• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ज्याची भीती होती शेवटी तेच घडलं, अमेरिकेचा खळबळ उडवून देणारा निर्णय, आता थेट इराणला.., जगभरात चिंंतेचं वातावरण

March 26, 2026 by admin Leave a Comment


अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने होर्मूजची सामुद्रधुनी बंद केल्यामुळे जगभरात मोठं ऊर्जा संकट निर्माण झालं आहे. दरम्यान यामुळे आता अमेरिकेवर दबाव वाढला आहे. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला इशारा दिला होता. इराणकडे 48 तास आहेत, जर इराणने स्ट्रीट ऑफ होर्मूज पुन्हा सुरू केला नाही तर आम्ही इराणवर आतापर्यंतचा भीषण हल्ला करू असं त्यांनी म्हटलं होतं. मात्र इराणकडून ट्रम्प यांच्या या धमकीला फारसं महत्त्व देण्यात आलं नाही. त्यानंतर अमेरिकेकडून युद्धविरामाचा देखील प्रयत्न झाला.

समोर आलेल्या माहितीनुसार अमेरिकेकडून एकतर्फी युद्धविरामाची घोषणा करण्यात आली, त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानच्या माध्यमातून आपल्या 15 अटी इराणला कळवल्या, मात्र त्यानंतर इराणने अमेरिकेला चांगलाच धक्का दिला. इराणने ट्रम्प यांचा हा प्रस्तावच फेटाळून लावला आहे. तसेच त्यांनी आपल्या पाच अटी अमेरिकेपुढे ठेवल्या आहेत. ज्यामध्ये अमेरिकेनं पुन्हा आमच्यावर हल्ला होणार नाही याची गॅरंटी द्यावी, सर्व आघाड्यावरील युद्ध एकाचवेळी बंद करावं, या युद्धात आमचं जे नुकसान झालं आहे, त्याची भरपाई आम्हाला मिळावी, तसेच स्ट्रीट ऑफ होर्मूजवरील आमचा अधिकार मान्य करावा अशा या अटी आहेत.

दरम्यान आता मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे आता अमेरिका मोठ्या युद्धाच्या तयारीमध्ये आहे. एकीकडे अमेरिकेकडून इराणवर हवाई मारा सुरूच ठेवला जाणार आहे. तर दुसरीकडे मात्र आता अमेरिका इराणमध्ये आपलं सैन्य घुसवणार असल्याची माहिती समोर येत आहे. अमेरिकनं संरक्षण अधिकाऱ्यांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता अमेरिका इराणवर शेवटचा घाव घालण्याच्या तयारीमध्ये असून, अमेरिकेकडून इराणमध्ये सैन्य घुसवलं जाण्याची शक्यता आहे. चर्चेच्या माध्यमातून हा प्रश्न सुटत नसल्यानं आता अमेरिका मोठा निर्णय घेण्याच्या तयारीमध्ये आहे. दरम्यान जरी अमेरिकेकडून इराणमध्ये सैन्य घुसवण्याची तयारी सुरू असली तरी देखील ही कारवाई अमेरिकेसाठी वाटते तितकी सोपी नक्कीच नसणार आहे.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • हुंडईचा मोठा धमाका! ग्रँड i10 निओसचे नवीन मॉडेल लाँच, किंमत किती?
  • स्कोडाची ऑफर, कार खरेदीवर तब्बल 3.5 लाखांची भरघोस सूट
  • अमरनाथ यात्रेला जात असाल तर तुमच्या बॅग पॅकिंगमध्ये या वस्तू नक्की ठेवा, वाचा यादी
  • इस्त्रायल हादरलं, युद्धविरामानंतर पहिल्यांदाच सर्वात मोठा हल्ला, थेट…, युद्ध पुन्हा पेटणार? जगभरात मोठी खळबळ
  • नव्या Flying Flea C6 इलेक्ट्रिक बाईकसाठी किती EMI बसेल? ‘हे’ गणित जाणून घ्या

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in