• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

गोंधळ घालणाऱ्या विद्यार्थ्यांना शिस्त लावणे ओम बिर्ला चांगले जाणतात, अविश्वास ठरावावरील चर्चेआधी मोदी यांनी केले कौतूक

March 7, 2026 by admin Leave a Comment


लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विरोधात विरोधकांनी आणलेल्या अविश्वासाच्या प्रस्तावावर सोमवारी संसदेत चर्चा होणार आहे. या अविश्वास प्रस्तावावर चर्चा होण्याच्या आधी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची कार्यशैली आणि व्यक्तीमत्वावर विश्वास व्यक्त केला आहे, पीएम मोदी यांनी लोकसभा अध्यक्षांना पाठींबा देत म्हटले की ओम बिर्ला केवळ एक चांगले संसदपटू नसून शानदार लोकसभा अध्यक्ष देखील सिद्ध झाले आहेत. पीएम मोदी यांनी ओम बिर्ला यांचे समर्पण संपूर्ण संविधानाच्या प्रती असून त्यांची संसदीय प्रणालीच्या संचालनावर अतूट निष्ठा आहे.

कोटा एअरपोर्टच्या कोनशिला समारंभात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की कोटाचे खासदार ओम बिर्ला यांनी या प्रकल्पासाठी सतत प्रयत्न केल्याने मी त्यांचे कौतूक करु इच्छीतो. त्यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न कोटाच्या लोकांचे जीवन चांगले बनवणे आणि त्यांना नवीन संधी देण्याचे आहे.

पीएम मोदी यांनी स्पीकर बिर्ला यांचे कौतूक केले

ओम बिर्ला आज कोणत्या पक्षाचे सदस्य नाहीत. ते पक्ष आणि विपक्षच्या वरती आहेत. मी जेव्हा त्यांना सभागृहात पाहातो. तेव्हा माझ्या मनात विचार येतो की ते शिक्षण नगरी ( कोटा ) तून असल्याच्या प्रभावामुळे त्यांना लोकसभेचे स्पीकर म्हणून एक चांगल्या प्रमुखासारखे संसदेच्या सर्व सदस्यांना सोबत घेऊन काम करण्याच्या भूमिकेत ते असतात असेही पीएम मोदी यांनी यावेळी सांगितले.

संसदेत जितके खासदार आहेत. त्यांना ते चांगले सांभाळतात. त्यांच्या आग्रहांची आणि त्यांच्या भावनांचा ते खूप आदर करतात आणि ते एक असे अध्यक्ष आहेत. जे सदस्यांचा सर्वाधिक सन्मान करण्याचा स्वभाव राखतात असेही मोदी यांनी सांगितले.

ते सर्वांचे कटू शब्द सहन करतात…

पंतप्रधान मोदी म्हणाले की, कधीकधी, जरी काही मोठ्या घरांचे अहंकारी आणि उत्पाती काही विद्यार्थी येतात. आणि गोंधळ घालण्याचा आपली सवय सोडत नाहीत. तरीही सभागृहाचे मुखिया म्हणून ते सर्वांना सांभाळतात. त्यांनी कधी कोणा संसद सदस्याचा अपमान केलेला नाही. सर्वांचे कटू बोल झेलत राहातात.तुम्ही पाहिले असेल की ते नेहमी हसतमुख असतात. त्यांच्या चेहऱ्यावर एक गोड हसु नेहमी असते. कदाचित एक हे ही कारण आहे की ते सभागृहात लोकप्रिय आहेत असे मोदी यांनी यावेळी सांगितले.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तर घरात होईल डांसांचे साम्राज्य, कधीच करून नका या चुका नाहीतर पश्चात्तापाशिवाय पर्याय नाही!
  • घरात या गोष्टी दिसल्या की सगळं उद्ध्वस्त झालंच म्हणून समजा, वाचा चाणक्यांनी सांगितलेलं गुपित!
  • Chhagan Bhujbal | हेलिकॉप्टरचा अपघात टळला, घटनेनंतर भुजबळांची प्रतिक्रिया समोर
  • Sunetra Pawar | ‘सुनेत्रा पवारांना चाकणकरांकडून धोका असल्याची तक्रार’ मुख्यमंत्री म्हणाले…
  • IPL 2026: सलग तीन पराभवानंतर सीएसकेची विजयी सलामी, दिल्लीला 23 धावांनी केलं पराभूत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in