• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

चीनचे फायटर जेट, युद्ध नौका मैदानात; अमेरिकेसोबत युद्धाची तयारी पूर्ण, चायनाच्या नव्या निर्णयाने जगभरात खळबळ

March 15, 2026 by admin Leave a Comment


युद्धामुळे मध्यपूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. 28 फेब्रुवारी रोजी इस्त्रायलकडून इराणवर हल्ला करण्यात आला, तेव्हापासून इराण, इस्त्रायल आणि अमेरिकेमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धाचा आज 16 दिवस आहे. दरम्यान या युद्धामुळे जगातील देश दोन गटात विभागाले गेले आहेत. काही जणांनी या युद्धात इस्त्रायल आणि अमेरिकेला पाठिंबा दिला आहे. तर काही जणांनी इराणला पाठिंबा जाहीर केला आहे. काही देश अजूनही अलिप्त आहेत. दरम्यान या युद्धात रशिया आणि चीनने इराणला पाठिंबा दिला आहे. युद्धाच्या दुसऱ्याच दिवशी अमेरिका आणि इस्त्रायलकडून करण्यात आलेल्या हल्ल्यांमध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला होता, त्यानंतर इराणकडून नव्या सर्वोच्च नेत्याची निवड करण्यात आली. अयातुल्ला अली खामेनेई यांचा मुलगा मोजतबा खामेनेई यांची सर्वोच्च नेता म्हणून निवड करण्यात आली, दरम्यान मोजताबा खामेनेई इराणचे नवे सर्वोच्च नेते होताच रशियानं इराणला आपला पाठिंबा जाहीर केला. तसेच रशिया गुप्तपणे अमेरिकनं सैन्य तळांची माहिती इराणला पुरवत असल्याचा आरोप देखील होत आहे.

एकीकडे या यु्द्धात रशिया इराणच्या बाजूने उभा आहे, तर दुसरीकडे चीनने देखील इराणला पाठिंबा दिला आहे. चीनने इराणला दोन लाख डॉलरची मदत देण्याची घोषणा केली आहे. एवढंच नाही तर इराणला जशी गरज लागेल तशी आम्ही त्यांना रसद पुरवू असं देखील चीनने म्हटलं आहे. मात्र हे युद्ध सुरू असतानाच आता मोठी बातमी समोर येत आहे. जगात आणखी एक युद्ध सुरू होण्याची शक्यता आहे. तैवानवर हल्ला करून तैवान ताब्यात घेण्याची चीनची तयारी सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे. चीनने तैवानच्या आसपास अचानक आपली सैन्य संख्या वाढवली आहे. तसेच तैवानच्या आसपास मोठ्या प्रमाणात युद्धनौका आणि फायटर जेट देखील तैनात करण्यात आले आहेत.

चीनने जर तैवानवर हल्ला केलाच तर तैवानच्या मदतीला अमेरिका या युद्धात उतरू शकते. चीनने अमेरिकेसोबत देखील लढण्याची पूर्ण तयारी केल्याची माहिती एका रिपोर्टमधून समोर आली आहे. दरम्यान अमेरिका सध्या इराणविरोधातील युद्धात अडकली आहे. याचाच फायदा घेऊन चीनकडून आता तैवानवर हल्ला होण्याची शक्यता आहे. जर चीनने तैवानवर हल्ला केला तर अमेरिकेला एकाचवेळी दोन आघाड्यांवर लढावे लागणार आहे. हा अमेरिकेसाठी मोठा धक्का असणार आहे. तैवान हा आमचाच प्रदेश असल्याचा दावा चीनकडून वारंवार करण्यात येत आहे. दरम्यान चीनने फायटर जेट आणि युद्ध नौका तैवानच्या आसपास तैनात केल्याचा वृत्ताला तैवानच्या संरक्षण मंत्रालयाकडून देखील दुजोरा देण्यात आला आहे.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तिकडे जग युद्धाच्या चर्चेत गुंतलं अन् इकडे चीनने पाकिस्तानचा लचकाच तोडला, पाकला हादरवणारं असं काय घडलं?
  • MI vs RCB : आधी धोनी आता रोहित-विराट आयपीएलमधून OUT का? इंजरीबद्दल समोर आली महत्वाची अपडेट
  • सुनेत्रा पवारांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे तक्रार, नेमकं कारण काय?
  • Asha Bhosle last rites LIVE : महाराष्ट्राचा सूर हरपला…, आशा ताईंवर आज शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार
  • US-Iran Tension : फक्त काही तास… पुन्हा युद्धाचा भडका, ट्रम्प भयंकर संतापले, जगात हाहाकार उडणार, आता..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in