• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

जगात सर्वाधिक अंडी कुठे खाल्ली जातात, भारताचा नंबर कितवा? वाचून वाटेल आश्चर्य!

March 21, 2026 by admin Leave a Comment


उत्तर प्रदेशमध्ये येत्या 1 एप्रिल रोजीपासून एका आगळ्यावेगळ्या नियमाची अंमलबजावणी केली जाईल. या नियमानुसार आता प्रत्येक अंड्यावर एक्स्पायरी डेट लिहिलेली असेल. म्हणजेच खूप दिवसांपासून विक्रीसाठी अंडे ठेवल्याचे ग्राहकांना लगेच समजणार आहे.

दरम्यान, या निर्णयामुळे भारत अंडी उत्पादनात कितव्या स्थानी आहे, तसेच भारतात अंडी खाणाऱ्यांचे प्रमाण किती आहे, ते जाणून घेऊ या. एक व्यक्ती वर्षभरात किती अंडी खाते याबाबत बोलायचे झाल्यास जगात मेक्सिको हा देश सर्वात पुढे आहे.

मेक्सिकोमध्ये प्रत्येक व्यक्ती वर्षाला सरासरी 363 अंडी खाते. म्हणजेच मेक्सिकोमध्ये प्रत्येक व्यक्ती रोज एक तरी अंडे खातेच. अंडे हे प्रोटीनचा प्रमुख स्त्रोत असल्याचे तिथे मानले जाते. त्यामुळे तिथे आहारात अंडी मोठ्या प्रमाणात असतात.

भारत अंडी उत्पादनाच्या बाबतीत मात्र मेक्सिकोच्या पुढे आहे. अंडी उत्पादनाच्या क्षेत्रात भारत दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. पहिल्या क्रमांकावर चीन आहे. 2024-25 साली भारतात 149.11 अब्ज अंड्यांचे उत्पादन झाले.

भारतात प्रत्येक व्यक्ती वर्षाला सरासरी 106 अंडी खाते. मेक्सिकोच्या तुलनेत हा आकडा खूपच कमी आहे. अंडी उत्पादनाच्या क्षेत्रात भारत बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंकेच्याही पुढे आहे. आता ग्रामी भागातही अंडी खाणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. लोकांमध्ये जागरुकता निर्माण होत आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • PBKS vs SRH Live Streaming : हैदराबादसमोर पंजाबचं आव्हान, ऑरेंज आर्मी विजयरथ रोखणार? सामना किती वाजता?
  • Cricket : वनडे-टी 20 सीरिजमधून स्टार खेळाडू आऊट, या क्रिकेटरला 6 सामन्यांसाठी संधी, कोण आहे तो?
  • 4,4,4,4,6,4,4,4,6,6,6..! वैभव सूर्यवंशीचा आरसीबी गोलंदाजांना दणका, विक्रमी अर्धशतक ठोकलं
  • Fatty Liver : दारु न पिता लिव्हर कसा होतोय डॅमेज ? कोणत्या चुका पडताहेत भारी ?
  • IPL 2026 : फिल सॉल्टच्या नावावर नकोसा विक्रमाची नोंद, पहिल्याच चेंडूवर आरसीबीला दणका

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in