• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

जगाला ज्याची भीती तेच घडण्याचे संकेत, इराणकडून टोकाचे पाऊल उचलण्याची तयारी, जग संकटात, थेट..

March 22, 2026 by admin Leave a Comment


अमेरिका आणि इराण युद्ध भडकले आहे. कोणताही देश माघार घेताना दिसत नाही. या युद्धाचा फटका जगातील सर्वच देशांना बसत आहे. आखाती देशही संकटात आहेत. तेल आणि गॅसची समस्या आहे. त्यामध्येच इराणकडून होर्मुज खाडी बंद करण्यात आल्याने सर्वांच्या तोंडचे पाणी पळाले. भारताचेही अनेक तेलवाहू जहाज होर्मुज खाडीत अडकली आहेत. सध्याच्या घडीला इराणकडून भारताचे काही जहाज होर्मुज खाडीतून सोडली जात आहेत. मात्र, युद्धाचे संकट अधिक घातक होत आहे. या युद्धाचा परिणाम भारतात दिसत असून अनेक हॉटेल बंद ठेवण्याची वेळ आली. व्यावसायिक गॅस सिलेंडरचे वितरण बंद आहे. अनेक व्यवसाय संकटात आहेत. होर्मुज खाडी सुरू करण्याकरिता अमेरिकेकडून इराणला 48 तासांचा वेळ देण्यात आला. मात्र, अमेरिकेच्या धमकीला इराण भीक घालत नसल्याचे दिसत आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटले की, इराणने होर्मुज खाडी 48 तासात खुली करावी, नाही तर अमेरिकेचे सैन्य इराणच्या ऊर्जेच्या पायाभूत सुविधांवर हल्ला करेल. यानंतर इराणकडून थेट धमकी देत म्हणण्यात आले की, इराणच्या ऊर्जे संबंधित पायाभूत सुविधांवर हल्ला केला तर इराण संपूर्ण क्षेत्रात असलेल्या अमेरिकेच्या कंपन्यांवर थेट हल्ला करेल.

इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बागरी गालिबाफ यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत म्हटले की, इस्रायल आणि अमेरिकेसोबतच्या युद्धासंदर्भात आधीच ठरवलेल्या पुढील रणनीती अंमलात आणण्याची वेळ आली आहे असे दिसते.. इस्रायल अत्यंत सुरक्षित असलेल्या दिमोना परिसरातही क्षेपणास्त्रे रोखू शकले नाही तर हा संघर्ष कृतीच्या दृष्टीने एका नवीन टप्प्यात पोहोचला आहे. इस्रायलचे आकाश आता असुरक्षित झाले आहे.

अमेरिकेने धमकी दिल्यानंतर इस्त्रायलमध्ये मोठे हल्ले इराणकडून करण्यात आले. इराणच्या या क्षेपणास्त्र हल्ल्यात जवळपास 100 लोक जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. आतापर्यंतच्या हल्ल्यातील हा मोठा आकडा आहे. अमोरिकेने 48 तासांचा वेळ दिल्यानंतर इराण अधिक घातक बनसल्याचे बघायला मिळत आहे. जगाला ज्याची भीती तेच घडताना दिसत आहे, थेट ऊर्जा प्रकल्पांवर हल्ला करण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. खरोखरच असे घडले तर तेलाचे भाव वाढतील.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • HIV Report : महाराष्ट्रातील धक्कादायक घटना, पैशांसाठी खोटा एचआयव्ही रिपोर्ट दिला, महिलेचा संसार उद्धवस्त
  • आता घुसा किचनमध्ये अन् बनवा नव्या रेसिपी… कांद्यापासून कारल्यापर्यंत सर्वच स्वस्त, अनेक भाज्यांचे भाव दुप्पट घसरले
  • मोठी बातमी! पाकिस्तान मालामाल, भारताचा मित्र रशियाचं पाकला मोठं गिफ्ट, पुतिन यांची सर्वात मोठी घोषणा
  • मोठा राजकीय भूकंप होणार? शिंदेंसोबत ठाकरेंच्या नेत्यांची गुप्त बैठक? बडा नेता म्हणाला, मीही तसं…
  • Karuna Munde | करुणा मुंडेंची बारामती पोटनिवडणुकीतून माघार नाहीच, म्हणाल्या, जनतेने संधी दिली तर…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in