• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

गिरीजा ओकची 5 भागांची सीरिज, 24 तासांमध्ये Netflix वर बनली नंबर 1, कथा ठरतेय सुपरहिट

March 10, 2026 by admin Leave a Comment


Hello Bachhon : ओटीटी प्लॅटफॉर्मवर दर आठवड्याला नवनवीन चित्रपट आणि वेब सीरिज प्रदर्शित होत असतात. मात्र त्यापैकी काहीच सीरिज कमी वेळात प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतात. अलीकडेच प्रदर्शित झालेली केवळ 5 भागांची एक बायोग्राफिकल ड्रामा सीरिज सध्या प्रेक्षकांमध्ये प्रचंड चर्चेत आहे. ही सीरिज रिलीज होताच अवघ्या 24 तासांत Netflix वर नंबर 1 वर ट्रेंड करू लागली आहे.

Hello Bachhon ही वेब सीरिज 6 मार्च रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली. फक्त 5 एपिसोड असलेल्या या सीरिजने अल्पावधीतच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आणि रिलीज झाल्यानंतर 24 तासांतच ती प्लॅटफॉर्मवर नंबर 1 वर पोहोचली. ही सीरिज बायोग्राफिकल ड्रामा प्रकारातील असून आयुष्यात मोठे स्वप्न पाहणाऱ्या आणि ते पूर्ण करण्यासाठी झगडणाऱ्या लोकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

प्रेरणादायी प्रवासावर आधारित कथा

या वेब सीरिजची कथा एका अशा शिक्षकावर आधारित आहे, ज्यांनी आपल्या मोठ्या ध्येयाचा पाठपुरावा करत देशातील लाखो विद्यार्थ्यांचे आयुष्य बदलून टाकले. भारताच्या विविध भागांतील अनेक विद्यार्थ्यांना महागड्या शिक्षणाचा विचारही करता येत नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी त्यांनी एक वेगळा मार्ग तयार केला आणि शिक्षण अधिक परवडणारे बनवले.

ही कथा आहे भारतातील लोकप्रिय ऑनलाइन शिक्षण प्लॅटफॉर्म Physics Wallah चे संस्थापक Alakh Pandey यांच्या आयुष्यावर आधारित. त्यांच्या संघर्ष, मेहनत आणि विद्यार्थ्यांसाठी केलेल्या प्रयत्नांचा प्रेरणादायी प्रवास या मालिकेत दाखवण्यात आला आहे.

IMDb वर दमदार रेटिंग

या वेब सीरिजला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून IMDb वर या सीरिजला 8.4 इतकी दमदार रेटिंग मिळाली आहे. या मालिकेचे क्रिएटर अभिषेक यादव आहेत.

प्रेरणादायी कथा, दमदार अभिनय आणि वास्तवाशी जोडलेला विषय यामुळे ‘Hello Bachhon’ ही सीरिज सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली असून नेटफ्लिक्सवर ती जोरदार ट्रेंड होत आहे. शिक्षणाच्या माध्यमातून आयुष्य बदलण्याची ताकद काय असते हे या मालिकेत प्रभावीपणे दाखवण्यात आले आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मोठी बातमी! पाकिस्तानमध्ये मोठी घडामोड, इराणी डेलिगेशन इस्लामाबादमध्ये दाखल
  • Mira Bhayandar Fire : मिरा-भाईंदरमध्ये सिलेंडर स्फोटांमुळे भीषण अग्नितांडव; तिघांचा मृत्यू, 50 झोपड्या खाक
  • Horoscope Today 11th April 2026 : करिअरमध्ये येणार टर्निंग पॉईंट, या राशीला मोठं यश मिळण्याची शक्यता, फक्त सावधगिरी… वाचा आजचं भविष्य
  • RR vs RCB : वैभवची विस्फोटक खेळी, राजस्थानचा विजयी चौकार, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा
  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in