• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ज्याची भीती होती तेच घडणार, इराणचा अमेरिका, इस्त्रायलला हादरवणारा इशारा, आखाती देशांची पाचावर धारण

April 5, 2026 by admin Leave a Comment


इराणच्या दक्षिण -पश्चिम क्षेत्रामध्ये बुशहर शहरात न्यूक्लियर प्लांट आहे. त्याच्यावर अमेरिका आणि इस्त्रायलने हल्ला केला आहे. बुशहर शहर हे इराणची राजधानी तेहरानपासून 750 किलोमीटर दूर अंतरावर आहे. या हल्ल्यामध्ये आतापर्यंत एकाचा मृत्यू झाला आहे. अमेरिका आणि इस्त्रायलकडून इराणवर हल्ले सुरूच आहेत, या युद्धामध्ये इराण पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. मात्र जेव्हा आता अमेरिका आणि इस्त्रायलकडून इराणच्या न्यूक्लियर प्लांटला लक्ष करण्यात आलं, तेव्हा इराण अधिक आक्रमक झाला आहे. या हल्ल्यानंतर इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे, या पोस्टच्या माध्यमातून अमेरिका आणि इस्त्रायलला इशारा देण्यात आला आहे.

बुशहर न्यूक्लियर प्लांट मध्ये रशियाचं यूरेनियम वापरलं जातं. तिथे रशियाचे कर्मचारी काम करतात. या प्लांटमधून इराणला तब्बल 1000 मेगाव्हॅट वीज मिळते. जर या न्यूक्लियर प्लांटवर हल्ला केला तर संपूर्ण इराणमध्ये मोठं वीज संकट निर्माण होऊ शकतं. त्यामुळे आता इराणकडून अमेरिका आणि इस्त्रायलला इशारा देण्यात आला आहे. इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांनी अमेरिका आणि इस्त्रायलला इशारा देताना म्हटलं आहे की, आतापर्यंत अमेरिका आणि इस्त्रायलने या न्यूक्लियर प्लांटवर चारवेळा हल्ला केला आहे.

जर हे हल्ले असेच सुरू राहिले तर या प्लांटमधून निघणाऱ्या रेडिएशनमुळे फक्त तेहरानमध्येच नाही तर संपूर्ण आखाती देशांमध्ये हाहाकार उडेल. याचा मोठा फटका हा सौदी अरेबिया, कुवेत बहरीन सारख्या देशांना बसू शकतो. सध्या हवा अशापद्धतीने वाहत आहे की, हे रेडिएशन इराणकडे येणार नाहीत तर ते इतर आखाती देशांकडे जातील, त्यामुळे त्यांचं मोठं नुकसान होऊ शकतं. तसेच अमेरिका आणि इस्त्रायलकडून आमच्या तेल कारख्यान्यांवर देखील हल्ले करण्यात येत आहेत, याचाच अर्थ अमेरिका आणि इस्त्रायलला आमची आर्थव्यवस्था तोडायची आहे हे स्पष्ट होतं, असं इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटलं आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Vastu Shastra : तुम्हालाही ऑफीसच्या डेस्कवरच जेवणाची सवय आहे? मग आजच व्हा सावध, वास्तुशास्त्र काय सांगतं?
  • Chanakya Niti : नोकरीत यश मिळवायचं आहे? मग चाणक्यांच्या या गोष्टी लक्षात ठेवाच
  • vastu tips : घरात पैसा टिकत नाही? मग आजच घरी आणा या वस्तू
  • Premanand Maharaj: प्रेमानंद महाराज सांगतात फक्त केसांवरून ओळखा भोंदूबाबा, म्हणाले…
  • Vastu Shastra : घरात आल्यानंतर अस्वस्थ वाटतं? कामात लक्ष लागत नाही? मग करा हा सोपा उपाय

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in