• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

चाळीशीतही त्वचा चमकदार दिसण्यासाठी आहारात ‘या’ कोलेजनयुक्त पदार्थांचा करा समावेश

April 8, 2026 by admin Leave a Comment


चाळीशी ओलांडल्यावर चेहऱ्यावर सुरकुत्या, बारीक रेषा आणि निस्तेजपणा दिसून येतो. वाढत्या वयानुसार आपला चेहरा तेजस्वी राहावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. मात्र आजच्या धावपळीच्या आणि अनहेल्दी जीवनशैलीचा त्वचेवर परिणाम होत आहे. अनहेल्दी खाण्याच्या सवयी, धूळ आणि प्रदूषण ही मुख्य कारणे असली तरी कोलेजनची कमतरता हे त्वचेच्या समस्यांचे एक प्रमुख कारण आहे.

कोलेजन हे एक प्रथिन आहे जे त्वचेला घट्टपणा, लवचिकता आणि तारुण्य देते. मात्र वाढत्या वयानुसार त्याचे उत्पादन कमी झाल्यावर त्वचेची चमक कमी होते. कोलेजन वाढवण्यासाठी अनेक उत्पादने आणि उपचार उपलब्ध असले तरी ते नैसर्गिक घटकांच्या मदतीने देखील वाढवता येते. तर आजच्या लेखात आपण अशाच कोलेजन वाढवणाऱ्या पदार्थांबद्दल जाणून घेणार आहोत जे वयाच्या चाळीशीतही तुमची त्वचा चमकदार ठेवण्यास मदत करतील.

कोलेजन म्हणजे काय आणि ते महत्त्वाचे का आहे?

कोलेजन हे केस, नखं, हाडे आणि त्वचेसाठी एक अत्यावश्यक प्रथिन आहे. कोलेजन त्वचेला घट्ट आणि तरुण ठेवण्यास मदत करते, तसेच त्वचेवरील सुरकुत्या आणि सैलपणा कमी करते. जसजसे आपले वय वाढते, तसतसे कोलेजनचे उत्पादन हळूहळू कमी होते ज्यामुळे वृद्धत्वाची ससमस्या, सांधेदुखी आणि केस गळणे यांसारख्या समस्या उद्भवतात. त्यामुळे निरोगी आणि चमकदार त्वचा व केस टिकवण्यासाठी कोलेजनची पातळी राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

आहारात कोलेजन वाढवणारे पदार्थांचा करा समावेश

आवळ्याचे सेवन – आवळा व्हिटॅमिन सी चा एक उत्कृष्ट स्रोत आहे, जे कोलेजनच्या निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. त्यात अँटीऑक्सिडंट्सही भरपूर प्रमाणात असतात. नियमितपणे आवळ्याचे सेवन केल्याने त्वचेचा घट्टपणा टिकून राहण्यास, सुरकुत्या कमी होण्यास आणि चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येण्यास मदत होते.

बदाम देखील फायदेशीर आहे – कोलेजन वाढवण्यासाठी बदाम हा एक चांगला पदार्थ आहे. त्यामध्ये व्हिटॅमिन ई, आरोग्यदायी फॅट्स आणि प्रथिने असतात, जे त्वचेचे पोषण करतात आणि कोलेजन कमी होण्यास रोखतात. दररोज काही बदाम खाल्ल्याने त्वचा मऊ राहण्यास आणि वृद्धत्वाची चिन्हे कमी होण्यास मदत होते.

टोमॅटो सेवन करा – टोमॅटोमध्ये लायकोपीन आणि व्हिटॅमिन सी असते जे तुमच्या त्वचेला सूर्याच्या हानिकारक किरणांपासून वाचवण्यास आणि कोलेजनचे उत्पादन वाढविण्यात मदत करतात. यामुळे त्वचा घट्ट राहण्यास आणि डाग कमी करण्यास मदत होते. याकरिता आपल्या आहारात टोमॅटोचा समावेश करणे फायदेशीर ठरू शकते.

हिरव्या पालेभाज्या – कोलेजन वाढवण्यासाठी हिरव्या पालेभाज्या देखील खूप उपयुक्त आहेत. यामध्ये पालक, मेथी यांसारख्या हिरव्या भाज्यांचा आपल्या आहारात समावेश केल्यास त्यातील लोह, जीवनसत्त्वे ए, सी आणि क्लोरोफिल हे घटक शरीरातील कोलेजनची पातळी वाढवण्यास मदत करतात. तसेच या भाज्याच्या सेवनाने त्वचेला आतून डिटॉक्सिफाय करतात, ज्यामुळे त्वचा निरोगी आणि चमकदार बनते.

लिंबूवर्गीय फळांचाही समावेश करा: संत्री, लिंबू यांसारख्या लिंबूवर्गीय फळांमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, जे कोलेजनच्या निर्मितीसाठी आवश्यक आहे. ही फळे त्वचाला आतून आर्द्र ठेवतात, सुरकुत्या कमी करतात आणि त्वचेची नैसर्गिक चमक टिकवून ठेवतात.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • दररोज एक ग्लास ‘हे’ पेय प्यायल्यास मुरुम आणि बद्धकोष्ठतेवर होईल मात, करून पहा रामबाण उपाय
  • बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार, सुनील तटकरे अजित पवारांचे नाव घेत म्हणाले…
  • Meesho ला तेजीचे पंख! 1 दिवसात 14 टक्क्यांनी उसळला शेअर, गुंतवणूकदारांचा मोठा फायदा
  • लग्नाच्या 11 वर्षांनंतर करण पटेलचा घटस्फोट? पत्नीने सोडलं मौन, म्हणाली “लग्नाच्या वेळी..”
  • Joint Family मध्ये राहिल्यामुळे तुमचे मन शांत होते का?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in