• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

जावयाचे सासूसोबत भयानक कांड, भांडणं मिटवायला लेकीच्या घरी गेली पण… नको ते घडलं

March 7, 2026 by admin Leave a Comment


सासू आणि जावई यांच्यामधील नात्याच्या अनेक धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. पण एक प्रकरण असे आहे की संपूर्ण देश हादरला आहे. एका जावयाने आपल्या सासूवर गोळी झाडून तिची हत्या केली. मृत महिलेची चूक इतकीच होती की ती आपल्या मुलगी-जावयामधील वाद शांत करण्यासाठी आणि त्यांना समज देण्यासाठी त्यांच्या घरी गेली होती. पोलिसांनी आरोपी जावयाला अवैध शस्त्रासह अटक केली आहे.

ही घटना उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यातून नहटौर पोलीस ठाणे हद्दीतील फुलसंदा गंगदास गावातील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गावातील सजल आणि भावना यांनी सुमारे तीन वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता. लग्नानंतर दोघे घर सोडून गेले होते. मात्र सुमारे दोन महिन्यांपूर्वी ते पुन्हा गावात येऊन राहू लागले. त्याचबरोबर शुक्रवारी सायंकाळी सुमारे पाचच्या सुमारास पती-पत्नीमध्ये कोणत्यातरी कारणावरून जोरदार वाद सुरू झाला.

मध्यस्थी करण्यासाठी आली, पण जावयाने…

वाद वाढताच भावनाने आपली आई बबली यांना याची माहिती दिली. त्यानंतर बबली तातडीने मुलीच्या घरी पोहोचल्या आणि जावई सजलला समजावण्याचा प्रयत्न केला. भावनाने आरोप केला की सजल दारू पिऊन तिच्याशी नेहमी गैरवर्तन करतो. यावर बबली यांनी जावयाला सुनावले आणि मुलीवर हात उचलू नकोस अशी समज दिली. मात्र हे ऐकताच सजल संतापला. रागाच्या भरात सजलने आधी पत्नी भावना हिला मारहाण केली. आई बबली यांनी मुलीला वाचवण्यासाठी मध्ये पडताच, सजलने जवळ ठेवलेला 315 बोरची देशी बंदूक काढली आणि थेट बबली यांच्या डोक्यात गोळी झाडली.

रुग्णालयात नेत असताना प्राण गेले

गोळीबाराचा आवाज ऐकताच गावात एकच खळबळ उडाली आणि ग्रामस्थ घटनास्थळी जमा झाले. दरम्यान, आरोपी सजल तेथून फरार झाला. ग्रामस्थांनी गंभीर जखमी अवस्थेत रक्तबंबाळ झालेल्या बबली यांना तातडीने रुग्णालयात नेले मात्र अतिरक्तस्राव झाल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर गावात तणाव आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलिसांची कारवाई

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. बिजनौरचे एसपी (पूर्व) अमित किशोर यांनी माहिती देताना सांगितले की, पोलिसांनी त्वरित कारवाई करत आरोपी सजलला अटक केली आहे. त्याच्याकडून हत्येसाठी वापरलेला 315 बोरची बदूंकही जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा नोंदवून पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • 30 लाखांपर्यंतच्या इलेक्ट्रिक कारवर 100% रोड टॅक्स माफ, ‘या’ सरकारच्या नव्या पॉलिसीत काय आहे खास?
  • Nashik Crime : मीटिंगमध्ये पायाने स्पर्श, लॉबीत शरीराशी झटापट आणि.. नाशिकच्या कंपनीत घडणारं वाचून लाजेनं जाईल मान खाली !
  • आशा भोसले यांच्यासाठी पंतप्रधान मोदींची पोस्ट; ‘त्यांना रुग्णालयात दाखल केल्याचं ऐकून..’
  • Maratha Reservation: मनोज जरांगेंना झटका, या गुन्ह्यांना माफी नाहीच! मराठा आंदोलकांवरील 828 गुन्हे मागे, सरसकट माफी नाहीच
  • भाजप नगरसेविकेच्या पतीला भयानक मारहाण, घटनेचा Video Viral

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in