• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

घरात झुरळांनी घातलंय थैमान ?,’या’ सोप्या उपायांनी कायमची होईल सुटका

April 9, 2026 by admin Leave a Comment


घरात झुरळं असणं म्हणजे एक सामान्य समस्या आहे. घरामध्ये स्वंयपाकघरात तर सिंकच्या आजुबाजूला झुरळं दिसू लागतात. अशामध्ये स्वच्छतेबद्दल काळजी घेतली नाहीतर ही समस्या काही दिवसांनी अधिक वाढलेली दिसते आणि झुरळं घराच्या कोपऱ्यात पुन्हा दिसू लागतात. अशातच स्वंयपाकघर आणि बाथरूम मध्ये झुरळांचा धोका इतका वाढतो की घरात राहणं कठीण होऊन जाते, आणि यामुळे आजारही पसरू शकतो. जरी बाजारात झुरळांपासून सुटका मिळवण्यासाठी अनेक केमिकलयुक्त स्प्रे आणि पेस्टचा त्वरित परिणाम दिसून येतो. परंतू त्यांच्या वासाने मात्र काहींचे डोकेदुखीची समस्या निर्माण होते.अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या स्वंयपाक घरात उपलब्ध असलेल्या गोष्टींचा वापर करून झुरळांपासून कायमची सुटका मिळवू शकता. चला तर मग आजच्या लेखात आपण काही घरगुती उपायांचा अवलंब कसा करता येईल ते जाणून घेऊयात.

व्हिनेगर आणि गरम पाणी

झुरळांपासून सुटका मिळवण्याचा एक सोपा उपाय म्हणजे पाणी गरम करून त्यात काही प्रमाणात पांढरा व्हिनेगर मिक्स करा. हे मिश्रण अशा ठिकाणी ओता जिथे झुरळे नेहमी दिसतात. स्वयंपाकघरातील स्टोव्ह, सिंक, पाईप, कुकटॉपच्या आजूबाजूला, फटींमध्ये आणि ज्या कोपऱ्यांमध्ये ओलावा टिकून राहतो. त्यानंतर ती जागा पूर्णपणे स्वच्छ करा.

बोरिक ॲसिड आणि साखर

झुरळांना दूर ठेवण्यासाठी हा एक जुना आणि खात्रीशीर उपाय आहे.तो म्हणजे काही प्रमाणात साखर घेऊन ती बोरिक ॲसिडमध्ये मिक्स करा आणि ज्या ठिकाणी तुम्हाला वारंवार झुरळे दिसतात त्या ठिकाणी शिंपडा. साखर झुरळांना आकर्षित करते, तर बोरिक ॲसिड त्यांच्यासाठी हानिकारक असते. यामुळे झुरळं हळूहळू नाहीशी होतील.

लिंबू आणि बेकिंग सोडा

झुरळे आणि स्वयंपाकघरातील इतर कीटकांपासून सुटका मिळवण्यासाठी लिंबू आणि बेकिंग सोड्याचा उपाय करून पहा. हा उपाय चांगला काम करतो. एक लिटर पाणी उकळा आणि त्यात दोन मोठे चमचे बेकिंग सोडा तसेच एक ते दोन लिंबांचा रस मिक्स करा आणि हे मिश्रण सिंकचे ड्रेन, सिंकचे पाईप इत्यादींमध्ये टाका. तुम्ही हे मिश्रण तुमची फरशी स्वच्छ करण्यासाठी देखील वापरू शकता.

कडुलिंब आणि पुदिना

तुम्ही झुरळांच्या त्रासाला वैतागला असाल तर कडुलिंबाचा अर्क या समस्येपासून आराम देऊ शकतो. तसेच घरातील इतर अनेक लहान कीटकांनाही दूर ठेवतो. कडुलिंबाचा अर्क पुदिन्याच्या तेलात मिक्स करून हे मिश्रण पाण्यात पातळ करा आणि ज्या ठिकाणी झुरळे वारंवार येतात त्या ठिकाणी स्प्रे करा. तुम्हाला दोन ते तीन दिवसांत फरक जाणवेल. तुम्ही फक्त कडुलिंबाचा अर्क त्याचे तेल आणि कडुलिंबाची पाने यांचाही वापर करू शकता.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • दररोज एक ग्लास ‘हे’ पेय प्यायल्यास मुरुम आणि बद्धकोष्ठतेवर होईल मात, करून पहा रामबाण उपाय
  • बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार, सुनील तटकरे अजित पवारांचे नाव घेत म्हणाले…
  • Meesho ला तेजीचे पंख! 1 दिवसात 14 टक्क्यांनी उसळला शेअर, गुंतवणूकदारांचा मोठा फायदा
  • लग्नाच्या 11 वर्षांनंतर करण पटेलचा घटस्फोट? पत्नीने सोडलं मौन, म्हणाली “लग्नाच्या वेळी..”
  • Joint Family मध्ये राहिल्यामुळे तुमचे मन शांत होते का?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in