• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये भाजपला दणदणीत यश, किती ठिकाणी विजय? फडणवीसांनी सांगितला आकडा

February 9, 2026 by admin Leave a Comment


जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे निकाल आता जवळपास हाती आले आहेत. महापालिका निवडणुकीप्रमाणेच याही निवडणुकीत भाजप हा नंबर एकचा पक्ष ठरला आहे. भाजपला या निवडणुकीत मोठं यश मिळालं असून, या निकालावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. 2017 मध्ये देखील आम्ही अतिशय चांगली मुसंडी ग्रामीण भगामध्ये मारली होती. 2014 असेल 2019 असेल किंवा 2024 असेल, आम्ही ग्रामीण भागात विधानसभा निवडणुकांमध्ये अतिशय चांगला विजय प्राप्त केला होता. पण यावेळी मात्र त्याहीपेक्षा मोठा विजय मिळाला आहे. त्यामुळे हे जे मिथक होतं, की भाजप हा शहरी किंवा नमशहरी पक्ष आहे, ते आम्ही 2014 मध्ये तोडलं होतं. ते 2017 मध्ये आम्ही अधोरेखित केलं, आणि आता मात्र आम्ही ते पूर्णपणे स्थापित केलं आहे, की भारतीय जनता पार्टी शहर, निमशहर आणि ग्रामीण भागत नंबर एकचा पक्ष आहे, असं यावेळी फडणवीस यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, हा जनतेचा विश्वास आहे, एकूणच या देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या प्रकारे ग्राम विकासाचं कार्य हाती घेतलं. ज्या पद्धतीने ग्रामीण भागातील सोई सुविधांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला. त्यांनी विविध विकास योजनांमधून सकारात्मक वातावरण तयार केलं, आणि त्याचवेळी महाराष्ट्रातल्या सरकारने जे कार्य करून दाखवलं, त्यामुळे एक मोठा विश्वास जनतेच्या मनात तयार झाला. आज प्रत्येक जिल्ह्यामध्ये भाजप असेल किंवा आमचे मित्र पक्ष असतील त्यांना प्रचंड समर्थन मिळत आहे, आणि त्याचाच हा परिणाम आहे की, आम्ही एवढी मोठी भरारी घेतली आहे, असंही ते यावेळी म्हणाले.

भाजप हा या निवडणुकीत नंबर एकचा पक्ष ठरला आहे, जवळपास सात ठिकाणी भाजप नंबर एकवर आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर, सिंधुदुर्ग, सोलापूर, सांगली, धाराशिव, परभणी आणि सातारा या ठिकाणी भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर शिवसेनेला दोन ठिकाणी यश मिळालं आहे. रत्नागिरी आणि रायगडमध्ये शिवसेनेला यश मिळालं आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पुण्यामध्ये नंबर एकवर आहे. आणि दोन ठिकाणी आम्ही तिनही पक्ष एकत्र लढलो होतो, कोल्हापूर आणि लातूरमध्ये तिथेही आम्हीच नंबर एकवर आहोत, असं यावेळी फडणवीस यांनी म्हटलं आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ब्रिटनला मिळणार पहिल्या मुस्लीम पंतप्रधान?, कोण आहेत शबाना महमूद?
  • महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांना मोठी लॉटरी, सुमारे पाऊण लाख…, मुख्यमंत्री फडणवीसांची सर्वात मोठी घोषणा
  • जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये भाजपला दणदणीत यश, किती ठिकाणी विजय? फडणवीसांनी सांगितला आकडा
  • जाऊ बाई जोरात… धाकलीनं केला थोरलीचा पराभव; अवघ्या दोन मतांनी… लातूर आलंय पुन्हा चर्चेत
  • अजितदादांच्या राष्ट्रवादीने गड राखला, पुणे जिल्हा परिषदेवर एक हाती सत्ता, विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in