• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

जेवणासाठी शोधत होते हॉटेल पण चुकून घुसले अंत्यविधीच्या ठिकाणी, पुढे जे घडलं ते…, आयुष्यात कधी विसणार नाहीत

April 11, 2026 by admin Leave a Comment


कधी-कधी आपल्या हातून नकळत काही गोष्टी अशा घडतात, ज्यांना आपण आपल्या आयुष्यात कधीही विसरू शकत नाहीत. अशीच एक घटना समोर आली आहे. ज्यामध्ये दोन प्रवासी अशा जागेवर पोहोचले तिथे आपण पोहोचू अशी त्यांनी कधी कल्पना देखील केली नव्हती. मात्र त्यानंतर त्यांच्यासोबत जे घडलं तो प्रसंग ते त्यांच्या आयुष्यातही विसरू शकणार नाहीत. ही घटना चीनमध्ये घडली आहे, इथे दोन प्रवासी जेवणासाठी एका चांगल्या हॉटेलचा शोध घेत होते. मात्र हॉटेल शोधत असताना ते अशा ठिकाणी पोहोचले जिथे एका व्यक्तीच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू होती. मात्र त्यानंतर त्यांच्यासोबत जे काही घडलं तो एखाद्या चित्रपटाचा प्रसंग वाटावा असंच सर्व काही होतं.

नेमकी काय आहे घटना?

साउथ चायना मॉर्निंग पोस्टनुसार ही घटना चीनच्या हुनान प्रांतामधील शाओयांगमध्ये घडली आहे. अमेरिकेचा प्रसिद्ध यूट्यूबर लुडविग आपल्या एका मित्रासोबत चीनमध्ये बाईकवर फिरत होता. त्यांनी आपल्या प्रवासाला गुआंगडोंग प्रांतामधून सुरुवात केली होती, त्यानंतर ते एका छोट्या गावात पोहोचले. मात्र त्यांना या गोष्टीची कल्पना देखील नव्हती की त्यांचं स्वागत अशापद्धतीने होईल, त्यांच्यासोबत असा प्रसंग घडला की हा प्रसंग त्यांच्या आयुष्यभर लक्षात राहील.

ते जेवणासाठी हॉटेलचा शोध घेत होते, हॉटेचा शोध घेत असताना ते अशा एका ठिकाणी पोहोचले जिथे सर्वत्र आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. या ठिकाणी प्रचंड प्रमाणात गर्दी जमली होती, समोरचं दृश्य पाहून त्यांना वाटलं की हे एखादं गावातील हॉटेल असावं. त्यांना चीनी भाषा येत नव्हती, मात्र तरी देखील मोडक्या -तोडक्या शब्दात त्यांनी तेथील लोकांना विचारलं की आम्ही इथे जेवू शकतो का? ते जिथे गेले होते, ते हॉटेल नव्हत तर ते होतं ‘हॅप्पी फ्यूनरल’

काय आहे ‘हॅप्पी फ्यूनरल’

चीनमध्ये एक प्रथा आहे, ज्या व्यक्तीचं वय हे 90 पेक्षा जास्त असेल तर अशा व्यक्तीच्या निधनानंतर दु:ख व्यक्त करण्यात येत नाही. तर त्याचा मृत्यू झाल्यानंतर तिथे एखाद्या उत्सवासारखं वातावरण असतं, लोक आनंदामध्ये त्या व्यक्तीला निरोप देतात अशावेळी जेवणासाठी विविध पदार्थ बनवले जातात. दरम्यान जेव्हा हा युट्यूबर तिथे पोहोचला तेव्हा त्या लोकांनी त्याचं स्वागत केलं, आणि त्याच्या जेवणाची खास सोय देखील करण्यात आली, आपण एखाद्या पाहुण्याचा जसा आदर सत्कार करतो, तसाच आदर सत्कार या ठिकाणी या युट्यूबरचा करण्यात आला.

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • उन्हाळ्यात बनवा आगळ्या वेगळ्या पद्धतीची आंबट-गोड आंब्याची चटणी, वाचा ही सोपी रेसिपी
  • टाटासाठी सोन्याची अंडी देणाऱ्या दोन SUV! विक्रीचा महाविक्रम करत गाजवलं मार्केट
  • Iran | इराण- अमेरिकेचं आणखी बिनसलं? इस्लामाबादमधील भेटीत नेमकं काय -काय घडलं?
  • लवकरच सर्वात महाभयंकर युद्ध? होर्मुझमध्ये….त्या दिग्गजाच्या इशाऱ्याने जगाची चिंता वाढली!
  • केंद्राचा डिझेलबाबत मोठा निर्णय! 36 रुपयांनी टॅक्स वाढवला, नवीन किंमत किती?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in