
बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा कायमच चर्चेत असणारे नाव आहे. सोनाक्षी सिन्हा हिने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला. जबरदस्त अशी सोनाक्षी सिन्हा हिची फॅन फॉलोइंग आहे. मात्र, सोनाक्षी सिन्हा जहीर इक्बाल याच्यासोबत लग्न करणार असल्याचे जाहीर करताच लोकांना मोठा धक्का बसला. तब्बल 7 वर्ष डेट करून सोनाक्षी सिन्हा हिने जहीर इक्बाल याच्यासोबत लग्न केले. जहीर इक्बाल आणि सोनाक्षी सिन्हा कायमच विदेशात फिरायला जातात. सोनाक्षी आणि जहीरची जोडी अनेकांना आवडते. लग्नानंतर काही महिने सोनाक्षी सिन्हा जहीर इक्बालच्या घरी राहिली. त्यानंतर दोघे अत्यंत आलिशान घरात शिफ्ट झाले. सोनाक्षी सिन्हा हिच्या घरून या लग्नाला विरोध असल्याचे म्हटले जात होते. हेच नाही तर सोनाक्षी सिन्हा हिच्या लग्नामध्येही तिचे दोन्ही भाऊ उपस्थित नव्हते. सोनाक्षीचे वडील आणि बॉलिवूड अभिनेते शत्रुघ्न सिन्हा आणि आई पूनम सिन्हा उपस्थित होते. लेकीच्या आनंदात आपण सहभागी असल्याचेही शत्रुघ्न सिन्हा यांनी म्हटले.
सध्या सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून चाहत्यांना मोठा धक्का बसला. चक्क सोनाक्षी सिन्हा हिचा घात करताना जहीर इक्बाल दिसला. सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल फिरायला जाताना दिसत आहेत. स्कूटी घेऊन जहीर सोनाक्षी सिन्हा हिच्या बाजूला उभा राहतो. यादरम्यान सोनाक्षी सिन्हा हेल्मेट घालताना दिसत आहे.
हेल्मेट जहीर हाच सोनाक्षीला देतो… सोनाक्षी जसेही हेल्मेट घालण्यास हात वर करते. तसा हेल्मेटमध्ये असलेला सर्व रंग सोनाक्षी सिन्हा हिच्या डोक्यावर आणि अंगावर पडतो. हे पाहून जहीर इक्बाल -जोरजोरात हसण्यास सुरूवात करतो. यादरम्यान तो गाडी पळवत पुढे जातो. सोनाक्षी सिन्हा रागात जहीर इक्बाल याला मारण्यासाठी त्याच्या मागे पळते.
View this post on Instagram
पण सोनाक्षी सिन्हा जहीरला पकडू शकत नाही, कारण तो गाडीवर खूप पुढे निघून जातो. आता हाच व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. लोकांना हा व्हिडीओ प्रचंड आवडला असून या व्हिडीओवर लोक मोठ्य प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत.
Leave a Reply