• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

जेवणानंतर पोटात गॅसची समस्या अस्वस्थ करतेय? तर करून पहा ‘हे’ 5 प्रभावी घरगुती उपाय

March 19, 2026 by admin Leave a Comment


आजकालच्या धावपळीच्या जीवनात लोकांची जीवनशैली आणि खाण्याच्या सवयी पूर्णपणे बदलल्या आहेत. अनेकजण रात्री उशिरापर्यंत जागे राहतात तसेच खाण्यापिण्याची वेळ ठरलेली नसते. या सर्वांचा आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. जेवण झाल्यानंतर विशेषतः एकाच जागी तासंतास काम केल्यामुळे पोटाच्या समस्या झपाट्याने वाढत आहेत. गॅस, अपचन आणि पोट फुगणे यांसारख्या समस्या अनेकांना सतावत आहेत. ज्यात जेवणानंतर लगेचच पोट जड होणे, आंबट ढेकर येणे आणि अस्वस्थता जाणवते. तर यापासून आराम मिळावा म्हणून अनेकजण प्रत्येक वेळी औषधांचा आधार घेतात. पण तुम्ही पोटाच्या या समस्यापासून आराम मिळवण्यासाठी स्वयंपाकघरात उपलब्ध असलेले काही सोपे घरगुती उपाय त्वरित करू शकतात. चला तर मग गॅस आणि अपचनापासून त्वरित आराम देऊ शकणाऱ्या अशा पाच घरगुती उपायांबद्दल जाणून घेऊयात.

गॅस कमी करण्यासाठी ओवा आणि काळे मीठ अत्यंत प्रभावी आहेत. ओव्यामधील थायमोल पाचक एन्झाइम्सना सक्रिय करते, ज्यामुळे अन्न लवकर पचण्यास मदत होते आणि पोटातील गॅस कमी होतो. अर्धा चमचा ओवा चिमूटभर काळे मीठ कोमट पाण्यात मिक्स करून प्या. हे पाणी प्यायल्याने काही मिनिटांतच पोटातील जडपणा आणि गॅस कमी होतो.

आल्याच्या सेवनाने गॅसपासून आराम मिळू शकतो. आल्यामध्ये नैसर्गिक दाहक-विरोधी आणि पाचक गुणधर्म असतात. ते पोटाच्या स्नायूंना आराम देते आणि गॅस बाहेर टाकण्यास मदत करते. जेवणानंतर मीठ लावून आल्याचा एक छोटा तुकडा चावा. तुम्ही आल्याचा चहा देखील पिऊ शकता, ज्यामुळे पचनक्रिया सुधारते.

बडीशेपचे पाणी हा देखील एक प्रभावी घरगुती उपाय आहे. बडीशेप पचनासाठी अत्यंत फायदेशीर मानली जाते. कारण बडीशेप पोटाला थंडावा देते, गॅस कमी करते आणि अन्न लवकर पचण्यास मदत करते. म्हणूनच जेवणानंतर अनेकदा बडीशेप खाल्ली जाते. तर पोटाची समस्या दूर करण्यासाठी अर्धा कप पाणी घ्या आणि त्यात बडीशेप टाका आणि उकळून घ्या. आता हे तयार बडीशेपचे पाणी चहाप्रमाणे प्या. थेट बडीशेप चावणे देखील फायदेशीर आहे.

हिंग गॅसपासून त्वरित आराम मिळतो. गॅस आणि पोटदुखीवर हिंग हा एक जुना आणि प्रभावी उपाय आहे. यामुळे गॅस बाहेर टाकण्यास आणि वेदना कमी करण्यास मदत होते. एक ग्लास कोमट पाण्यात चिमूटभर हिंग मिक्स करून ते प्यावे. लहान मुलांसाठी, हिंग पाण्यात विरघळवून नाभीभोवती लावल्यानेही आराम मिळतो.

पुदिन्याची पाने चावल्याने गॅसपासून आराम मिळू शकतो. पुदिना पोटाला थंडावा देतो आणि गॅस, छातीत जळजळ व अपचन कमी करतो. जेवणानंतर पुदिन्याची 4-5 ताजी पाने चावा किंवा पुदिन्याचा चहा प्या. यामुळे जड जेवणानंतर होणाऱ्या त्रासापासून लवकर आराम मिळू शकतो.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • RR vs RCB : वैभवची विस्फोटक खेळी, राजस्थानचा विजयी चौकार, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा
  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?
  • IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज, नंबर 1 कोण?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in