• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

गॅस सिलिंडर बुकिंगचे नियम बदलले, युद्धाचा सर्वसामान्यांवर परिणाम, सरकारचा नवा निर्णय काय?

March 7, 2026 by admin Leave a Comment


मध्यपूर्वेत भयंकर युद्ध सुरू आहे. इस्रायल आणि अमेरिकेकडून इराणवर सतत हल्ले केले जात आहेत. यामुळे मध्य पूर्वेतील सर्वच देशांमध्ये तणाव वाढला आहे. यामुळे कच्चे तेल आणि नैसर्गिक वायुची पुरवठा साखळी खंडित झाली आहे. याचा परिणाम आता भारताच्या घरगुती गॅस सेवेवरही दिसू लागला आहे. ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी (OMCs) LPG सिलेंडर बुकिंगबाबत मोठा निर्णय घेतला आहे. हा निर्णय काय आहे याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

टाइम्स ऑफ इंडियाच्या एका अहवालानुसार, नवीन नियमानुसार आता घरगुती गॅस वापरणाऱ्या ग्राहकांना 21 दिवसांपूर्वी नवीन LPG सिलेंडर बुक करता येणार नाही. काही दिवसांपासून वाढलेल्या ‘पॅनिक बुकिंग’मुळे पुरवठा साखळीवर वाढलेला ताण कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. कारण याआधी ग्राहक कधीही सिलेंडर बुक करू शकत होते आणि काही दिवसांत त्याची डिलिव्हरीही मिळत होती. मात्र नवीन नियमानंतर असे करता येणार नाही. एकदा सिलिंडर खरेदी केल्यानंतर आता 21 दिवसांनंतर दुसरा सिलिंडर बुक करता येणार आहे.

सिलेंडरच्या किंमतीत वाढ

शुक्रवारी रात्री राजधानी दिल्लीतील घरगुती LPG सिलेंडरच्या किंमतीत वाढ करण्यात आली. 14.2 किलोच्या घरगुती LPG सिलेंडरच्या किंमतीत 60 रुपयांची वाढ झाली. त्यामुळे सिलेंडरचा दर 853 रुपयांवरून 913 रुपयांवर गेला आहे. इराण-इस्रायलमधील वाढत्या लष्करी तणावामुळे आणि मिडल ईस्टमधील अनिश्चित परिस्थितीमुळे लोकांमध्ये गॅस पुरवठ्याबाबत चिंता वाढली आहे. त्यामुळे लोकांनी आगाऊ सिलेंडर बुक करण्यास सुरुवात केली. यामुळे LPG ची मागणी अचानक वाढली आणि वितरण व्यवस्थेवर ताण आला.

21 दिवसांचा नियम का लागू केला?

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC) आणि भारत पेट्रोलियम (BPCL) यांनी शुक्रवारीपासून ही नवी व्यवस्था लागू केली आहे. या नियमानुसार, कोणत्याही घरगुती ग्राहकाला मागील सिलेंडरची डिलिव्हरी झाल्यानंतर किमान 21 दिवसांनंतरच नवीन LPG सिलेंडर बुक करता येणार आहे. ऑल इंडिया भारत गॅस डिस्ट्रीब्युटर्स असोसिएशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष (पूर्व विभाग) सुकॉमल सेन यांनी TOI ला सांगितले की, बुधवारीनंतर बुकिंगमध्ये वाढ दिसून आली. कोलकाता आणि आसपासच्या भागात एका दिवसात सुमारे 1.5 लाख LPG बुकिंग नोंदवण्यात आल्या, तर सामान्य दिवसांत हा आकडा साधारण 1 लाखांच्या आसपास असतो. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • 30 लाखांपर्यंतच्या इलेक्ट्रिक कारवर 100% रोड टॅक्स माफ, ‘या’ सरकारच्या नव्या पॉलिसीत काय आहे खास?
  • Nashik Crime : मीटिंगमध्ये पायाने स्पर्श, लॉबीत शरीराशी झटापट आणि.. नाशिकच्या कंपनीत घडणारं वाचून लाजेनं जाईल मान खाली !
  • आशा भोसले यांच्यासाठी पंतप्रधान मोदींची पोस्ट; ‘त्यांना रुग्णालयात दाखल केल्याचं ऐकून..’
  • Maratha Reservation: मनोज जरांगेंना झटका, या गुन्ह्यांना माफी नाहीच! मराठा आंदोलकांवरील 828 गुन्हे मागे, सरसकट माफी नाहीच
  • भाजप नगरसेविकेच्या पतीला भयानक मारहाण, घटनेचा Video Viral

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in