• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

घरात सर्वत्र असतो पसारा आणि कचरा…, येतील कायम अडथळे, वास्तूनुसार होतील 4 मोठे तोटे

April 9, 2026 by admin Leave a Comment


स्वच्छ आणि प्रसन्न वातावरणात माता लक्ष्मीचा वास असतो… असं आपल्याला कायम सांगण्यात येतं. घरात स्वच्छता असल्यामुळे प्रसन्नता आणि सकारात्मक ऊर्जा त्या घरात धन आणि भरभराट येते. पण अनेक जण घर वेळेत स्वच्छ करत नाही. ज्यामुळे घरात अस्वच्छता राहते आणि त्याचा परिणाम आरोग्यावर आणि भविष्यावर होतो. असं अनेकांना वाटतं की, भविष्यात उपयोगी पडतील या विचाराने आपण अनेकदा जुन्या किंवा तुटलेल्या वस्तू घरात ठेवतो. पण वास्तुशास्त्रानुसार, हा कचरा केवळ जागाच व्यापत नाही, तर घरात नकारात्मक ऊर्जादेखील साठवतो. जर या वस्तू घरात जास्त काळ राहिल्या, तर त्या गंभीर नुकसान पोहोचवू शकतात.

प्रगतीतील अडथळे: वास्तूनुसार, घरात पडून असलेल्या निरुपयोगी वस्तूंमुळे जीवनात पुढे जाण्याच्या ऊर्जेला अडथळा येतो. यामुळे, तुमच्या होणाऱ्या कामांना अधिक वेळ लागतो किंवा मानसिक ताण वाढत असल्याचे, असे तुम्हाला सतत जाणवत राहील.

आर्थिक अडचण: असे मानले जाते की, ज्या घरात सुव्यवस्था नसते आणि जे अनावश्यक वस्तूंनी भरलेले असते, तिथे लक्ष्मीचा वावर कमी असतो. पसारा तुमच्या निर्णयक्षमतेवर परिणाम करतो, ज्यामुळे आर्थिक नुकसान होऊ शकते.
आरोग्यावर दुष्परिणाम: जुन्या फर्निचरवर धूळ, घाण आणि जीवाणू लवकर जमा होतात. वास्तूनुसार, घर जितके मोकळे आणि स्वच्छ असेल, तितके आरोग्य चांगले राहील. घरात कचरा ठेवल्याने आजारांचे प्रमाण वाढू शकते.

नात्यातील समस्या: घरातील वातावरण जेवढे तणावपूर्ण असेल, तेवढा स्वभाव चिडचिडा होईल. यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये तणाव आणि वाद होण्याची शक्यता वाढते.

या दिशेत चुकूनही कचरा ठेवू नका: वास्तुशास्त्रानुसार, ईशान्य दिशा अत्यंत पवित्र मानली जाते, कारण ही दिशा देवदेवतांचे निवासस्थान मानली जाते. या दिशेत जड वस्तू, जुने बूट किंवा कचरा कधीही ठेवू नये. जर या कोपऱ्यात घाण किंवा कचरा असेल, तर घरात खूप नकारात्मकता येऊ शकते.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • घराची फरशी पुसताना ‘या’ वास्तु नियमांचे पालन करा, घरातील आर्थिक चणचण होईल दूर.
  • ‘या’ दिवशी आहे वरुथिनी एकादशी, जाणून घ्या शुभ वेळ आणि पूजेची पद्धत
  • ‘या’ तारखेला साजरी होणार अक्षय्य तृतीया , पूजेचा मुहूर्त आणि सोने खरेदीची वेळ माहित्ये का ?
  • Vastu Shastra : घरात बरकत नाहीये? मग आर्थिक स्थैर्यासाठी करा हा सोपा उपाय
  • नोकरीसाठी मुलाखतीला जात आहात? मग करा वास्तुशास्त्रात सांगितलेला हा सोपा उपाय, यश तुमचंच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in