• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

चिकनचा कोणता भाग सर्वाधिक पौष्टिक? 99 टक्के लोकांना माहीतच नसतं

April 6, 2026 by admin Leave a Comment


नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी चिकन हे एक सुपर फूड आहे. चिकन खाण्याचे अनेक फायदे आहारशास्त्रामध्ये सांगण्यात आले आहेत. भारतामध्ये जे लोक नॉनव्हेज खातात त्यांची पहिली पसंत प्रमुख्याने मटण आणि चिकन या दोनच गोष्टींना असते. तांत्रिकदृष्ट्या कोंबडीच्या मांसाला चिकन असं म्हटलं जातं. भारतामध्ये चिकनचे विविध पदार्थ मोठ्या आवडीने खाल्ले जातात, ज्यामध्ये चिकन कबाब, चिकन हंडी, चिकन तंदुरी, चिकन बिर्यानी असे अनेक पदार्थ प्रचंड लोकप्रिय आहेत, आणि त्यांना मोठी मागणी देखील असते. जे लोक नॉनव्हेज खातात त्यांच्यासाठी चिकन हा मटणाच्या तुलनेत एक स्वस्त पर्याय आहे. तसेच चिकन हे मटणापेक्षा पचनास देखील हलके असते.

भारतामध्ये कोंबडीच्या विविध जाती आढळतात. ज्यामध्ये गावरान कोंबडी, बॉयलर कोंबडी, कडकनाथ कोंबडी. जशी कोंबडीची जात बदलली की चिकनची चव आणि किमतीमध्ये देखील फरक पडतो. कडकनाथ कोंबडीच्या चिकनला जास्त मागणी असते. मटण हे चिकनच्या तुलनेत जास्त महाग असल्यामुळे अनेक जण मटणाऐवजी चिकनला पसंती देतात, किंवा सर्वसामान्य लोकांच्या खिशाला देखील चिकनचे भाव परवडतात. सध्या राज्यात दोनशे ते तीनशे रुपये प्रति किलो चिकनचा भाव सुरू आहे.

आता आपण आपल्या मुळ मुद्द्यावर येऊयात, चिकनचा कोणता भाग हा सर्वाधिक पौष्टिक असतो, आणि चिकन खाल्ल्याचे शरीराला नेमके काय -काय फायदे होतात? चिकन बेस्ट ज्याला साध्या भाषेत आपण कोंबडीच्या छातीचे मांस असं देखील म्हणून शकतो, हा भाग सर्वाधिक पौष्टिक असतो. याचं वैशिष्ट म्हणजे यातून तुम्हाला भरपूर प्रमाणात पोषणमुल्य प्राप्त होतात. मोठ्या प्रमाणात प्रोटिन देखील मिळतं आणि तुमचं वजन देखील वाढत नाही. चिकन थाई अर्थात मांडी हा भाग देखील अत्यंत पौष्टिक आणि चविष्ट असतो. यामध्ये मोठ्या प्रमाणात लोह, झिंक आणि व्हिटॅमीन बी 12 आढळून येतं. जर तुम्हाला हात-पाय दुखण्याच्या समस्या असतील किंवा सारखा थकवा जणवत असेल तर यातून तुम्हाला पोषणमुल्य मिळू शकतात. यासोबतच चिकनचे इतर भागही पौष्टिक असतात.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • काळी मिरीच्या ‘या’ उपायांनी तुमचं नशिब चमकणार…. एका क्लिकवर जाणून घ्या
  • आता स्कूटर नाही, चालतं-फिरतं गॅजेट, टचस्क्रीनसह येणारे ‘हे’ 5 इलेक्ट्रिक स्कूटर पाहा
  • एप्रिल 2026 मधील विवाहाच्या शुभ मुहूर्तांची जाणून घ्या ही संपूर्ण यादी
  • Maruti Alto आणि Brezza वर मोठा डिस्काउंट, जाणून घ्या नवीन किमती
  • घराची फरशी पुसताना ‘या’ वास्तु नियमांचे पालन करा, घरातील आर्थिक चणचण होईल दूर.

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in