• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

जगातील असा एक देश, जिथे 1 किलो मटणाची किंमत चहाच्या कपापेक्षाही स्वस्त; मासांहारी लोकांसाठी जणू स्वर्गच

April 2, 2026 by admin Leave a Comment


मटण म्हटलं की भल्याभल्यांच्या तोंडाला पाणी सुटतं, अनेकजण मटण मोठ्या आवडीने खातात. मटण खाण्याचे अनेक फायदे आहेत. एक तर मटण हे स्वादिष्ट असतं आणि दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे मटण हे एक असं अन्न आहे, ज्यामधून तुम्हाला जवळपास सर्वच प्रकारचे जीवनसत्वे मिळतात. मटण हे तुमच्या शरीरासाठी खूप पोषक मानलं जातं. वेगवेगळ्या देशात मटणाची किंमत देखील वेगवेगळी आहे. काही देशांमध्ये मटणाचे दर हे प्रचंड आहेत, त्यामुळे तेथील सर्वसामान्य लोकांना मटण घेणं परवडत नाहीत, अशावेळी हे लोक चिकन किंवा अंड्यांच्या माध्यमातून आपल्या शरीरातील पोषण मुल्ल्यांची कमतरता भरून काढतात. तर काही देशांमध्ये तुलनेनं मटण स्वस्त आहे. भारताबाबत बोलायचं झाल्यास भारतामध्ये मटणाचे दर सध्या स्थितीमध्ये 600 ते 700 रुपये किलो आहेत. मात्र जगाच्या पाठीवर असा देखील एक देश आहे, जिथे तुम्हाला एक किलो मटण अगदी एक कप चहाच्या किंमतीपेक्षाही कमी दरात मिळतं, हे एकूण तुमचा विश्वास बसणार नाही, मात्र हे खरं आहे.

मंगोलिया हा असा एक देश आहे, जिथे मटणाची किंमत ही एक कप चहापेक्षाही स्वस्त आहे. मंगोलियामध्ये माणसांपेक्षा प्राण्यांची संख्या अधिक आहे. दूध आणि मांस हेच इथल्या लोकांचा प्रमुख आहार आहे. मंगोलिया या देशाची लोकसंख्या अंदाजे 35 लाखांच्या आसपास आहे, तर या देशामध्ये प्राण्यांची संख्या ही 50-70 मिलियनपेक्षाही अधिक आहे. याचा अर्थ इथे प्रत्येक व्यक्तीमागे जनावरांची संख्या ही 15-20 एवढी आहे. या प्राण्यांमध्ये शेळी, गाय, घोडे आणि ऊंट यांचा समावेश आहे. मंगोलियाचं क्षेत्रफळ देखील लोकसंख्येच्या तुलनेनं मोठं आहे. त्यामुळे येथील लोकांसाठी पशुपालन हे फार खर्चिक नसतं. त्यांचे पशु हे मोकळ्या गवताळ मैदानामध्ये चरतात. त्यामुळे इथे मटण मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतं, त्यामुळे या देशात मटणाची किंमत ही एका चहाच्या कपापेक्षाही कमी असते.

आहार

मंगोलियाच्या नागरिकांच्या आहारामध्ये शाकाहारी पदार्थ हे खूप कमी प्रमाणात असतात. भात, पोळी यांचा आहारातील समावेश हा खूप कमी असतो. हे लोक आपल्या आहारात सर्वाधिक दोनच गोष्टींचा समावेश करतात. एक रेड फूड म्हणजे मांस तर दुसरं व्हाईट फूड म्हणजे दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा समावेश असतो. थंडीच्या दिवसांमध्ये तर हे लोक संपूर्णपणे आपल्या आहारात केवळ मांसाहारी पदार्थांचा समावेश करतात.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुरटीचे पाणी चेहऱ्यावर लावल्यामुळे काय होते? पिंपल्सच्या समस्या खरचं दूर होतात का?
  • सोनाक्षी सिन्हा हिच्या प्रेग्नंसीवर आईचे मोठे विधान, थेट म्हटले, कितीतरी वेळा मी आजी..
  • IPL 2026: लाईव्ह सामन्यात झाली मोठी चूक, हैदराबादने जिंकलेला सामना लखनौच्या पारड्यात पडला! Video
  • पूजेसाठी नारळ आणि केळीच का वापरतात? लहानपणापासून पडलेल्या प्रश्नाचे उत्तर अखेर सापडलं
  • महाराष्ट्राची मुलगी, विषाची पर्वा न करता जीव धोक्यात घालून 3000 सापांचे प्राण वाचवणारी अभिनेत्री

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in