• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

गायीचं दूध वाढवण्यासाठी देशी जुगाड… थेट पायालाच बांधली बॉटल; पुढे काय घडलं?

February 6, 2026 by admin Leave a Comment


Viral Video : शेतकऱ्यांची जिद्द, निरीक्षणशक्ती आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याची बुद्धिमत्ता पुन्हा एकदा समोर आली आहे. सोशल मीडियावर सध्या एका शेतकऱ्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत असून त्यामध्ये त्याने महागड्या रबर मॅट्स परवडत नसल्याने साध्या प्लास्टिक बाटलीचा वापर करून गायीच्या आरोग्याचे संरक्षण केल्याचे दिसून आले आहे. यामुळेच ‘गरज हीच शोधाची जननी’ ही म्हण पुन्हा एकदा खरी ठरत आहे.

दरम्यान, गायीच्या पायाला जखम झाल्यास ती नेहमी त्या जखमी बाजूनेच बसण्याचा प्रयत्न करते. यामुळे त्या जखमेवर सतत दबाव येतो आणि ती जखम अधिक गंभीर होण्याची तसेच संसर्ग होण्याची शक्यता वाढते. परिणामी गायीला वेदना होतातच पण त्याचा थेट परिणाम तिच्या आरोग्यावर आणि विशेषतः दूध उत्पादन क्षमतेवर होतो. अनेक वेळा जखमा वाढल्यामुळे दूध उत्पादनात लक्षणीय घट देखील होते.

ही समस्या टाळण्यासाठी संबंधित शेतकऱ्याने एक सोपी पण अत्यंत हुशार युक्ती शोधून काढली. त्याने गायीच्या जखमी पायाला एक प्लास्टिकची बाटली बांधली. गाय बसण्याचा प्रयत्न करताच ही बाटली आवाज करते. हा आवाज गायीला इशारा देतो. शिवाय बाटली असल्यामुळे त्या बाजूने बसणे गायीसाठी अस्वस्थ करणारे ठरते. त्यामुळे गाय आपोआप जखम नसलेल्या बाजूने बसते.

कमी खर्चात प्रभावी उपाय

या साध्या उपायामुळे जखमी पायावरचा ताण कमी होतो आणि जखमा लवकर भरून येण्यास मदत होते. परिणामी गायीचे आरोग्य सुधारते, वेदना कमी होतात आणि दूध उत्पादनावर होणारा नकारात्मक परिणाम टाळता येतो. अशा प्रकारे अत्यल्प खर्चात प्रभावी पशुसंवर्धनाचा उपाय या शेतकऱ्याने दाखवून दिला आहे.

प्लास्टिक बाटलीचा हा उपाय अत्यंत सोपा, स्वस्त आणि परिणामकारक असला तरी तो योग्य पद्धतीने आणि काळजीपूर्वक वापरणे आवश्यक आहे. योग्य खबरदारी घेतल्यास हा उपाय पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक उपयुक्त मार्गदर्शक ठरू शकतो.

मात्र खबरदारी अत्यंत आवश्यक

तज्ज्ञांच्या मते, या व्हायरल व्हिडिओमध्ये शेतकऱ्याने बाटली खूप घट्ट बांधलेली दिसते, जे योग्य नाही. अशा प्रकारे घट्ट बांधल्यास गायीच्या पायातील रक्तप्रवाहावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे बाटली बांधताना अतिशय सुरक्षित पद्धतीने बांधावी. नायलॉन दोरीऐवजी मऊ कापडी पट्टी वापरणे अधिक योग्य. प्लास्टिक बाटली वापरताना ती तीक्ष्ण कडा नसतील अशी कापून, कडांवर टेप गुंडाळावी. जखमी पाय असलेल्या जनावरांसाठी ओलसर जमीन घातक ठरते, त्यामुळे खाली कोरडे गवत, पोती किंवा गाद्या टाकल्यास जखम लवकर बरी होण्यास मदत होते.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • पाकिस्तान मोठ्या संकटात, आणीबाणी लागू, सरकारची मोठी घोषणा
  • चांदीचे दागिने घातल्यामुळे खरचं लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळतो का? घ्या जाणून
  • भारतातील एकमेव स्टेशन, जिथे स्टेशनवरून ट्रेन जाताना बंद होतात सर्व लाईट्स, कारण ऐकून…
  • नशिब असावं तर असं..! हर्षित राणा जखमी होताच या खेळाडूचे तारे चमकले, थेट संघात मिळाली एन्ट्री
  • Multibagger Stock: गुंतवणूकदारांचा भांगडा, 1 लाखांचे झाले 78 लाख, ज्वेलरी कंपनीच्या शेअरची तुफान घोडदौड

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in