• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

जर 48 तासात होर्मुज खाडी उघडली नाही तर.. अमेरिकेची हाहाकार उडवणारी धमकी, थेट…

March 22, 2026 by admin Leave a Comment


इराण आणि अमेरिका युद्ध काही थांबण्याचे नाव घेत नाही. एका मागून एक मोठे हल्ले केले जात आहेत. या युद्धाच्या झळा सर्वांनाच बसत आहेत. 28 फेब्रुवारी 2026 रोजी मोठा हल्ला इराणवर करण्यात आला. त्याच हल्ल्यात इराणच्या सर्वाेच्च नेत्याला ठार करण्यात आले. इराणचे सर्वाेच्च नेते ठार झाल्यानंतर युद्ध इतके दिवस चालेल याचा अंदाजही अमेरिकेला आणि इस्त्रायलला नव्हता. जिकडे वाटेल तिकडे मोठे हल्ले इराण करत आहे. आखाती देशही या युद्धामुळे आजच्या घडीला भयंकर संकटात आहेत. होर्मुज खाडी इराणकडून बंद करण्यात आल्याने जगातील अनेक देश जैरीस आले. होर्मुज खाडीतून सर्वाधिक तेलाची वाहतूक होती. ती होर्मुज खाडीच बंद असल्याने अनेक देशात कच्च्या तेलासोबतच एलपीजी गॅसची मोठी समस्या आहे. होर्मुज खाडी सुरू करण्याकरिता अनेक प्रयत्न केली जात आहेत. मात्र, होर्मुज खाडी सुरक्षित करण्यात अमेरिकेला यश मिळत नाहीये.

काल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले होते की, होर्मुज खाडी सुरक्षित करण्याची जबाबदारी अमेरिकेची नाही. जे देश या खाडीचा वापर करत आहेत, त्यांची जबाबदारी आहे की, ही खाडी सुरक्षित करण्याची. अनेक प्रयत्न करूनही होर्मुज खाडीत यश मिळत नसल्याने डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुज खाडीची जबाबदारी झटकली. यादरम्यानच आता पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून अत्यंत मोठी धमकी देण्यात आली.

डोनाल्ड ट्रम्प यांनी तेहरानला कडक इशारा दिला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत म्हटले की, इराणला 48 तासांची मुदत देत आहे. जर यादरम्यान त्यांनी होर्मुज सामुद्रधुनी पूर्णपणे सुरक्षित केली नाही तर अमेरिकन सैन्य इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवर मोठा हल्ला करून सर्वकाही उद्ववस्थ करेल. इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ला करण्याची धमकी अमेरिकेकडून पहिल्यांदाच देण्यात आली.

आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या या धमकीनंतर इराण होर्मुज खाडी सुरू करणार का? हा मोठा प्रश्न उपस्थित केला जात आहे. होर्मुज खाडीत अमेरिकन सैन्य उतरवण्याचा प्रयत्न अमेरिकेने केला. पण त्यांना यश मिळाले नाही. आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या निशाण्यावर थेट इराणचे ऊर्जा प्रकल्प आहेत, ज्यामध्ये गॅस प्रकल्पांसह तेल रिफायनरीचा समावेश आहे. मात्र, इराणच्या ऊर्जेच्या पायाभूत सुविधांवर हल्ला झाला तर इराण आखाती देशांना टार्गेट करत मोठे हल्ले करण्याची शक्यता आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • हुंडईचा मोठा धमाका! ग्रँड i10 निओसचे नवीन मॉडेल लाँच, किंमत किती?
  • स्कोडाची ऑफर, कार खरेदीवर तब्बल 3.5 लाखांची भरघोस सूट
  • अमरनाथ यात्रेला जात असाल तर तुमच्या बॅग पॅकिंगमध्ये या वस्तू नक्की ठेवा, वाचा यादी
  • इस्त्रायल हादरलं, युद्धविरामानंतर पहिल्यांदाच सर्वात मोठा हल्ला, थेट…, युद्ध पुन्हा पेटणार? जगभरात मोठी खळबळ
  • नव्या Flying Flea C6 इलेक्ट्रिक बाईकसाठी किती EMI बसेल? ‘हे’ गणित जाणून घ्या

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in