• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

‘गेम ऑफ थ्रोन्स’ फेम अभिनेत्याचं 35 व्या वर्षी निधन; गंभीर आजारानंतर सर्जरीला दिला नकार

April 10, 2026 by admin Leave a Comment


‘गेम ऑफ थ्रोन्स’ या गाजलेल्या वेब सीरिजमध्ये भूमिका साकारलेला अभिनता मायकल पॅट्रिकचं निधन झालं. वयाच्या अवघ्या 35 व्या वर्षी त्याने या जगाचा अखेरचा निरोप घेतला. मोटर न्यूरॉन या आजाराशी दीर्घकाळ लढा दिल्यानंतर अखेर त्याची प्राणज्योत मालवली. जवळपास तीन वर्षांपूर्वी फेब्रुवारी 2023 मध्ये मायकलला या आजाराचं निदान झालं होतं. हा एक असा आजार आहे जो श्वास घेणं, गिळणं, बोलणं आणि हालचाल करणं यांसारख्या आवश्यक कार्यांसाठी जबाबदार असलेल्या चेतापेशींवर परिणाम करतो. मायकलची पत्नी नाओमी शीहान हिने बुधवारी इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट लिहित चाहत्यांना याबद्दलची माहिती दिली.

नाओमीने मायकलसोबतच्या लग्नाचा फोटो पोस्ट करत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. ‘काल रात्री नॉर्दर्न आयर्लंड हॉस्पिसमध्ये मायकलचं निधन झालं. 1 फेब्रुवारी 2023 रोजी त्याला मोटर न्यूरॉन आजाराचं निदान झालं होतं. दहा दिवसांपूर्वीच त्याला हॉस्पिसमध्ये दाखल करण्यात आलं होतं आणि तिथल्या टीमने त्याची खूप काळजी घेतली. कुटुंब आणि जवळच्या मित्रमैत्रिणींच्या सानिध्यात त्याने शांतपणे अखेरचा श्वास घेतला. आमच्या मनावर किती आघात झाला आहे हे शब्दांत वर्णन करता येणार नाही. मायकल त्याच्या आजारपणातच नाही तर त्याच्या आयुष्याच्या प्रत्येक दिवशी अनेकांसाठी एक प्रेरणा होता. आनंदी, उत्साही आणि मनमोहक हास्य चेहऱ्यावर ठेवून तो परिपूर्ण आयुष्य जगला,’ असं तिने लिहिलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Michael Patrick (@michaelpatrick314)

‘जगात करण्यासारख्या सर्वांत महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे काहीतरी खायला मिळवणं, काहीतरी प्यायला मिळवणं आणि तुमच्यावर प्रेम करणारी कोणीतरी व्यक्ती असणं. त्यामुळे फार विचार करू नका, खा.. प्या आणि प्रेम करा’, अशा शब्दांत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मायकलला निदान झालेला आजार असा आहे की ज्यामध्ये शरीरातील स्नायूंवर नियंत्रण ठेवणारं मज्जातंतू हळूहळू निष्क्रिय होतं. गेल्या काही महिन्यांपासून त्याची प्रकृती अधिक खालावली होती.

मायकलला डॉक्टरांनी श्वास घेण्यासाठी ‘ट्रेकिओस्टॉमी’ (Tracheostomy) करण्याची शस्त्रक्रिया सुचवली होती. यासाठी अंदाजे 1,00,000 पौंड खर्च अपेक्षित होता. परंतु मायकलने ही शस्त्रक्रिया नाकारली. उर्वरित आयुष्य हॉस्पिटलमध्ये घालवण्यापेक्षा कुटुंबासोबत आनंदाने राहण्याचं त्याने ठरवलं होतं. ‘गेम ऑफ थ्रोन्स’च्या सहाव्या सिझनमध्ये मायकलने वाइल्डलिंग रायटरची भूमिका साकारली होती. या सिझनमधील ‘द ब्रोकन मॅन’ नावाच्या भागात तो दिसला होता. याशिवाय त्याने शेक्सपिअरच्या नाटकांमध्येही काम केलं होतं. ‘ब्ल्यू लाइट्स’, ‘दिस टाऊन’, ‘द स्पेक्टॅक्युलर’ आणि ‘ब्लास्ट्स फ्रॉम द पास्ट’ यांसारख्या शोजमध्येही तो झळकला होता.





Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • डेटा कॉलिंग आणि SMS, जिओचा सर्वात स्वस्त 28 दिवसांचा प्लॅन
  • IPL 2026 : फिन एलनला चुकीच्या पद्धतीने बाद दिल्यानंतर केकेआरचा संताप, पण…
  • ‘राम’नावाचा जप करतच बघावा लागेल हा प्रचंड हॉरर चित्रपट, OTT वर करतोय ट्रेंड, घाबरट लोकांनी दूरच राहावे
  • WhatsApp चे जबरदस्त फीचर; आता नंबर शेअर न करता करा चॅट, बिनधास्त मारा गप्पा
  • हुंडई क्रेटा आता नव्या अवतारात! जबरदस्त समर एडिशन लाँच, किंमत किती?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in