• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

गौतम गंभीरच्या पत्नीने धोनीसोबत केली चर्चा, माहीच्या एका कृतीने उपस्थितांची मनं जिंकली Video

March 10, 2026 by admin Leave a Comment


वनडे वर्ल्डकप 2011 च्या श्रेयवादावरून गौतम गंभीरने कायम धोनीवर निशाणा साधला. त्याच्या मते, हा विजय कोणा एका व्यक्तीचा नसून सांघिक आहे. दुसरीकडे, धोनीने यावर कधीच प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे दोघांमध्ये वाद असल्याची चर्चा सोशल मीडियावर कायम रंगते. पण एका व्हायरल व्हिडीओमुळे सर्वच चित्र बदललं आहे. टीम इंडियाचा प्रशिक्षक आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरच्या पत्नीने महेंद्रसिंह धोनीची भेट घेतली. हा व्हिडीओ तसा फार मोठा नाही. पण या दरम्यान जे काही झालं त्यामुळे सर्व चित्र स्पष्ट झालं आहे. या व्हिडीओवरून एक बाब स्पष्ट आहे की, धोनी आणि गंभीर यांच्यात सर्व काही ठीक आहे. यापूर्वी सोशल मीडियावर या दोघांमध्ये बिनसल्याची चर्चा होती. पण व्हायरल व्हिडीओमधील दृश्य पाहता सर्व काही ठीक असल्याचं दिसत आहे.

व्हायरल व्हिडीओनुसार, गौतम गंभीरच्या पत्नीने धोनीची भेट घेतली आणि चर्चाही केली. दोघंही हसतमुखपणे चर्चा करत होते. त्यामुळे धोनी आणि गंभीरचे चाहत्यांना यांच्यातील वाद शमल्याचा दिलासा मिळत आहे. महेंद्रसिंह धोनी आणि गौतम गंभीरची पत्नी यांची भेट कधी झाली यावरूनही चर्चा रंगली आहे. व्हायरल व्हिडीओनुसार, ही भेट उपांत्य किंवा अंतिम फेरीदरम्यान झाली असण्याची शक्यता आहे. कारण महेंद्रसिंह धोनी आणि गौतम गंभीरची पत्नी हे दोन सामने पाहण्यासाठी आले होते. त्या दरम्यान ही भेट झाली असणार आहे. जेतेपदानंतर महेंद्रसिंह धोनीने गौतम गंभीरचा उल्लेख कोच साहेब करून स्मित हास्याबाबत कमेंट केली होती. त्यावर गौतम गंभीरनेही प्रतिक्रिया दिली होती.

The way MS Dhoni talking with Gautam Gambhir’s wife.

Gambhir has taken digs at Dhoni whenever he got the chance, but Dhoni has never said a single word against him and has always behaved with grace.

That itself speaks volumes about the kind of personality Dhoni is.🙌🏻 pic.twitter.com/SeJA1htRQA

— Rohan💫 (@rohann__45) March 9, 2026

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या उपांत्य आणि अंतिम फेरीसाठी एमएस धोनी मुंबई आणि अहमदाबादला गेला होता. अंतिम सामन्यात त्याच्यासोबत रोहित शर्माही होती.इतकंच हे दोघं ट्रॉफी मैदानात घेऊन आले होते. टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा संपताच महेंद्रसिंह धोनी चेन्नईला रवाना झाला. या ठिकाणी आयपीएल 2026 स्पर्धेसाठी चेन्नई सुपर किंग्सचं सराव शिबीर आहे. आयपीएल 2026 स्पर्धा 28 मार्चपासून सुरू होणार आहे. पण अजूनही वेळापत्रक समोर आलेलं नाही. त्यात इराण आणि अमेरिका-इस्राईल युद्धामुळे आयपीएलवर अनिश्चिततेचं सावट आहे.





Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • पाकिस्तानचे आलिशान हॉटेल, जेथे सुरु आहे इराण युद्ध शांतता बैठक, एका रात्रीचे भाडे ऐकाल तर चाट पडाल
  • सोने खरेदीत या दोन पिठुकल्या राष्ट्रांनी देखील मारली बाजी, भरला खजाना, चीनलाही मागे टाकले
  • उन्हाळ्यात बनवा आगळ्या वेगळ्या पद्धतीची आंबट-गोड आंब्याची चटणी, वाचा ही सोपी रेसिपी
  • टाटासाठी सोन्याची अंडी देणाऱ्या दोन SUV! विक्रीचा महाविक्रम करत गाजवलं मार्केट
  • Iran | इराण- अमेरिकेचं आणखी बिनसलं? इस्लामाबादमधील भेटीत नेमकं काय -काय घडलं?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in