• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

जापानमध्ये महिलाराज! सानाए ताकाइची यांना बहुमत, पीएम मोदींकडून अभिनंदन

February 8, 2026 by admin Leave a Comment


जपानच्या राजकीय वर्तुळातून या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. जपानमधील संसंदीय निवडणुकीत पंतप्रधान सानाए ताकाइची यांच्या लिबरल डेमोक्रेटिक या पक्षाने आपला ठसा उमटवला आहे. लिबरल डेमोक्रेटिक ऐतिहासिक असा विजय मिळवला आहे. नेतृत्व आणि भ्रष्टाचारांच्या आरोपांमुळे पक्षाचा पराभव होईल, अशी निवडणुकीदरम्यान चर्चा पाहायला मिळत होती. मात्र या मुद्द्यांचा या निवडणुकीवर काहीही परिणाम झाला नाही. सानाए ताकाइची यांच्या नेतृत्वात पक्षाने बहुमताचा आकडा गाठला. यासह पक्षाने दणदणीत कामगिरी करुन बाजी मारली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून अभिनंदन, पोस्टमध्ये काय म्हटलंय?

सानाए ताकाइची यांच्या पक्षाच्या ऐतिहासिक विजयानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचं अभिनंदन केलंय. मोदींनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत सानाए ताकाइची यांना शुभेच्छा दिल्या आहेत. “सानाए ताकाइची यांचं निवडणुकीतील ऐतिहासिक विजयाबद्दल अभिनंदन. आपली विशेष रणनिती आणि जागतिक भागीदारी जागतिक शांतता, स्थिरता आणि समृद्धी वाढविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते”, असा उल्लेख मोदींनी त्यांच्या पोस्टमध्ये केलाय.

तसेच मोदींनी भारत-जपानच्या मैत्रीचाही या पोस्टमध्ये उल्लेख केलाय. “तुमच्या सक्षम नेतृत्वात भारत-जपान मैत्रीला आणखी उंचीवर नेणं सुरू ठेवू याची मला खात्री आहे”,असा विश्वास मोदींनी या पोस्टद्वारे व्यक्त केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक्स पोस्ट

Congratulations Sanae Takaichi on your landmark victory in the elections to the House of Representatives!

Our Special Strategic and Global Partnership plays a vital role in enhancing…

— Narendra Modi (@narendramodi) February 8, 2026

आकड्यांचं गणित

कनिष्ठ सभागृहाची सभासदसंख्या ही एकूण 465 इतकी आहे. तर 233 ही मॅजिक फिगर आहे. लिबरल डेमोक्रेटिक पार्टीने हा बहुमताचा आकडा गाठला. विशेष आणि उल्लेखनीय बाब अशी की मतदान संपल्यानंतर फक्त नि फक्त 2 तासांतच हा आकडा गाठला. लिबरल डेमोक्रेटिक पार्टीचा हा आतापर्यंतचा ऐतिहासिक विजय असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात पाहायलाम मिळत आहे.





Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • छगन भुजबळ अपघातातून थोडक्यात बचावले, पायलटची मोठी चूक, हेलिकॉप्टर हेलिपॅडवर लँड न करता…
  • बोल्ड सीन असणारे 5 चित्रपट, ज्यामध्ये अभिनेत्रींनी पार केल्या सर्व मर्यादा, आता OTT वर चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी
  • नवऱ्यासाठी ती फक्त एक ट्रॉफी…, प्रसिद्ध अभिनेत्रीवर दुसऱ्या बायकोचा टॅग… लग्नानंतर खडतर झालेलं आयुष्य, कोणी केलेला धक्कादायक खुलासा?
  • Arvind Sawant : अरविंद सावंत मुंबईत येताच..ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर मातोश्रीने उचललं महत्वाचं पाऊल
  • Vijay Vadettiwar: खरातच्या जागी जर एखादा मुसलमान असता तर… विजय वडेट्टीवार यांच्या विधानाने शिलगला वाद, असे काढले माप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in