• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

गेट उघडू नको… अन् दरवाज्यावर आली मृत्यूची बातमी; काय घडलं? डिलिव्हरी बॉय…

February 24, 2026 by admin Leave a Comment


दिल्लीतील नजफगढ झालेल्या भीषण अपघातात भरधाव कारने एका डिलिव्हरी बॉयला धडक दिली आणि त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे 25 वर्षांच्या तरुणाच्या कुटुंबावर दुखा:चा डोंगर कोसळला आहे. या घटनेनंतर बोलताना त्याच्या आईने म्हटले की, ‘घरांमध्ये झाडू-पोछा करून, भांडी घासून मुलांना मोठं केलं. आता बसून जेवायची वेळ आली होती, तर कमावणारा मुलगाच निघून गेला.’ या घटनेनंतर त्यांच्या आईचे अश्रू थांबत नाहीत. आता आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्यावर कारवाई करण्यात येत आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

घरची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती

दिल्ली अपघातात मरण पावलेला हेम शंकर हा घरातील एकमेव कमावणारा व्यक्ती होता. त्याच्या मृत्यूमुळे त्याची आई रुक्मिणी यांना प्रचंड धक्का बसला आहे. त्यांच्या पतीचे 12 वर्षांपूर्वी निधन झालेले आहे. 25 वर्षीय हेम शंकर एका क्विक-कॉमर्स कंपनीत डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करत होता. अपघाताच्या वेळी तो इलेक्ट्रिक स्कूटी चालवत होता अशी माहिती समोर आली आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्याच्या आईने सांगितले की, ‘तीनही मुलं लहान असताना मी घरांमध्ये भांडी घासून, झाडू-पोछा करून त्यांना वाढवलं. आता तो कमवायला लागला होता, तर देवाने त्याला माझ्यापासून हिरावून घेतलं. आता आमचं कुटुंब उपाशी मरेल, कारण मोठ्या मुलाकडे काम नाही आणि धाकटा अजून शाळेत शिकत आहे. हेम शंकरच संध्याकाळी 6 ते सकाळी 5 अशी ड्युटी करून संपूर्ण घर चालवत होता.’ या घटनेमुळे त्याचे कुंटुंब उघड्यावर आले आहे.

तो आईला म्हणाला होता, दार उघडू नकोस…

हेम शंकरच्या आईने सांगितले की शुक्रवारी संध्याकाळी कामावर जाताना तो सांगून गेला होता, ‘माझ्यानंतर कोणीही घरी आलं तर दार उघडू नकोस, वेळ चांगली नाही.’ त्यानंतर शनिवारी सकाळी दोन-तीन मुलं घराचं दार ठोठावायला आली तेव्हा तिने दार उघडण्यास नकार दिला. त्यावेळी त्यांनी हेमचा अपघात झाला आहे, त्याला दुखापत झाली आहे अशी माहिती दिल्यानंतर तिने दार उघडले. रुग्णालयात पोहोचल्यावर तिला कळले की तिचा मुलगा आता या जगात नाही.

पुढे बोलताना रुक्मिणी यांनी सांगितले की, हेम शंकर कमवायला लागल्यावर त्याने मला काम बंद करायला सांगितले होते. तो म्हणाला होता की आता तू काम करू नकोस. मला नीट दिसत नव्हतं, त्यामुळे त्याने डोळ्यांवर उपचारही करून घेतले होते. माझ्या मुलात कोणताही दोष नव्हता. आता मी आरामात घरी बसत होते, मात्र देवाने त्याला हिरावून घेतलं.’



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • लग्नाआधी नवरीला बोलावलेलं, अशोक खरातचं आतापर्यंतच सर्वात घाणेरडं सत्य समोर
  • इराणला डोनाल्ड ट्रम्प यांचा अल्टिमेटम, थेट म्हटले, सहमत असो वा नसो आम्ही..
  • एकनाथ शिंदेंचा आतापर्यंतचा सर्वात मोठा डाव, ठाकरेंचे 8 खासदार फोडणार, नावही ठरली, मध्यरात्रीची मोठी घडामोड
  • जेठालाल ते बबिता.. ‘तारक मेहता..’च्या कलाकारांनी जमवली इतकी संपत्ती; कोण सर्वांत श्रीमंत?
  • Pakistan Mediation : हीच पाकिस्तानची औकात, ज्यांच्यात मध्यस्थी घडवणार त्यांच्यातल्या एका देशाला म्हटलं कॅन्सर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in