• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

घडामोडींना वेग! भाजपच्या सर्व आमदारांची दिल्लीत बैठक, मोठा निर्णय होण्याची शक्यता

February 1, 2026 by admin Leave a Comment


गेल्या वर्षी मणिपूरमध्ये मोठा हिंसाचार पहायला मिळाला होता. त्यामुळे या राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्यात आलेली आहे. आता काही दिवसांनी राष्ट्रपती राजवट संपणार आहे. त्यामुळे मणिपूरमध्ये सत्ता स्थापनेसाठी भाजपने तयारी सुरू केली आहे. भाजप हायकमांडने मणिपूरमधील आपल्या सर्व आमदारांना तसेच एनडीएच्या सहयोगी पक्षांच्या आमदारांना तातडीने दिल्लीला बोलावले आहे. त्यामुळे राजकीय चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

भाजपच्या आमदारांची दिल्लीत बैठक

भाजपने 31 जानेवारी रोजी पक्षाच्या आमदारांना 2 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत राष्ट्रीय राजधानीत उपस्थित राहण्याबाबत आदेश जारी केला आहे. आजच काही आमदार दिल्लीकडे रवाना झाले आहेत. पक्षाने हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल अशावेळी उचलले आहे, जेव्हा राज्यातील राष्ट्रपती राजवट संपण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. या राज्यात फेब्रुवारी 2025 पासून राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आलेली आहे, विधानसभेचे कामकाज स्थगित आहे. 12 फेब्रुवारी रोजी राष्ट्रपती राजवटीला एक वर्ष पूर्ण होणार आहे. त्यामुळे संभाव्य राजकीय पुनर्रचना, प्रशासन निर्णय आणि राज्याच्या भविष्यासाठी रोडमॅपची चर्चा करण्यासाठी आमदारांना दिल्लीत बोलावण्यात आले आहे.

भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने या बैठकीबाबत सविस्तर माहिती दिलेली नाही. मात्र या बैठकीत राजकीय पुनर्रचना, प्रशासन निर्णय आणि राज्याच्या भविष्यासाठी रोडमॅपची चर्चा होण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार भाजप प्रदेशाध्यक्ष ए. शारदा देवी यांनी आमदारांना दिल्लीत बोलावून घेतले आहे. तसेच भाजपचे ईशान्य समन्वयक संबित पात्रा यांनी आमदारांशी वैयक्तिकरित्या संपर्क साधला आहे, आता 2 फेब्रुवारी रोजी दिल्लीत ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

13 फेब्रुवारीला राष्ट्रपती राजवट संपणार

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 13 फेब्रुवारी रोजी मणिपूरमधील राष्ट्रपती राजवट संपणार आहे. त्यामुळे राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी शेवटचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता आहे. आता एका आठवड्यात मणिपूरमध्ये नवीन सरकार स्थापन होऊ शकते. त्याच्यात तयारीसाठी भाजपने आपल्या आमदारांना दिल्लीत बोलावले आहे. त्यामुळे आता मणिपूरमध्ये कधी सरकार स्थापन होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Australian Open 2026: कार्लोस अल्कारेजने जिंकला ऑस्ट्रेलियन ओपन किताब, नोवाक जोकोविचला नमवलं
  • WPL 2026, DC vs UPW : दिल्लीचा फिल्डिंगचा निर्णय, युपीची कामगिरी मुंबईसाठी निर्णायक, वॉरियर्स पलटणला मदत करणार?
  • या दिग्दर्शकाचा प्रत्येक सुपरहिट चित्रपट होता रिमेक, शेवटच्या चित्रपटाने कमाई केली आणि प्रेक्षकांना रडवलेही
  • मोठी बातमी! बाग्लादेशमध्ये भूकंप, भारतानं दिला जोरदार धक्का, अर्थव्यवस्थेचा कणाच मोडला
  • संध्याकाळी घरात दिवा लावताना कधीच करू नका या चुका, अन्यथा संपूर्ण कुटुंब येईल संकटात!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in