• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

घरात या भागात पाली घालतात अंडे… छी तुम्ही विचारही करणार नाहीत दररोज तिथेच…

March 16, 2026 by admin Leave a Comment


बहुतेक घरांमध्ये पाली असतात. बेडरूम, किचन, हॉल आणि बाथरूम टॉयलेटमध्येही पाली असतात. आपल्यापैकी अनेकांना पालीची प्रचंड भीती वाटते. पाल दिसली तरीही आपण घाबरून पळतो. अनेकदा किचनमध्ये भांड्यांवरही पाल भिरताना दिसते. मात्र, कितीही प्रयत्न करूनही पाल काही जाण्याचे नाव घेत नाही. पालीवर अनेक प्रकारची आैषधे टाकली जातात, गोळ्या ठेवल्या जातात. पण याचा काहीच परिणाम पालींवर होत नाही. बरेच लोक पाल खिडकीतून येते म्हणून जाळीही लावतात, तरीही पाली घरात येतातच. यासोबतच पालीचे छोटे छोटे पिल्ले देखील घरात दिसतात. छोटे पिल्ले घरात दिसले की, अजूनच घाण वाटते. कितीही प्रयत्न केला तरीही घरात पाल अंडे घालते. पाल कुठेही अंडे घालत नाही तर काही ठराविक जागा घरात असतात तिथेच पाल अंडी घालते. या जागा नक्की कोणत्या याबद्दल जाणून घेऊयात.

पाली कुठेही अंडे घालत नाहीत. शांत आणि ज्याठिकाणी जास्त हालचाल नसते, अशाच ठिकाणी पाली अंडी घालतात. विशेष म्हणजे पाली कधीच ओल्या जागेवर अंडी घालत नाहीत. घरांमध्ये अशी अनेक ठिकाणे आहेत जी त्यांच्यासाठी सुरक्षित मानली जातात. माळा, घरातील टाक्याचा आजूबाजुला, गॅस सिलेंडरच्या खाली, टेबल आणि फ्रीजच्या खाली.

यासोबतच सोफासेटच्या खालीही पालींचा जास्त वावर असतो. स्वयंपाक घरातील भांडे ठेवणाचा जो रॅक असतो ती देखील पालींसाठी सर्वात सुरक्षित जागा मानली जाते. स्विचबोर्डच्या रिकाम्या जागेतही पाली अंडी घालतात. या ठिकाणी अंडी विकसित होण्यासाठी अनुकूल वातावरण तयार होते.

पालीचे अंडी लहान, पांढरी आणि गोल असतात. बऱ्याचदा ज्या ठिकाणी अंडी घातली आहेत, त्या ठिकाणी पाल अधिक फिरते. एकाच ठिकाणी कोपऱ्यात पाल अंडे घालते. पालीचे अंडी एक सेंटीमीटर रुंदीची असतात आणि त्यांचे कवच पक्ष्यांच्या अंड्यांइतके नाजूक नसते. पालीचे अंडी पक्षाच्या अंडीच्या तुलनेत खूप जास्त लहान असतात. उबदार हवामानात 30 ते 60 दिवसात पालीची अंडी फुटतात. जेव्हा ते बाहेर येतात तेव्हा ते खूप लहान असतात, परंतु लगेचच फिरू शकतात.



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • RR vs RCB : वैभवची विस्फोटक खेळी, राजस्थानचा विजयी चौकार, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा
  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?
  • IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज, नंबर 1 कोण?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in