोने आणि चांदीचे नवीन दर..
  • तुरटीचे पाणी चेहऱ्यावर लावल्यामुळे काय होते? पिंपल्सच्या समस्या खरचं दूर होतात का?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in