• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

‘चिरैया’मधल्या विचलित करणाऱ्या ब्लेडच्या सीनविषयी अभिनेत्याचा खुलासा; म्हणाला “तिने दार उघडलं..”

April 7, 2026 by admin Leave a Comment


‘चिरैया’ ही वेब सीरिज सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे. ‘मॅरिटल रेप’ अर्थात वैवाहिक बलात्कारसारख्या गंभीर विषयावर या सीरिजमध्ये भाष्य करण्यात आलं आहे. या सीरिजमधल्या एका सीनने प्रेक्षकांच्या अंगावर अक्षरशः काटा आणला. हा सीन पूजा आणि अरुण यांच्यातील आहे. हे दोघं मनालीला जातात. तिथे अशी काही घटना घडते जिचा विचार करूनही अंगावर काटा येतो. या सीरिजमध्ये अभिनेता सिद्धार्थ शॉने अरुणची तर प्रसन्नाने पूजाची भूमिका साकारली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रसन्नाने सीरिजमधील ब्लेडच्या सीनविषयी खुलासा केला. हा सीन करताना तिच्या मनात कोणती भावना होती, दिग्दर्शकांनी तिला काय सांगितलं होतं, याविषयी ती मोकळेपणे व्यक्त झाली.

सीनबद्दल काय समजावलं होतं?

सिद्धार्थ म्हणाला, “सीरिजमध्ये जेव्हा आमचं लग्न झालं, तेव्हा आमच्या रुमसमोरच दादा आणि वहिनीची रुम असते. त्यामुळे अरुणच्या डोक्यात सुहागरातबद्दल जे काही सुरू होतं, ते त्याला करता येत नाही. घरी सर्वजण असतात, खाली फंक्शन सुरू असतात. त्यामुळे जेव्हा तुम्ही हनिमूनला जाता, तेव्हा तो वेळ तुमचा असतो. जी काही फँटसी तुमच्या डोक्यात आहे, ती पूर्ण करा.. कारण आसपास कोणीच नसतं. तुम्ही हनिमूनला गेले आहात आणि प्रॅक्टिकली तेच करायला आला आहात. मला अशीच ब्रीफिंग देण्यात आली होती.”

 

View this post on Instagram

 

A post shared by JioHotstar (@jiohotstar)

ब्लेडच्या सीनदरम्यान तुझ्या डोक्यात काय विचार सुरू होते, असा प्रश्न विचारला असता तो पुढे म्हणाला, “जर मी सिद्धार्थसारखा विचार केला असता तर तो सीन करू शकलो नसतो. त्यावेळी मी पूर्णपणे अरुण होतो, जो सेक्ससाठी काहीही करू शकत होता. त्याच्या डोक्यात एकच गोष्ट होती की, फिजिकली इंटीमेट होण्यासाठी काहीही केलं तरी चालेल. अरुणच्या डोक्यात त्यावेळी असा विचार होता की जर पूजाने दार उघडलं आणि खरंच तिला मासिक पाळी आली असेल, तरीसुद्धा तो सगळं काही करणार होता. त्याक्षणी माझ्या डोक्यात फक्त अरुणचे विचार होते, फक्त हवस होती.”

त्या सीनविषयी प्रसन्नाने पुढे सांगितलं, “मी आताही सुन्न आहे आणि त्या क्षणीही मी सुन्न होते. माझ्यात फक्त भीती आणि असहाय्य असल्याची भावना होती. ते मी शब्दांत मांडू शकत नाही.” ‘चिरैया‘ ही एकूण सहा एपिसोड्सची वेब सीरिज आहे. यामध्ये मॅरिटल रेप, महिलांच्या इच्छा, त्यांची संमती, पितृसत्ताक समाज यांसारखे विषय अधोरेखित करण्यात आले आहेत. यामध्ये अभिनेत्री दिव्या दत्ता ही कमी शिकलेल्या सुनेच्या आणि जाऊबाईच्या भूमिकेत आहे. तिला मुलं नसतात, त्यामुळे दीर अरुण तिच्यासाठी तिच्या मुलासारखाच आहे. जेव्हा त्याचं लग्न होतं, तेव्हा कमलेशचा (दिव्या दत्ता) सामना त्याच्या शारीरिक संबंधांच्या बाबतीत धक्कादायक गोष्टींशी होतो.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • क्रिकेटपटू अर्शदीप सिंग या प्रसिद्ध अभिनेत्रीला डेट करतोय? मिस्ट्री गर्लचा फोटो झाला व्हायरल…
  • RR vs MI : वैभव-जैस्वालची विस्फोटक बॅटिंग, राजस्थानच्या सलामी जोडीचे पलटण विरुद्ध इतके सारे विक्रम
  • Bcci : वैभव सूर्यवंशी-आयुष म्हात्रेचा भारतीय संघातून पत्ता कट, बीसीसीआयचा मोठा निर्णय
  • देशातील सर्वांत मोठ्या घोटाळ्याची कहाणी, IMDb वर 9.1 रेटिंग; 5 एपिसोड्सची धमाकेदार सीरिज
  • Gold Price Today : उच्चांक निचांक एका बाजूला… आजचे सोन्याचे भाव थेट… लगेच घ्या सोनाराकडे धाव

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in