• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

‘घोडचूक झाली… रशियन महिलेशी प्रेमसंबंध होते’ एपस्टिन फाईलच्या नंगानाचवर बिल गेट्स पहिल्यांदाच बोलले

February 25, 2026 by admin Leave a Comment


जेफ्री एपस्टाईन फाईल्समुळे जगातील बडे लोक अडचणीत सापडले आहेत. प्रसिद्ध उद्योगपती बिल गेट्स यांच्याही अडचणी वाढल्या आहेत. या प्रकरणात नाव आल्यानंतर गेट्स हे आता माफी मागत आहेत. त्यांनी दोन रशियन महिलांसोबत प्रेमसंबंध असल्याचे कबूल केले आहे. तसेच त्यांनी आपल्या बिल गेट्स फाउंडेशनच्या कर्मचाऱ्यांची जाहीरपणे माफी मागितली आहे, त्यांनी म्हटले की मी एक गंभीर चूक केली आहे. बिल गेट्स यांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.

एपस्टाईन फाईल्समध्ये बिल गेट्स यांचे नाव

एपस्टाईन फाईल्समुळे जगभरातील बड्या लोकांची झोप उडाली आहे. यात बिल गेट्स यांचेही नाव समोर आले आहे. टाउन हॉल बैठकीत, गेट्स यांनी त्यांच्या भूतकाळातील संबंधांबद्दलच्या प्रश्नांना उत्तर दिले. यावेळी त्यांनी कबूल केले की एपस्टाईनसोबत वेळ घालवणे आणि फाउंडेशनमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी त्यांची ओळख करून देणे ही मोठी चूक होती. या निर्णयामुळे संस्थेतील लोकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली.

पीडितांशी माझा काहीही संबंध नाही – गेट्स

टाऊन हॉलमध्ये, गेट्स यांनी एपस्टाईन फाइल्समध्ये उल्लेख केलेल्या रशियन महिलांसोबत प्रेमसंबंध असल्याचेही कबूल केले आहे. मात्र त्यांनी म्हटले की, या रिलेशनचा एपस्टाईनच्या पीडितांशी काहीही संबंध नाही. समोर आलेल्या वृत्तांनुसार एपस्टाईनसोबतच्या त्यांच्या भूतकाळातील संभाषणाचे तपशील समोर आले आहेत. याच काळात बिल गेट्स यांचे हे विधान समोर आले आहे.

मी काहीही बेकायदेशीर केले नाही – बिल गेट्स

अमेरिकेच्या न्याय विभागाने एपस्टाईन फाईल्समधील कागदपत्रे आणि फोटो सार्वजनिक केली आहेत. यात गेट्स आणि एपस्टाईन यांच्यातील अनेक बैठकांची माहिती देण्यात आली आहे. काही छायाचित्रांमध्ये गेट्स महिलांसोबत असल्याचे दिसत आहे, मात्र त्यांची ओळख समोर आलेली नाही. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, टाउन हॉल मीटिंग दरम्यान, बिल गेट्सने फायलींमध्ये उल्लेख केलेल्या रशियन महिलांशी वैयक्तिक संबंध असल्याचे कबूल केले. मात्र त्यांनी ‘मी काहीही बेकायदेशीर केले नाही किंवा असे काही पाहिले नाही.” दरम्यान, जगातील इतरही बड्या लोकांची नावे या प्रकरणात समोर आली आहेत.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • vastu tips : घरात पैसा टिकत नाही? मग आजच घरी आणा या वस्तू
  • Premanand Maharaj: प्रेमानंद महाराज सांगतात फक्त केसांवरून ओळखा भोंदूबाबा, म्हणाले…
  • Vastu Shastra : घरात आल्यानंतर अस्वस्थ वाटतं? कामात लक्ष लागत नाही? मग करा हा सोपा उपाय
  • Vastu Shastra : घरात पैसा टिकत नाही? कर्ज वाढलंय? मग वास्तुशास्त्रामधील हा उपाय कराच
  • Chanakya Niti : तुम्हाला जर या सवयी असतील तर आयुष्यात कधी पैशांची कमी भासणार नाही, चाणक्य काय सांगतात?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in