
रिलायन्स जिओ कंपनी त्यांच्या वापरकर्त्यांसाठी नवीन आणि आकर्षक रिचार्ज प्लॅन्स सादर करत आहे, ज्यामध्ये अनलिमिटेड 5G डेटा आणि अनेक OTT प्लॅटफॉर्मवर मोफत प्रवेशाचा समावेश आहे. विशेष म्हणजे या प्लॅन्समध्ये जिओहॉटस्टार सबस्क्रिप्शनचाही समावेश आहे, ज्यामुळे वापरकर्त्यांना थेट क्रिकेट आणि मनोरंजनाचा आनंद घेता येतो. कमी किमतीत अधिक फायदे देणारे हे प्लॅन्स अधिकाधिक लोकप्रिय होत आहेत. कंपनीने वेगवेगळ्या बजेटनुसार अनेक पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. चला तर मग अशा बरेच फायदे असणाऱ्या जिओ प्लॅन्सबद्दल जाणून घेऊयातत
500 च्या प्लॅनमध्ये संपूर्ण OTT पॅकेज
जिओचा 500 रुपयांचा प्लॅन अशा वापरकर्त्यांसाठी आहे ज्यांना मनोरंजन आणि डेटा दोन्ही हवे आहेत. या प्लॅनमध्ये दररोज 2 जीबी डेटा, म्हणजेच एकूण 56 जीबी डेटा आणि 28 दिवसांची वैधता मिळते. यासोबतच अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस देखील मिळतात. विशेष म्हणजे यामध्ये यूट्यूब प्रीमियम, प्राईम व्हिडिओ मोबाईल आणि जिओ हॉटस्टारसह अनेक ओटीटी प्लॅटफॉर्म्सचा ॲक्सेस मिळतो. याव्यतिरिक्त या यामध्ये जिओ एआय क्लाउडमध्ये 50 जीबी स्टोरेज आणि गूगल जेमिनीसाठी 18 महिन्यांचा प्रो प्लॅन देखील मिळतो. ज्यांना एकाच रिचार्जमध्ये अनेक सेवा हव्या आहेत, त्यांच्यासाठी हा प्लॅन उत्तम आहे.
399 रूपयांच्या प्लॅनमध्ये अधिक डेटा आणि क्रिकेटची मजा
जिओच्या 399 रुपयांच्या प्लॅनमध्ये अधिक डेटाचे फायदे मिळतात. यामध्ये दररोज 2.5 जीबी डेटा, म्हणजेच एकूण 70 जीबी डेटा मिळतो आणि तो 28 दिवसांसाठी वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये लाईव्ह क्रिकेट पाहण्यासाठी तीन महिन्यांचे JioHotstar मोबाईल सबस्क्रिप्शन देखील वापरकर्त्यांना मिळते. तसेच यामध्ये JioAICloud मध्ये 50 जीबी स्टोरेज आणि गूगल Gemini चाही समावेश आहे. अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस संदेश उपलब्ध आहेत. हा प्लॅन विशेषतः अशा वापरकर्त्यांसाठी योग्य आहे जे वारंवार इंटरनेट वापरतात आणि क्रिकेटचे मॅच पाहण्याचे शौकीन आहेत.
जास्त वैधतेसाठी 749 रूपयांचा प्लॅन
749 रुपयांच्या प्लॅनची वैधता 72 दिवसांची असून, यामध्ये एकूण 164 जीबी डेटा मिळतो. यामध्ये दररोज 2 जीबी डेटा आणि त्यासोबत 20 जीबी अतिरिक्त डेटा मिळतो. या प्लॅनमध्ये JioHotstar चे तीन महिन्यांचे सबस्क्रिप्शन, तसेच JioAICloud आणि गूगल Gemini चे फायदे देखील समाविष्ट आहेत. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि एसएमएसचाही समावेश आहे. ज्या वापरकर्त्यांना वारंवार रिचार्ज करायचा नाही आणि दीर्घकाळासाठी डेटा व मनोरंजनाचा आनंद घ्यायचा आहे, त्यांच्यासाठी हा प्लॅन एक चांगला पर्याय आहे.
949 रूपयांच्या प्लॅनमध्ये सर्वाधिक वैधता आणि 5जी डेटा
949 रुपयांचा प्लॅन 84 दिवसांच्या वैधतेसह येतो आणि यामध्ये दररोज 2 जीबी डेटा मिळतो. एकूण 168 जीबी डेटासह, हा प्लॅन एक दीर्घकालीन पर्याय आहे. यामध्ये 84 दिवसांसाठी JioHotstar चा पूर्ण ॲक्सेस मिळतो आणि JioAICloud व Google Gemini यांचाही समावेश आहे. कॉलिंग आणि एसएमएस अमर्यादित आहेत. ज्या वापरकर्त्यांना कोणत्याही व्यत्ययाशिवाय दीर्घकाळ इंटरनेट आणि ओटीटी कंटेंटचा आनंद घ्यायचा आहे, त्यांच्यासाठी हा प्लॅन आदर्श आहे.
79 रूपयांचा क्रिकेट डेटा पॅक
79 रुपयांचा हा छोटा प्लॅन खास क्रिकेट चाहत्यांसाठी तयार करण्यात आला आहे. यामध्ये 30 दिवसांच्या वैधतेसह 3 जीबी हाय-स्पीड डेटा मिळतो. या पॅकमध्ये JioHotstar मोबाईल सबस्क्रिप्शनचाही समावेश आहे, ज्यामुळे वापरकर्त्यांना थेट सामने पाहता येतात. मात्र, हा केवळ डेटा प्लॅन असल्याने यामध्ये कॉलिंग किंवा एसएमएसची सुविधा मिळत नाही. या कमी किमतीमुळे ज्यांना फक्त क्रिकेट पाहण्यासाठी अतिरिक्त डेटाची आवश्यकता असते, त्यांच्यासाठी हा प्लॅन उपयुक्त ठरतो.
Leave a Reply