• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

जगाचे वाढले टेन्शन, इराणने उचलले धक्कादायक पाऊल, थेट इस्त्रायलच्या…

March 22, 2026 by admin Leave a Comment


इराण आणि अमेरिका युद्ध सुरू आहे. 28 फेब्रुवारी 2026 रोजी इस्त्रालय आणि अमेरिकेकडून मोठा हल्ला इराणवर करण्यात आला. या हल्ल्यानंतर इराण जखमी सिंह बनला आणि अमेरिकेसह इस्त्रायलला सळो की पळो करून सोडले. ज्या ज्या देशात अमेरिकेचे लष्कर तळ आहेत, त्या ठिकाणांवर मोठे हल्ले इराणकडून करण्यात आले. आता इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष इतका जास्त वाढला आहे की, थेट परमाणू ठिकाणांपर्यंत हे युद्ध पोहोचले आहे. इस्त्रायलने केलेल्या हल्ल्यानंतर त्याला प्रतिउत्तर देताना इराणकडून घातक हल्ले करण्यात आले. इराणकडून बॅलिस्टिक मिसाईलने इस्त्रायलच्या अराद आणि डिमोना शहरांवर हल्ला केला. धक्कादायक बाब म्हणजे इस्त्रायलच्या डिमोना शहरात अत्यंत संवेदनशील परमाणू अनुसंधान केंद्र आहे.

इस्त्रायलकडून मिळालेल्या माहितीनुसार, इराणने केलेल्या या हल्ल्यानंतर लगेचच मदतकार्य राबवण्यात आले. डिमोना शहरात इराणकडून करण्यात आलेल्या हल्ल्यात 100 पेक्षा अधिक लोक गंभीर जखमी झालेत. या हल्ल्याचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये इराणी मिसाईल डिमोना शहरात पडताना दिसत आहे.

मिसाईल हल्ल्यादरम्यान अनेक लोक बंकरकडे पळून जाताना दिसत आहेत. प्रत्येकजण आपला जीव वाचवण्यासाठी बंकरकडे धावताना दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात 10 वर्षांचा मुलगा जखमी झाल्याचीही माहिती मिळत आहे. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यानंतर माहिती घेतली असता परमाणू ठिकाणांचे कोणतेही नुकसान झाल्याची माहिती मिळत नाहीये.

एजन्सीची बारीक नजर या घटनांवर आहे. डिमोनापासून 13 किलोमीटर लांबीवर परमाणू प्रकल्प आहे. इराणकडून इस्त्रायलच्या डिमोना शहरावर हल्ला म्हणजे हे घातक पाऊल आहे. हे युद्ध परमाणूपर्यंत पोहोचवू नये, अशी सर्वांचीच इच्छा असताना अशाप्रकारे मोठे हल्ले केले जात आहेत. अमेरिकेने इराणला मोठी धमकी दिली. मात्र, या धमकीला इराणने भीक घातली नाही. उलट आपले हल्ले अधिक घातक केली. अगोदरच इराणकडून स्पष्ट करण्यात आले की, आम्हाला संपवण्याचा प्रयत्न करण्यात आला तर आम्ही इस्त्रायलच्या परमाणू ठिकाणांवर हल्ले करू.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तर घरात होईल डांसांचे साम्राज्य, कधीच करून नका या चुका नाहीतर पश्चात्तापाशिवाय पर्याय नाही!
  • घरात या गोष्टी दिसल्या की सगळं उद्ध्वस्त झालंच म्हणून समजा, वाचा चाणक्यांनी सांगितलेलं गुपित!
  • Chhagan Bhujbal | हेलिकॉप्टरचा अपघात टळला, घटनेनंतर भुजबळांची प्रतिक्रिया समोर
  • Sunetra Pawar | ‘सुनेत्रा पवारांना चाकणकरांकडून धोका असल्याची तक्रार’ मुख्यमंत्री म्हणाले…
  • IPL 2026: सलग तीन पराभवानंतर सीएसकेची विजयी सलामी, दिल्लीला 23 धावांनी केलं पराभूत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in