• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

घर आणि ऑफिसच्या सुरक्षेसाठी खरेदी करा या 3 भारतीय ब्रँड्सचे सीसीटीव्ही कॅमेरे

March 31, 2026 by admin Leave a Comment


2026 मध्ये भारत सरकारने लागू केलेल्या नवीन नियमांमुळे (एसटीक्यूसी प्रमाणपत्र) आणि चिनी ब्रँड्सवरील वाढत्या निर्बंधांमुळे ‘मेड इन इंडिया’ ब्रँड्सची लोकप्रियता वाढत आहे. त्यामुळे 1 एप्रिलपासून भारतात चिनी सीसीटीव्ही ब्रँड्सवर बंदी येऊ शकते. जर तुम्हीही चिनी कॅमेऱ्यांऐवजी भारतीय ब्रँडचे सीसीटीव्ही कॅमेरे खरेदी करण्याचा विचार करत असाल तर बाजारात कोणते भारतीय ब्रँड्स सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे उत्पादन आणि विक्री करत आहेत, हे जाणून घेऊयात.

CP Plus CCTV Cameras

सीपी प्लस हा भारतातील सर्वात मोठा आणि लोकप्रिय सीसीटीव्ही ब्रँड आहे. ही कंपनी बजेट कॅमेऱ्यांपासून ते हाय-एंड कमर्शियल कॅमेऱ्यांपर्यंत विविध प्रकारच्या कॅमेऱ्यांची पूर्ण रेंज सादर करते. तुम्हाला ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर वेगवेगळ्या किंमतींच्या रेंजमध्ये विविध मॉडेल्स मिळतील, या कंपनीचे सर्व कॅमेरे दमदार वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहेत. सर्वात स्वस्त सीपी प्लस मॉडेल (CP-URC-DC24PL3) ॲमेझॉनवर 49% सवलतीनंतर फक्त 810 रूपयांमध्ये उपलब्ध आहे. तुम्ही तुमच्या गरजा आणि वैशिष्ट्यांनुसार तुम्हाला हवे असलेले मॉडेल निवडू शकता.

Qubo CCTV Cameras

क्यूबो हा एक भारतीय ब्रँड आहे. 2019 मध्ये लाँच झालेली ही एक स्मार्ट डिव्हाइस कंपनी असून, तिला 66 वर्षे जुन्या हीरो ग्रुपचा म्हणजेच हीरो इलेक्ट्रॉनिक्सच्या माध्यमातून पाठिंबा आहे आणि ही कंपनी आता ‘मेक इन इंडिया’ उत्पादनांवर लक्ष केंद्रित करते. क्यूबोचे सर्वात स्वस्त मॉडेल Qubo Smart Cam 360° Pro ॲमेझॉनवर 40 % सवलतीनंतर 3 हजार 290 रूपयांना विकले जात आहे. हा कॅमेरा 360-डिग्री पॅनोरामिक मॉनिटरिंग, कलर नाईट व्हिजन, टू-वे टॉक, एआय पर्सन डिटेक्शन, एसडी आणि क्लाउड सपोर्ट यांसारख्या वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे.

Godrej CCTV Cameras

ही Godrej & Boyce मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लिमिटेडची एक उपकंपनी आहे, जी मुंबईत असलेल्या गोदरेज ग्रुप या भारतीय ग्रुपचा एक भाग आहे. तुम्हाला गोदरेजचे सीसीटीव्ही कॅमेरे ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्टवर मिळणार नाहीत, तर ते कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर मिळतील. तुम्ही ते कंपनीच्या वेबसाइटवरून खरेदी करू शकता. कंपनीच्या वेबसाइटवर, तुम्हाला वेगवेगळ्या वैशिष्ट्यांसह आणि वेगवेगळ्या किंमतींच्या रेंजमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे मिळतील. सर्वात स्वस्त मॉडेलची किंमत 2 हजार 655 रूपयेआहे, तर इतर मॉडेल्स तुम्ही तुमच्या गरजा आणि वैशिष्ट्यांनुसार निवडू शकता.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ती पोस्ट पाहिल्यामुळेच बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतून माघार नाही; करुणा मुंडे यांचा मोठा दावा
  • तांब्याच्या की काचेची… कोणत्या बाटलीत पाणी पिणे ठरेल योग्य?
  • Video: गुजरात टायटन्सचा चुरशीच्या लढतीत विजय, पण आशिष नेहरा शुबमन गिलवर संतापला; कारण..
  • पोस्ट ऑफीस योजनेत किती दिवसात होतात पैसे डबल?, या दोन योजना सर्वात वेगाने रक्कम वाढवतात
  • पोस्ट ऑफीस योजनेत किती दिवसात होतात पैसे डबल?, या दोन योजना सर्वात वेगाने रक्कम वाढवतात

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in