
आखाती देशांवरील हल्ल्यांमुळे सागरी व्यापार मार्गात अडथळे निर्माण झाले आहेत, ज्याचा थेट परिणाम भारताच्या निर्यात व्यापारावर होत आहे. विशेषतः महाराष्ट्रातील शेतकरी आणि व्यापाऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे. मुंबईतील जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी (JNPA) बंदरात भारतीय उत्पादनांचे हजारो कंटेनर अडकून पडले आहेत.
यामध्ये जळगाव आणि सोलापूर जिल्ह्यातील केळीचे सुमारे १२०० कंटेनर, तसेच सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील द्राक्षांचे १ हजार कंटेनर यांचा समावेश आहे. यामुळे द्राक्षांच्या साठवणुकीचा आणि निर्यातीचा प्रश्न निर्माण झाला आहे. भारताचा जवळपास २ लाख टन बासमती तांदूळही विविध बंदरांवर अडकला आहे, ज्यापैकी ८० टक्के निर्यात आखाती देशांना होते. युद्धाच्या परिस्थितीमुळे काही शिपिंग कंपन्यांनी माल पाठवण्यास नकार दिला आहे, तर काहींनी आपत्कालीन अधिभार लावला आहे, ज्यामुळे आयात-निर्यात महाग झाली आहे.
Leave a Reply