• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

जिभेवर वारंवार फोड येत आहेत? ‘या’ लक्षणांकडे कधीच दुर्लक्ष करु नका, तात्काळ घ्या डॉक्टरांचा सल्ला

April 4, 2026 by admin Leave a Comment


अनेक लोक जिभेवर वारंवार फोड येण्याची तक्रार करतात. कधीकधी पोटातील उष्णता, जीवनसत्त्वांची कमतरता, मसालेदार किंवा तिखट पदार्थ, तोंडाची अस्वच्छता किंवा वारंवार जीभ घासणे यांसारख्या साध्या कारणांमुळे हे घडते. तणाव आणि हार्मोनल बदल देखील याला कारणीभूत ठरू शकतात. काही लोकांना ही समस्या वारंवार उद्भवते, ज्यामुळे त्यांना खाणे, पिणे आणि बोलणे देखील कठीण होते.

तात्काळ कारण ओळखा

जरी बहुतेक प्रकरणांमध्ये, जिभेवरील फोड काही दिवसांत बरे होतात, परंतु जर ते जास्त काळ टिकून राहिले किंवा वारंवार परत आले, तर ते एखाद्या आरोग्य समस्येचे लक्षण असू शकते. म्हणून त्याकडे दुर्लक्ष कधीच करु नाका आणि तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

लेडी हार्डिंग हॉस्पिटलचे मेडिसिन संचालक डॉ. एल. एच. घोटकर यांनी सांगितल्यानुसार, जिभेवर वारंवार किंवा दीर्घकाळ टिकणारे फोड हे एखाद्या शारीराच्या आतील समस्येचे लक्षण असू शकते. याचा संबंध पचनसंस्थेतील समस्या, कमकुवत रोगप्रतिकारशक्ती किंवा पोषक तत्वांच्या कमतरतेशी असू शकतो. कधीकधी हे एखाद्या संसर्गाचे किंवा ॲलर्जीचे लक्षण देखील असू शकते.

जर फोडासोबत तीव्र वेदना, रक्तस्त्राव किंवा सतत होणाऱ्या जखमा असतील, तर ते एखाद्या गंभीर आजाराचे लक्षण असू शकते. तर काही प्रकरणांमध्ये हे तोंडाच्या अस्वच्छतेमुळे किंवा जिवाणू संसर्गामुळे होते. सतत येणारे फोड हे अशक्तपणाचे किंवा एखाद्या आजाराचे लक्षण देखील असू शकतात. त्यामुळे, वारंवार येणाऱ्या फोडांकडे दुर्लक्ष करू नये.

जिभेवरील फोड टाळण्यासाठी काय कराल?

जिभेवरील फोड टाळण्यासाठी योग्य आहार आणि चांगल्या सवयी ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. अति मसालेदार, आंबट किंवा तिखट पदार्थ खाणे टाळा. तोंडाची चांगली स्वच्छता राखा आणि दररोज भरपूर पाणी प्या. फळे आणि हिरव्या भाज्या यांसारख्या ‘ब’ आणि ‘क’ जीवनसत्त्वांनी समृद्ध असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करा. तंबाखू आणि मद्यपान टाळा.

कोणती लक्षणे असतील तर डॉक्टरांकडे जाल…

जिभेवरील व्रण 10 ते 15 दिवसांत बरे न झाल्यास किंवा व्रणांसोबत तीव्र वेदना, सूज, ताप किंवा रक्तस्त्राव होणे हे एक गंभीर लक्षण असू शकते. जर तुम्हाला खाण्यात अडचण येत असेल किंवा वजन कमी होत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. दीर्घकाळ टिकणारे व्रण हे एका अधिक गंभीर समस्येचे लक्षण असू शकते. त्यामुळे, वेळेवर निदान आणि योग्य उपचार आवश्यक आहेत.



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अक्षय तृतीयेला मीठ खरेदी करणे का शुभ आहे? जाणून घ्या शास्त्रीय कारण…..
  • ‘मनबाधा’ चिरंतराची एक अथक जखम… प्रसिद्ध कवी प्रवीण दवणे यांनी डिंगणकर यांच्या पुस्तकाचे मांडले विविध पैलू
  • तुम्हाला चावलेला साप विषारी की बिनविषारी? एका झटक्यात ओळखा, जंगलामध्ये आदिवासी वापरतात ही सोपी ट्रीक
  • फिल्टरपाड्याच्या झोपडपट्टीतून रोज अंधार आकाशातील तारे पाहणारा..; गौरव मोरेसाठी छाया कदम यांची खास पोस्ट
  • किचनच्या ‘या’ छोट्या टिप्स अन्नाची चव आश्चर्यकारक वाढवू शकतात….

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in