• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

गोव्याच्या भूमीतून देशाला मिळणार शटलर्स, भविष्याची वेध घेणारी अशी आहे संकल्पना

March 22, 2026 by admin Leave a Comment

गोव्याच्या भूमीवर बॅडमिंटनपटूंसाठी एक नवं व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. बॅडमिंटनचे दिग्गज प्रकाश पडुकोण आणि गोवा बॅडमिंटन असोसिएशन यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. तळागाळातील खेळाडूंसह उच्चस्तरीय खेळाडूंना योग्य मार्गदर्शन या परिसंस्थेच्या माध्यमातून लाभणार आहे. गेल्या अनेक दशकांमध्ये, गोव्यातील अनेक खेळाडूंनी आणि क्रीडाप्रेमींनी राष्ट्रीय स्तरावर आपले नाव कमावले आहे.पण उच्च-स्तरीय प्रतिभेचा सातत्यपूर्ण पुरवठा कायम ठेवणे हे एक आव्हान राहिले आहे.पाडुकोण स्कूल ऑफ बॅडमिंटन (PSB) आणि गोवा बॅडमिंटन असोसिएशन (GBA) यांच्यातील या नव्या सहकार्यामुळे हे आव्हान पेलणं सोपं जाणार आहे. केवळ एक अकादमी आणि राज्य संस्था यांच्यातील फक्त भागीदारी नाही, तर हा उपक्रम तळागाळातील सहभागापासून ते उत्कृष्ट स्तरावरील खेळाडूंच्या विकासापर्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. संपूर्ण गोव्यात एक संघटित बॅडमिंटन परिसंस्था निर्माण करण्याचा या माध्यमातून प्रयत्न असणार आहे. दोन वर्षांच्या सामंजस्य कराराअंतर्गत एक व्यापक योजना तयार करण्यात आली आहे.

फक्त अकादमी नाही तर एक परिसंस्था

गोव्यातील प्रत्येक मुलाला बॅडमिंटन खेळण्याची संधी मिळाली पाहिजे, यात काही दुमत नाही. पण प्रतिभावान बॅडमिंटनपटूंना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मार्गदर्शन मिळणं तितकंच महत्त्वाचं आहे. अखिल भारतीय चॅम्पियन प्रकाश पादूकोण स्कूल ऑफ बॅडमिंटनने आपल्या तळागाळातील कार्यक्रमांसाठी देशात ओळख मिळवली आहे. शाळा, क्लब आणि निवासी समुदायांमध्ये 75 हून अधिक केंद्रे कार्यरत आहेत. इतकंच काय तर दर्जेदार प्रशिक्षणाचा दर्जा कायम ठेवत सहभाग वाढवण्यावर विशेष लक्ष केंद्रित केलं आहे. तर गोव्यासाठी हे मॉडेल राज्याच्या स्वतःच्या क्रीडा परिसंस्थेशी जुळवून घेण्याचे उद्दिष्ट आहे. फक्त एकाच उच्च-कार्यक्षमता अकादमीवर लक्ष केंद्रित करणं हा हेतू नाही. तर शाळा आणि पंचायतींमध्ये बॅडमिंटनचा परिचय करून देणे, सहभाग वाढवणे आणि हळूहळू प्रतिभा ओळखून तिचे संगोपन करणे, ही या मागची मुख्य कल्पना आहे.

“गोव्यात बॅडमिंटनबद्दल आधीपासूनच खूप प्रेम आहे,” असे जीबीएचे अध्यक्ष मनोज पाटील म्हणाले. गोव्यामध्ये उत्कृष्ट पायाभूत सुविधा आणि प्रतिभावान बॅडमिंटनपटू आहेत. पीएसबीसोबतच्या या कराराद्वारे आम्ही एक अशी संपूर्ण परिसंस्था तयार करण्याचा प्रयत्न करत आहोत, जिथे तरुण खेळाडू राज्याबाहेर न जाता मोठी स्वप्ने पाहू शकतील आणि व्यावसायिक प्रशिक्षण घेऊ शकतील, असंही त्यांनी पुढे सांगितलं.

गोव्याची निवड करण्याचं कारण काय?

बॅडमिंटनसाठी गोव्यात सर्वोत्तम पायाभूत सुविधा आहेत, असे जीबीएचे सचिव प्रवीण थोंगल यांनी सांगितलं. गोव्याची क्रीडा पार्श्वभूमी आणि सुविधांमुळे एक नैसर्गिक निवड ठरते. दक्षिण गोव्यातील पेद्डेम, काकोरा, पोंडा आणि नावेलीम यांसारख्या ठिकाणी मोठी इनडोअर क्रीडांगणे आहेत. त्यामुळे प्रशिक्षण आणि मार्गदर्शन करणं आणखी सोपं जाईल. इतकंच काय तर बॅडमिंटन खेळणाऱ्या मुलांची संख्या वाढेल. तसेच त्यातून जागतिक पातळीवरील खेळाडूंची निवड करणंही सोपं होईल. या उपक्रमाच्या माध्यमातून शाळा, पंचायती आणि स्थानिक समुदायांमध्ये बॅडमिंटनची ओळख करून दिली जाईल. तसेच बॅडमिंटन किट पुरवलं जाईल. बॅडमिंटनमध्ये आवड निर्माण करणे आणि मूलभूत शारीरिक कौशल्ये विकसित करण्याला प्राधान्य दिले जाईल. जे खेळाडू या खेळात सातत्यपूर्ण आवड दाखवतील, त्यांना नंतर संरचित प्रशिक्षण दिले जाईल, असे थोंगल पुढे म्हणाले.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • लग्नाआधी नवरीला बोलावलेलं, अशोक खरातचं आतापर्यंतच सर्वात घाणेरडं सत्य समोर
  • इराणला डोनाल्ड ट्रम्प यांचा अल्टिमेटम, थेट म्हटले, सहमत असो वा नसो आम्ही..
  • एकनाथ शिंदेंचा आतापर्यंतचा सर्वात मोठा डाव, ठाकरेंचे 8 खासदार फोडणार, नावही ठरली, मध्यरात्रीची मोठी घडामोड
  • जेठालाल ते बबिता.. ‘तारक मेहता..’च्या कलाकारांनी जमवली इतकी संपत्ती; कोण सर्वांत श्रीमंत?
  • Pakistan Mediation : हीच पाकिस्तानची औकात, ज्यांच्यात मध्यस्थी घडवणार त्यांच्यातल्या एका देशाला म्हटलं कॅन्सर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in